Friday, May 3, 2024
Homeनगरओबीसी आरक्षण बचावचा 30 तारखेचा मोर्चा स्थगित

ओबीसी आरक्षण बचावचा 30 तारखेचा मोर्चा स्थगित

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यभरात ओबीसींचे होणारे मोर्चे स्थगित करावेत, असे आवाहन मंत्री ना. छगन भुजबळ यांनी केले. यामुळे 30 तारखेला होणारा मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती समता परिषदेचे महानगर अध्यक्ष दत्ता जाधव यांनी दिली.

ओबीसींच्या आंदोलनासाठी नगर येथे नुकतीच राज्य सरचिटणीस अंबादास गारुडकर, पश्चिम विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे, जि.प.सदस्य शरद झोडगे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, प्रा. माणिकराव विधाते, अनिल बोरुडे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन त्यात 30 तारखेच्या आंदोलनाची तयारी करण्यात येऊन नियोजनही करण्यात आले होते.

मात्र, समता परिषदेचे संस्थापक तथा अन्न व पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार ओबीसी आरक्षणाबाबत भुमिका स्पष्ट झाली आहे. त्यामुळे राज्यातील पुढील आंदोलने स्थगित करण्यात आली असल्याचे महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी खासदार समीर भुजबळ, माजी आ. पंकज भुजबळ, कार्याध्यक्ष बापू भुजबळ यांनी जाहीर केले आहे.

यावेळी संजय लोंढे, राम पानमळकर, मयुर ताठे, गणेश नन्नवरे, महेश झोडगे, गणेश बनकर, दीपक झोडगे, निखिल शेलार, दीपक खेडकर, अशोक तुपे, जालिंदर बोरुडे, पिंटू गायकवाड, अशोक दहिफळे, काका शेळके, गिरीश जाधव, सचिन गुलदगड, अमित खामकर, अजय औसरकर, विष्णू फुलसौंदर, हरिभाऊ डोळसे, परेश लोखंडे, दीपक कावळे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या