Friday, May 3, 2024
Homeनाशिकनाशिकमधील मनसैनिकांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा; 'हे' आहे कारण

नाशिकमधील मनसैनिकांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा; ‘हे’ आहे कारण

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) वतीने भोंगे (loud speaker) लावू नये यासाठी नवीन नाशिक विभागातील मनसेच्या (MNS) शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना नोटिसा (Notice) बजावल्या आहेत. यानंतरही भोंगे लावल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे….

- Advertisement -

गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभेमध्ये मशिदीवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यावरून नाराजी व्यक्त केली होती. तसेच माझा धर्माला विरोध नाही तर अशा प्रवृत्तीला विरोध आहे.

यामुळे मशिदीवर सुरू असलेले भोंगे बंद करावे अन्यथा मनसेदेखील हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) लावून मशीदी समोरच भोंगे लावणार असल्याचे उद्गार काढले होते.

जातीय सलोखा व दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनसेचे शहराध्यक्ष दिलीप दातीर (Dilip Datir) यांच्यासह शहर संघटक अर्जुन वेताळ,विद्यार्थी सेना शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, कामगार सेना चिटणीस तुषार जगताप, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, जिल्हाध्यक्ष कामिनी दोंदे, उपशहराध्यक्ष अक्षय खांडरे, राजु परदेशी, देवचंद केदारे यांना १४९ अन्वये नोटीसी बजावण्यात आल्या आहेत.

यानंतरही भोंगे लावल्यास यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी भागिरथ देशमुख व पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या