Sunday, September 29, 2024
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

मोठी बातमी! लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड

नवी दिल्ली | New Delhi

विरोधकांना लोकसभेचे उपाध्यक्षपद न दिल्यामुळे इंडिया आघाडीने अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, यानंतर आज प्रत्यक्ष लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीवेळी विरोधी पक्षांनी मतदान घेण्याची मागणी न केल्याने भाजपप्रणीत एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला (OM Birla) यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी आवाजी मतदानाने निवड झाली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : विधानपरिषदेच्या मतदारसंघांसाठी सकाळपासून मतदान सुरु; मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या १३ घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान,सुनील तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिले. यानंतर हंगामी लोकसभा अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी त्यांच्या निवडीची घोषणा केली.

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना सन्मानाने लोकसभा अध्यक्षांच्या आसनाकडे नेत स्थानापन्न केले. तर के. सुरेश (k Suresh) यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. त्याला एन.के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले.

हे देखील वाचा : वर्षा बंगल्यावर बैठकांचा सिलसिला; मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री बंद दाराआड चर्चा

दरम्यान, बिर्ला हे सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. बिर्ला हे राजस्थानातील कोटा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याशिवाय त्यांनी १७ व्या लोकसभेत देखील लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. हंगामी अध्यक्ष बतृहारी महताब यांनी ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ओम बिर्ला यांचे अभिनंदन केले.

आवाजी मतदानाने निवड

ओम बिर्ला आणि के. सुरेश यांचे प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्ष भर्तृहरी महताब यांनी आवाजी मतदान घेतले. त्यानंतर आवाजी मतदानाने ओम बिर्ला यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महताब यांनी केली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या