Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशस्टील कारखान्यात विषारी वायूची गळती; चार कामगारांचा मृत्यू

स्टील कारखान्यात विषारी वायूची गळती; चार कामगारांचा मृत्यू

दिल्ली । Delhi

ओडिशातील रुरकेला स्टील कारखान्याच्या कोल केमिकल डिपार्टमेंटमध्ये बुधवारी सकाळी साडे नऊच्या दरम्यान विषारी वायु गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

- Advertisement -

कारखान्यात वायू गळती झाल्यावर सतर्क कर्मचाऱ्यांनी कंपनीबाहेर पडण्यासाठी धावाधाव केली. मात्र आफरातफरीत अनेकजण विषारी वायूच्या संपर्कात आले. त्यामुळे ४ जणांचा मृत्यू तर ६ जण जखमी झाले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या स्टील कारखान्यातील कोल केमिकल युनिटमध्ये कामगार दुरुस्तीचं काम करत होते, यावेळी ही दुर्घटना घडली. पोलीस विभागाने या प्रकरणाची दखल घेतली असून चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, दुर्घटनेनंतर सर्व आपत्कालिन बाबी सुरु करण्यात आल्या असून याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती प्रकल्पाच्या अधिकऱ्यांनी दिली.

काम सुरु असताना विषारी वायूची गळती सुरु झाल्याने कामगारांना सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटायला लागलं. ज्यांची प्रकृती बिघडली होती त्यांना तातडीने इस्पात जनरल हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान चार जणांचा मृत्यू झाला. गणेशचंद्र पलिया (वय ५९), अभिमन्यू साहू (वय ३३), रबिंद्र साहू (वय ५९) आणि ब्रह्मानंद पांडा (वय ५१) अशी मृत कामगारांची नावं आहेत. मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्टर स्टार कन्स्ट्रक्शन कंपनीने या कंत्राटी कामगारांना या प्रकल्पात दुरुस्तीच्या कामासाठी आणलं होतं, असं प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. रुरकेला पोलाद प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चत्राज यांनी मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना त्यांना सर्व प्रकारची शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच त्यांनी देखील या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या