Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंची मनसे कार्यकर्त्यांसाठी खास पोस्ट; वाढदिवसाआधी मनसैनिकांना केले आवाहन

राज ठाकरेंची मनसे कार्यकर्त्यांसाठी खास पोस्ट; वाढदिवसाआधी मनसैनिकांना केले आवाहन

मुंबई | Mumbai

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा येत्या 14 जून रोजी वाढदिवस आहे. ते यावर्षी आपला 55 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. राज ठाकरेंच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रसैनिक हे शिवतिर्थावर (Shivtirtha) येत असतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावेळी राज ठाकरेंनी एक पत्रक काढत महाराष्ट्रसैनिकांना एक आवाहन केले आहे.

- Advertisement -

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसापूर्वी फेसबुक पोस्ट (Raj Thackeray Facebook Post) केली आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी यावर्षीच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना विनंती करत भेटवस्तू म्हणून काही खास गोष्टी मागितल्या असून राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Accident News : शनी भक्तांवर काळाचा घाला! भीषण अपघातात चार ठार

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात की, दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, मिठाई आणि भेटवस्तू घेऊन येतात. पण या वर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका.

तुम्हाला अगदीच काही आणावंसं वाटत असेल तर येताना झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणा. तुम्ही दिलेली झाडांची रोपं आपण विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ. आणि जे काही शैक्षणिक साहित्य भेटवस्तू म्हणून आणाल ते गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ. तुम्ही माझ्या ह्या विनंतीचा नक्की मान ठेवाल ह्याची मला खात्री आहे,’ अशा शब्दांत राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

Accident News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चार प्रवाशांचा मृत्यू तर चार गंभीर जखमी

या फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी वाढदिवसाच्या दिवशी ते किती वाजता कार्यकर्त्यांना भेटू शकतात ही वेळ देखील सांगितली आहे. ‘सकाळी ८.३० ते १२ वाजेपर्यंत मी उपस्थित असेन. तेंव्हा भेटूया १४ जूनला.’, असे त्यांनी या पोस्टमध्ये सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या