Thursday, May 2, 2024
Homeनाशिकअज्ञात चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

अज्ञात चारचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पायी जाणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना म्हसरूळ (Mhasrul) येथे घडली आहे…

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार अनिल बाळकृष्ण भालेराव (Anil Balkrishna Bhalerao) (६१,रा.मोहिनीराज बंगलो, शनी मंदिराच्या मागे, गजपंथ स्टॉप, दिंडोरी रोड म्हसरूळ, नाशिक) हे रात्री १०:३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाचा मित्र नानासाहेब कचरू रुकरे व प्रकाश कारभारी सुर्यवंशी यांच्यासह जेवण आटपून बाहेर फिरायला गेले होते.

जिल्हा वकील संघ निवडणूक : ‘पाहा’ आतापर्यंतची आकडेवारी

म्हसरूळ गावाकडून साईबाबा मंदिराकडे पायी जात असताना पाठी मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात (Accident) अनिल भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला तर नानासाहेब रुकरे हे गंभीर झाले.

सावाना निवडणुकीत दोन्ही पॅनलमध्ये शाब्दिक बाचाबाची

याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात (Mhasrul Police Station) अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक व्ही. के. माळी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या