मुंबई | Mumbai
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (१० जून) ४ हजार ३९९ दिवसांच्या सलग सेवेचा विक्रम केला आहे. त्यांनी नेहरूंच्या 1952 ते 1964 या काळातील 4 हजार 398 दिवसांचा विक्रम मोडला आहे. मोदींच्या या विक्रमानंतर भाजपकडून तसेच NDA कडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (१२ जून) पत्रकार परिषद घेत पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाची माहिती देत त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे अभिनंदन
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 12 वर्ष पंतप्रधान पदाची कारकिर्द पूर्ण केलीय. हे करत असताना 4 हजार 398 दिवस हा लाँगेस्ट इलेक्टेड पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा विक्रम मोडीत काढला. महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेच्या वतीने त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारकिर्द लांब आहे, यासाठी महत्त्वाची नाही तर जगाच्या पाठीवर भारताची पत वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे.
लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान
एनडीए सर्वात मोठा समूह म्हणून 22 राज्यात सरकार चालवत आहे. देशाच्या 80 टक्के भूभागावर एनडीए शासित राज्य सरकार आहेत. काँग्रेसला यश मिळालं नव्हतं, त्याहून अधिक एनडीएला प्राप्त झालं आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जन्मभूमीत भाजपचे सरकार आले, त्यामुळे आम्ही अधिक आनंदीत आहोत. पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा या दशकातील चमत्कार आहे. शिवाय मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे, तर फायनेस्ट पंतप्रधान आहे.
जगातल्या लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधानांची गणना
मागील १२ वर्षांत पंतप्रधान मोदींना ३२ आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. त्यातले २४ सन्मान हे विविध देशांमधले सर्वोच्च सन्मान आहेत हा देखील एक रेकॉर्ड आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. जगातल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गणना केली जाते. विविध रेटिंग्ज देणाऱ्या जगातल्या एजन्सीजनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च रेटिंग दिलं आहे.
तीव्र गरीबीतून २५ कोटी लोकांना बाहेर काढलं
तीव्र गरीबीतून २५ कोटी लोकांना बाहेर काढलं. हा दशकातील चमत्कार आहे. 81 कोटी नागरिकांना अन्न सुरक्षा, 11 कोटी पेक्षा जास्त किसान सन्मान योजनेतून 4 लाख कोटींहून अधिक रक्कम दिली. तर दूध उत्पादन 70 टक्के वाढले असून आज भारत सर्वाधिक उत्पादन करतो. सूक्ष्म सिंचन करण्याचा विक्रम आपल्याकडे झालाय. 32 कोटी महिलांची खाती आहेत. 5 लाखांपर्यंत उपचार मोफत मिळाला. प्राप्तीकराची लिमिट 12 लाख 75 हजारपर्यंत वाढवलीय. पंतप्रधान आवास योजनेतून 4 कोटी घरं तयार झालीत आणि आणखी 3 कोटी घरं तयार होत आहेत. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जवळपास ८ लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा ३ लाखांवरुन ५ लाखांवर नेण्यात आली. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
डिजिटल व्यवहारात सर्वांना मागे टाकले
आपण 5 ट्रिलियन डॉलर्सच्या दृष्टीने पुढे जात आहे. 84 टक्के कर एकाच वेळी आपण भरुन काढू शकतो. आज भारताकडे एका दिवसात 84 टक्के कर्ज परत करु शकतो. युपीएकडे एक दिवसाची इम्पोर्ट क्षमता नसायची, आता ती 11 महिन्याची आहे. जीएसटीमध्ये महाराष्ट्र प्रथम आहे. डिजिटल व्यवहारात आपण सर्वांना मागे टाकले आहे. आपण सुरु केलेला युपीआय 30 देश वापरत आहेत. प्रत्यक्ष करसंग्रह 27 लाख कोटीपेक्षा अधिक गेले आहेत. सेमिकंडक्टरमध्ये भारत वैश्विक होतो आहे.
३ कोटी महिला लखपतीदीदी झाल्या
लखपतीदीदी कार्यक्रमातर्गत 3 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत. आपण 50 लाख टप्पा गाठला आहे. भारताच्या सैन्यात 11 हजार महिलांची संख्या गेली, जी आधी केवळ 3 हजार होती. महिला सशक्त करणे आणि महिला केंद्रीत अर्थव्यवस्था करण्याचे प्रयत्न आपण करतो आहे.
डिजिटल योजनांच्या माध्यमातून ५८ लाख कोटी
डिजिटल योजनांच्या माध्यमातून 58 लाख कोटी रुपये विविध योजनांतून दिले आहेत. जेम पोर्टलच्या माध्यमातून आपण भ्रष्टाचार संपवला. पायाभूत सुविधांचे क्षेत्र आहे ते वाढवले. आधी २ लाख कोटी खर्च करायचो, आता तो 12 लाख कोटी रुपये खर्च करतोय. 34 किमी रस्ते महामार्ग आपण करतोय, अशी माहिती देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना दिली.




