Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्याआता अवघ्या १ रुपयात 'असे' बुक करा रेल्वेचे तिकीट; जाणून घ्या सविस्तर

आता अवघ्या १ रुपयात ‘असे’ बुक करा रेल्वेचे तिकीट; जाणून घ्या सविस्तर

मुंबई | Mumbai

देशात रेल्वेची (Railway) तिकिटे बुक (Book tickets) करण्यासाठी प्रवाशांना (Passengers) वारंवार प्रयत्न करावे लागतात. अनेक वेळा प्रवाशाचे वेटिंग तिकीट कन्फर्म केले जाते. तर काही वेळेस प्रवाशांना जागा मिळत नसल्याने शेवटच्या क्षणी त्रासाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर तिकीट बुकिंग अॅप ट्रेनमॅनने (Ticket booking app Trainman) एक नवीन फिचर आणले आहे…

- Advertisement -

यामध्ये प्रवाशांना कन्फर्म ट्रेनच्या तिकिटाची हमी दिली जाणार आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचे ट्रेनचे (Train) तिकीट कन्फर्म झाले नसेल तर कंपनी (Company) तुम्हाला प्रवास करण्यासाठी विमानाचे तिकीट देईल.तसेच ट्रेनमॅन अॅपने ‘ट्रिप अॅश्युरन्स’ नावाचे एक नवीन वैशिष्ट्य लाँच केले आहे. या नव्या फीचरच्या मदतीने वेटिंग लिस्टेड रेल्वे प्रवासी आपला प्रवास पूर्ण करू शकतात.

या अॅपद्वारे जो कोणी रेल्वेचे तिकीट बुक करेल तो अॅपमध्येच आपल्या तिकिटाचे स्टेटस चेक करू शकतो. जर प्रवाशाला कन्फर्म तिकीट मिळाले नाही, तर तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे, हे अॅपवरून दिसेल. याशिवाय चार्ट बनवण्याआधी तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर प्रवासी ट्रिप अॅश्युरन्स फीचरच्या मदतीने शेवटच्या क्षणी विमान (Plane) तिकीट बुक करू शकतात.

दरम्यान, या अॅपमध्ये प्रवाशाचे तिकीट बुक होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक दिसत असेल तर अॅप १ रुपये ट्रॅप अॅश्युरन्स फी आकारेल. याशिवाय ९० टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कंपनी तिकिटाच्या क्लासच्या आधारे नाममात्र शुल्क आकारेल. तसेच चार्टिंगच्या वेळी रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले तर ट्रिप अॅश्युरन्स फी परत मिळेल. मात्र, तिकीट कन्फर्म न झाल्यास रेल्वेवाले प्रवाशाला प्रवास पूर्ण करण्यासाठी मोफत विमान तिकीट देणार आहेत.

या गाड्यांसाठी मिळणार सुविधा

ट्रिप अ ॅश्युरन्सचे सध्या सर्व आयआरसीटीसी राजधानी गाड्या आणि सुमारे १३० इतर गाड्यांसाठी उपलब्ध आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमन अॅप मशीन लर्निंगसारख्या नवीन युगातील तंत्रज्ञानाचा वापर करते आणि आयआरसीटीसीचे अधिकृत भागीदार आहे. प्रवाशांना अखंड प्रवासाचा अनुभव देण्यासाठी ट्रिप अॅश्युरन्स फीचर सुरू करण्यात आले आहे.

तसेच वेटिंग तिकीट कन्फर्म करण्याची शक्यता सांगण्यात ९० टक्के अचूक असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. याशिवाय जर तिकीट कन्फर्म झाले नाही तर कंपनी त्या व्यक्तीला मोफत विमान तिकीट देईल. मात्र, ज्या शहरांमध्ये विमानतळ आहेत, अशा शहरांसाठीच ट्रिप अॅश्युरन्सची ही सुविधा लागू असणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या