Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedआता पॉलिटिकल पोस्टरबाजीसाठी स्वतंत्र जागा! 

आता पॉलिटिकल पोस्टरबाजीसाठी स्वतंत्र जागा! 

औरंगाबाद- Aurangabad

राजकीय पक्ष-संघटनांना पोस्टर्स-बॅनर्स लावण्यासाठी औरंगाबाद महापालिकेतर्फे आता जागा ठरवून दिल्या जाणार आहेत. येत्या दहा दिवसात या जागा ठरवल्या जाणार असून त्यावर पोस्टर-बॅनर्स लावण्यासाठीचे दर देखील जाहीर केले जाणार आहेत. या जागांशिवाय अन्य ठिकाणी पोस्टर्स – बॅनर्स लावल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील महानगरपालिकेकडून केली जाणार आहे.

- Advertisement -

महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग, झेंडे काढण्याची कारवाई सुरु केली आहे. त्यासाठी विशेष मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे. ही मोहीम सुरु असतानाच शासनाचे एक परिपत्रक महापालिका प्रशासनाच्या हाती पडले असून राजकीय पक्ष, संघटनांना पोस्टर्स-बॅनर्स लावण्यासाठी महापालिकेने जागा निश्‍चित करुन द्याव्यात असे त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार आता महानगरपालिकेचे प्रशासन जागा निश्‍चित करण्याच्या कामात गुंतले आहे.

याविषयी प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सर्व वॉर्ड अधिकार्‍यांकडून जागांची यादी मागवण्यात आली आहे. यादी प्राप्त झाल्यावर पोस्टर-बॅनर लावण्यासाठी ठराविक जागा निश्‍चित केल्या जातील. ही प्रक्रिया जास्तीत जास्त दहा दिवसात पार पडले. जागा ठरवण्याबरोबरच पोस्टर-बॅनर लावण्याचे शुल्क देखील महानगरपालिका जाहीर करणार आहे. जास्तीत जास्त पाच दिवसांपर्यंत संबंधितांना त्या जागेवर पोस्टर-बॅनर-झेंडा लावता येणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या