Monday, May 20, 2024
Homeजळगावआमदार लताबाई सोनवणें सह आमदार चिमणराव पाटील यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस

आमदार लताबाई सोनवणें सह आमदार चिमणराव पाटील यांना अपात्रतेसंदर्भात नोटीस

जळगाव : jalgaon

मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ (Storm in politics) निर्माण झाले आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांचे हे बंड थोपवून धरण्यासाठी शिवसेनेनही (Shiv Sena) जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेने विधानसभेचे उपाध्यक्ष (Deputy Speaker of the Legislative Assembly) नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांच्याकडे पक्षशिस्त न पाळणाऱ्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभेच्या बैठकीला गैरहजर बंडखोर आमदारांना अपात्रतेसंदर्भात नोटीस पाठवण्यात आली आहे. यात चोपड्याच्या आमदार लताबाई सोनवणे (MLA Latabai Sonawane) यांनाही नोटीस (notice regarding disqualification) पाठवण्यात आली आहे.

- Advertisement -

जळगाव जिल्ह्यातील बंडखोर पाच आमदारांपैकी चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे यांनाही यासंदर्भात नोटीस पाठवण्यात आले आहे. लताबाई सोनवणे यांच्या जळगावच्या निवासस्थानी गेटवर शनिवारी रात्री साडेदहा वाजलेनंतर ही नोटीस लटविण्यात आली होती. आज सकाळी इन नोटीस लताबाई सोनवणे यांच्या कुटुंबियांना प्राप्त झाली आहेत.

नोटीसवर महाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव यांची स्वाक्षरी आहे.
आमदार लताबाई सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

आज सकाळी नोटीस मिळाली व त्यावर तत्काळ दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी २७ जून रोजी लेखी अभिप्राय करणेबाबत कळविण्यात आले आहे.

पारोळा येथील आमदार चिमणराव पाटील यांना ही नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या