Sunday, June 8, 2025
Homeनगरनगरमध्ये करोना पॉझिटिव्हचा मृत्यू; आणखी २७ पॉझिटिव्ह

नगरमध्ये करोना पॉझिटिव्हचा मृत्यू; आणखी २७ पॉझिटिव्ह

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

- Advertisement -

नगर शहरातील एका किरणामालाचे व्यापारी यांचा शनिवारी रात्री निधन झाले आहे. संबंधीत व्यापारी हा करोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या उपचार सुरू असतांना त्याचे निधन झाले असले तरी मृत्यू कारण समजू शकले नसल्याचे महापालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शनिवारी उशीरा जिल्ह्यात आणखी २७ करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या करोना तपासणी प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालात नगर शहरातील २५ तर संगमनेर आणि नेवासा तालुक्यातील सोनई येथील एका रुग्णांचा समावेश आहे. शनिवारी दिवसभरात करोना रुग्णांच्या आकडेवारीचा उच्चांक समोर आला. आधी १६ सरकारी त्यानंतर ४७ खासगी प्रयोग शाळेचे आणि रात्री उशीरा पुन्हा २७ सरकारी प्रयोग शाळेचे असे ९० करोना पॉझिटिव्ह रुग्ण नव्याने समोर आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

0
चांदवड । प्रतिनिधी Chandwad तालुक्यातील राहुड येथील पाडगण मळा येथे घराबाहेर पोर्चमध्ये झोपलेल्या महिलेवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढविल्याने ती गंभीर जखमी झाली....