Friday, August 21, 2026
Homeनगरपंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी रेल्वेची खास घोषणा

पंढरपूरला जाणार्‍या वारकर्‍यांसाठी रेल्वेची खास घोषणा

नगर जिल्ह्यातील भाविकांना होणार लाभ || कोपरगाव, श्रीरामपूर आणि अहिल्यानगर थांबे

सोलापूर | Solapur

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकर्‍यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने मोठा दिलासा दिला आहे. यंदा आषाढी वारीसाठी 54 विशेष रेल्वे फेर्‍या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणार्‍या विशेष गाड्यांचा समावेश असून, बहुतांश गाड्या अनारक्षित असणार आहेत.

- Advertisement -

पंढरपूरला जोडणार्‍या रेल्वे फेर्‍या त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-
नागपूर – मिरज आषाढी विशेष (4 फेर्‍या) – गाडी क्र. 01205 विशेष नागपूरहून दि. 23 व 24 जुलै 2026 रोजी सकाळी 08.50 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी सकाळी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)

पंढरपूर आगमन/प्रस्थान: सकाळी 08.00 / 08.25 – गाडी क्र. 01206 विशेष मिरजहून दि. 24 व 25 जुलै 2026 रोजी दुपारी 12.55 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी दुपारी 12.25 वाजता नागपूर येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)

पंढरपूर आगमन/प्रस्थान: दुपारी 03.55 / 05.00 – थांबे : अजनी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमहंकाळ, सलगरे आणि अरग.

रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी (2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण 18 डबे.

नवीन अमरावती – पंढरपूर आषाढी विशेष (4 फेर्‍या) –

गाडी क्र. 01119 विशेष नवीन अमरावतीहून दि. 21 व 24 जुलै 2026 रोजी दुपारी 2.40 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी सकाळी 9.10 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)

गाडी क्र. 01120 विशेष पंढरपूरहून दि. 22 व 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी दुपारी 12.50 वाजता नवीन अमरावती येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)

थांबे: बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, जळंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी (2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण 18 डबे.

खामगाव – पंढरपूर आषाढी विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01121 विशेष खामगावहून दि. 22 व 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)
गाडी क्र. 01122 विशेष पंढरपूरहून दि. 23 व 26 जुलै 2026 रोजी पहाटे 5.00 वाजता सुटेल व त्याच दिवशी सायंकाळी 7.30 वाजता खामगाव येथे पोहोचेल. (2 फेर्‍या)

थांबे: जळंब, नंदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.

रचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 6 सामान्य द्वितीय श्रेणी (2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह) – एकूण 18 डबे.

भुसावळ – पंढरपूर अनारक्षित आषाढी विशेष (4 फेर्‍या)
गाडी क्र. 01159 विशेष भुसावळहून दि. 24 व 25 जुलै 2026 रोजी दुपारी 1.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल.
गाडी क्र. 01160 विशेष पंढरपूरहून दि. 25 व 26 जुलै 2026 रोजी रात्री 10.30 वाजता सुटेल व दुसर्‍या दिवशी दुपारी 1.00 वाजता भुसावळ येथे पोहोचेल.
थांबे: जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड आणि कुर्डुवाडी.
रचना: 18 सामान्य द्वितीय श्रेणी डबे (2 लगेज-कम-गार्ड ब्रेक व्हॅनसह).

आरक्षण व तिकीट बुकिंग
विशेष शुल्कासह चालविण्यात येणार्‍या आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच संकेतस्थळावर उपलब्ध राहील. अनारक्षित डब्यांसाठी तिकिटे रेल्वे स्थानकांवरील बुकिंग काउंटर तसेच अ‍ॅपद्वारे उपलब्ध असतील. प्रवाशांनी वैध तिकिटासह प्रवास करून गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

पडसाद : सत्तेचा सोहळा आणि निष्ठेची उपेक्षा!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक राजकारणात तत्त्व, निष्ठा, विचार आणि संघटनात्मक कार्यापेक्षा सत्ता व लाभाच्या पदांना आज किती महत्त्व आले आहे,...