Friday, June 12, 2026
HomeनाशिकMonsoon Rain Update: मान्सूनच्या प्रतिक्षेत नाशिक जिल्हा! जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार...

Monsoon Rain Update: मान्सूनच्या प्रतिक्षेत नाशिक जिल्हा! जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार नागरिकांची तहान टँकरच्या भरवश्यावर

नाशिक | प्रतिनिधी
मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल १७४ गावे आणि ४८० वाड्या अशा एकूण ६५४ ठिकाणी टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात असून, सुमारे ३ लाख १८ हजार ७०८ नागरिकांची तहान टँकरच्या भरवशावर भागवली जात आहे.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, हेतीनुसार, सध्या एकही शासकीय टैंकर कार्यरत नसून १७९ खासगी टँकर दररोज ३९५ फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ नांदगाव तालुक्याला बसली आहे. येथे ३८ गावे आणि १९२ वाड्या अशा एकूण २३० ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ५३,२१६ नागरिक त्यावर अवलंबून आहेत. त्याखालोखाल येवला (११४), सिन्नर (७९), मालेगाव (६५) आणि इगतपुरी (५०) या तालुक्यांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. विशेष म्हणजे, येवला तालुक्यातील ८२,२५२ नागरिक, मालेगावमधील ३९ हजारांहून अधिक, सिन्नरमधील ३७,४७१ आणि इगतपुरीतील २४ हजारांहून अधिक नागरिक टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

- Advertisement -

Nashik Tapovan: तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी

पाणीटंचाईची सद्यस्थिती
गावे : १७४
वाड्या : ४८०
एकूण गावे-वाड्या ६५४
खासगी टँकर : १७९
दररोजच्या फेऱ्या : ३९५
लाभार्थी लोकसंख्या ३,१८,७०८

सर्वाधिक टंचाईग्रस्त तालुके
तालुका गावे-वाड्या
नांदगाव २३०
येवला ११४
सिन्नर ७९
मालेगाव ६५
इगतपुरी ५०

ताज्या बातम्या

देवेंद्र

Devendra Fadnavis: “लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट…”; CM देवेंद्र फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींच...

0
मुंबई | Mumbaiदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळाचा विक्रम मोडीत काढला आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी...