Sunday, September 27, 2026
HomeनगरCrime News : निर्मलनगर परिसरात घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण

Crime News : निर्मलनगर परिसरात घरात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सावेडी उपनगरातील निर्मलनगर परिसरामध्ये हळदीच्या कार्यक्रमानंतर जुन्या वादातून घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांसह इतर पाच ते दहा जणांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण विष्णू तांबे यांनी या संदर्भात शुक्रवारी (15 मे) सायंकाळी फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी किरण तांबे हे गोविंद इंगळे यांच्याकडील हळदीचा कार्यक्रम संपवून आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले होते. त्यावेळी संशयित आरोपी गोविंद इंगळे, गोपाल इंगळे, जय इंगळे आणि गणेश इंगळे यांनी त्यांच्या इतर पाच ते दहा नातेवाईक व मित्रांसह तांबे यांच्या घरात अनाधिकृतपणे प्रवेश केला.

सर्व आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी घरातील सदस्यांना बाजूला ढकलून देण्यात आले. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, पोलीस अंमलदार दीपक गांगुर्डे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik News : कुटुंबांवर नियतीचा घाला; नाशिकमध्ये वेगवेगळ्या घटनांत तिघांचा बुडून...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik गणरायाला निरोप देण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबावर (Family) नियतीने काळाचा घाला घातला. गणपती विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) घरकुल योजना परिसरातील...