नवी दिल्ली | New Delhi
२०२८ साली लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) होणाऱ्या ऑलिम्पिक (Olympics) स्पर्धेत तब्बल १२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट दिसणार आहे. याबाबतचे अधिकृत वेळापत्रक (Time Table) आयोजकांनी जाहीर केले असून, यामध्ये पुरुष व महिला दोन्ही गटांचा समावेश आहे. या स्पर्धेची सुरुवात १२ जुलै २०२८ रोजी होणार आहे.
यामध्ये पुरुषांचा सुवर्णपदक सामना २९ जुलैला, तर महिलांचा (Woman) अंतिम सामना २० जुलैला खेळविण्यात येणार आहे. तसेच ही स्पर्धा लॉस एंजेलिसपासून ५० किमी अंतरावर असलेल्या पॉमेना शहरातील (City) फेअरग्राउंड्स स्टेडियम येथे होणार आहे. या स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ६ संघ भाग घेणार असून, एकूण १८० क्रिकेटपटू मैदानावर खेळणार आहेत.
दरम्यान, आयोजकांच्या माहितीनुसार दररोज दोन सामने (Match) खेळवले जातील. तसेच २०२८ सालच्या ऑलिम्पिकमध्ये अमेरिका आणि वेस्टइंडीजला देखील स्थान देण्यात आले आहे. याआधी १९०० साली पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झाली होती. त्यावेळी फक्त फ्रान्स आणि ग्रेट ब्रिटन हे दोनच संघ सहभागी झाले होते.यामध्ये ब्रिटनने १५८ धावांनी सामना जिंकून सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले होते.
भारतीय संघ सहभागी होणार?
२०२८ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचा सहभाग निश्चित होण्याची शक्यता आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर आता सर्वांचे लक्ष भारताच्या ऑलिम्पिकमधील यशाकडे लागले आहे. भारतासोबतच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दोन देश देखील स्पर्धेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
ऑलिम्पिक २०२८ चे खेळांनुसार वेळापत्रक
३x३ बास्केटबॉल : १६ जुलै ते २२ जुलै, २०२८
तिरंदाजी : २१ जुलै ते २८ जुलै, २०२८
आर्टिस्टिक जिम्नस्टिक्स : १५ जुलै ते २५ जुलै, २०२८
आर्टिस्टिक स्विमिंग : २५ जुलै ते २९ जुलै, २०२८
अॅथलेटिक्स : १५ जुलै ते ३० जुलै, २०२८
बॅडमिंटन : १५ जुलै ते २४ जुलै, २०२८
बेसबॉल : १५ जुलै ते २० जुलै, २०२८
बास्केटबॉल : १२ जुलै ते ३० जुलै, २०२८
बीच व्हॉलीबॉल : १५ जुलै ते २९ जुलै, २०२८
बीएमएक्स फ्रीस्टाइल : २८ जुलै ते २९ जुलै, २०२८
बीएमएक्स रेसिंग : १५ जुलै ते १६ जुलै, २०२८
बॉक्सिंग : १५ जुलै ते ३० जुलै, २०२८




