नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ओडिशाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. कटक मंडळाचे खाण उपसंचालक देबब्रत मोहंती याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले आहे. त्याच्या घरातून बॅगमध्ये भरलेल्या नोटांचे गठ्ठे जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खाण विभागाच्या उपसंचालकांच्या भुवनेश्वर येथील फ्लॅटमधून एकूण ४ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार कटक सर्कलमधीली खाणींचे उप संचालक म्हणून तैनात असलेले देवव्रत मोहंती यांना ओडिशा दक्षता विभागाने आधी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. त्यांच्यावर एक परवानाधारी कोळसा व्यापाऱ्याकडून त्याच्याकडील कोळसा डेपो व्यवस्थित चालवण्यासाठी आणि कोळशाच्या वाहतुकीला परवानगी देण्याच्या बदल्यात पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. ही कारवाई करण्यासाठी मंगळवारी दक्षता विभागाने सापळा रचला आणि मोहंती याला ३० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली आहे.
BMC Budget 2026: मोठी बातमी! मुंबईत विकासासाठी मोठी चाल; महापालिका मोडणार 36 हजार कोटींच्या ठेवी
मोहंती यांच्या अटकेनंतर ‘ओडिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्याशी संबंधित त्यांच्या कटक येथील शासकीय कार्यालय, भद्रक येथील त्यांचे वडिलोपार्जित घर, भुवनेश्वर येथील त्यांचा आलिशान फ्लॅटवर एकाचवेळी छापे टाकण्यात आले.
भुवनेश्वरमधील फ्लॅटची झडती घेतली असता, अधिकाऱ्यांना एका ट्रॉली बॅगमध्ये नोटा सापडल्या. मोजणी केली असता, एकूण रक्कम ₹४ कोटी आढळली. त्याव्यतिरिक्त, मोहंती यांच्या ऑफिसच्या ड्रॉवरमधून ₹१.२० लाख रोख जप्त करण्यात आले. आतापर्यंत जप्त केलेल्या इतर मालमत्तेत भुवनेश्वरमधील एक आलिशान दुमजली घर आणि अंदाजे १३० ग्रॅम सोने देखील आहे.





