Tuesday, September 15, 2026
HomeनगरAhilyanagar : 2 लाख 92 हजार मतदारांना निघणार नोटीस

Ahilyanagar : 2 लाख 92 हजार मतदारांना निघणार नोटीस

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

ज्या मतदारांची नावे 2002 च्या मतदार यादीशी जुळत नाहीत किंवा जुळणी प्रक्रियेत विसंगती आढळलेली आहे. अशा मतदारांना नोंदणी अधिकार्‍यांमार्फत नोटीस बजावण्यात येणार असून सादर करण्यात येणारे पुरावे आणि सुनावणीनंतर संबंधितांबाबत योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, नगर जिल्ह्यात 2002 च्या मतदार यादीतील जुळणी प्रक्रियेत विसंगती असणारे 2 लाख 92 हजार 449 मतदार आहेत. या सर्वांना आता नोटीसा धाडण्यात येणार आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात आधीच 4 लाख 26 हजार 930 मयत, स्थलांतरीत अथवा एकापेक्षा अनेक मतदारसंघात म्हणजेच दुबार नावे असणारी मतदार होते. या सर्वांची नावे प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहे. या सर्वांना मतदार यादीत पुन्हा नावे टाकण्यासाठी पुन्हा फार्मनंबर 6 आणि 7 भरून द्यावा लागणार आहे. हा अर्ज त्यांना सध्या, एसआयआर कार्यक्रमानंतर किंवा 2029 निवडणुकीपूर्वी कधीही भरता येणार आहे. दरम्यान, या शिवाय 2002 च्या यादीतील नावाशी विसंगती असणारी 2 लाख 92 हजार 449 मतदारांची नावे आहे. या सर्वांना आता मतदारसंघनिहाय नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून पुरावा घेण्यात येणार असून मतदार नोंदणी अधिकारी यांच्यावतीने त्यांची सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधीत मतदारांची नावे पुन्हा मतदार यादी घ्याची की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात नव्याने 57 मतदान केंद्र
दरम्यान, भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रक्रियेत मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचा आढावा घेण्यात आला असून, त्यानंतर जिल्ह्यात एकूण 3 हजार 881 मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. जिल्ह्यात एकूण 57 नवीन मतदान केंद्रांची भर पडणार आहे.

केंद्रांच्या रचनेत आवश्यक बदल
मतदारांची संख्या, मतदान केंद्रांची भौगोलिक स्थिती तसेच मतदारांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा विचार करून केंद्रांच्या रचनेत आवश्यक बदल सुचविण्यात आले आहेत. मतदान केंद्र सुसूत्रीकरण प्रक्रियेत केवळ नवीन मतदान केंद्रांची निर्मितीच नव्हे, तर विद्यमान केंद्रांचे विभाजन व विलीनीकरण करण्याचे प्रस्ताव आहेत. याशिवाय काही मतदान केंद्रांच्या नावात तसेच ठिकाणात बदल प्रस्तावित आहेत. मतदारसंख्या, भौगोलिक स्थिती आणि सुविधांचा विचार करून हे बदल करण्यात येत आहेत. अंतिम निर्णयानंतर रचना स्पष्ट होईल. ज्या ठिकाणी यापूर्वी 1 हजार 300 पेक्षा जास्त मतदार आहेत, अशा मतदान केंद्राचे विभाजन करण्यात येणार आहे.


ताज्या बातम्या

Shirdi : हरतालिकेच्या पूजा साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजा विक्री साहित्याच्या दुकानात हरतालिकाच्या पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम सापडल्याने एकच खळबळ उडाली असून साहित्य विक्री करणार्‍या विक्रेत्यावर...