Friday, May 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजRohit Pawar: डीसीपींना कोणाचा फोन? एफआयआर नोंदवताना पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं?...

Rohit Pawar: डीसीपींना कोणाचा फोन? एफआयआर नोंदवताना पोलिस ठाण्यात नेमकं काय घडलं? रोहित पवारांनी सगळं सांगितलं

मुंबई | Mumbai
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी आज मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात प्रचंड राडा पाहायला मिळाला. आमदार रोहित पवार आणि त्यांचे सहकारी आक्रमकपणे एफआयआर दाखल करण्यासाठी पोहोचले होते, मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने रोहित पवारांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. “डीसीपींना कोणाचा फोन आला आणि त्यांनी प्रक्रिया थांबवली?” असा थेट सवाल त्यांनी विचारला आहे.

डीजीसीएची देखील जबाबदारी असून त्यांच्याविरूद्ध देखली FIR दाखल करण्याची मागणी केली. मात्र वरिष्ठ अधिकारी प्रविण मुंडे यांनी एफआयआर दाखल करून घेण्यास नकार दिल्यानं वाद निर्माण झाला होता. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी अधिकाऱ्यांना कोणाता फोन आला होता का अशी शंका उपस्थित केली.

- Advertisement -

रोहित पवार हे आज राष्ट्रवादी अजित पवार गाटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार गटाचे काही आमदार घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात डीजीसीए विरूद्ध तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतली नाही. यावेळी माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “या अपघातात डीजीसीएचा हस्तक्षेप स्पष्टपणे दिसत आहे. त्यांनी २५ पैकी केवळ ५ विमाने बंद करून कारवाईचा दिखावा केला आहे. आमच्याकडे नवीन कायद्याचे पुस्तक आहे, ज्यातील नियमांचे उल्लंघन झाले आहे. पोलीस कर्मचारी जाधव, माळी, अटेंडर आणि पायलट या सर्वांचा मृत्यू झाला आहे, ही घटना सर्वांना माहीत असताना पोलीस टाळाटाळ का करत आहेत?”, असा सवाल त्यांनी केला.

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात राडा! रोहित पवार-अमोल मिटकरी भिडले, पोलिसांशी जोरदार शाब्दिक चकमक

डीसीपी आले अन् म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार नाही
अजितदादांच्या विमान अपघातात पाच लोकांचा मृत्यू झाला. ही सर्व घटना आता सर्वांना माहिती आहे. एफआयआर करताना एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याशी वाद झाला. त्यावेळी कनिष्ठ अधिकाऱ्याने हुज्जत घातली. एफआयआर नोंदवायला सुरुवात झाली होती. माझं स्टेटमेंट नोंदवायला सुरूवात झाली तेव्हाच एका मोठी अधिकारी तिथे आले. डीसीपी तिथे आले, ते म्हणाले गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करा आम्ही एफआयआर दाखल करून घेऊ शकत नाही. तुम्हाला कुणाला सांगायचे ते सांगा आम्ही गुन्हा नोंदवणार नसल्याचे अधिकारी म्हणाले. मग त्यांना कोणत्या मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असा सवाल रोहित पवार यांनी केला.

धक्कादायक! मालेगाव मनपा विद्युत अधीक्षक कार्यालयात संतप्त नागरिकांकडून सामूहिक नमाजपठण, नेमकं कारण काय?

कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली?
रोहित पवार यांनी अत्यंत संतप्तपणे विचारले की, “एफआयआर दाखल करणे हा आमचा घटनादत्त अधिकार आहे. पोलीस आम्हाला आमचा अधिकार का वापरू देत नाहीत? कोणाच्या दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आली आहे? आम्ही आज इथे हक्कासाठी आलो होतो, अजितदादांना न्याय मिळत नाही. तिथे सामान्यांचे काय होत असेल असा सवाल त्यांनी केला.

आमचा उपमुख्यमंत्री गेला आहे अपघातात, त्याचा FIR का नाही? रोहित पवारांचा हताश सवाल
रोहित पवारांनी पुढे म्हटले की, मराठी माणूस होता. आमचा माणूस होता म्हणून FIR घेतले नाही का? असा सवाल करताना दिल्लीत काँग्रेसने शर्ट काढले तर FIR घेतला, अपघात झाला तर FIR होतो. मग आमचा उपमुख्यमंत्री गेला आहे अपघातात, त्याचा FIR का नाही? असा हताश सवाल त्यांनी केला.उद्या सकाळी १० वाजता बारामती येथे जाऊन दादा यांनी बांधलेल्या इमारतीत जाऊन FIR दाखल करणार असून तिथे तरी एफआयआर दाखल होतोय का हे पाहणार असल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...