इगतपुरी | प्रतिनिधी | Igatpuri
येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai Aagra Highway) नांदगावसदो फाट्यावर ( Nandgaon Sado Phata) शनिवारी पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात(Accident) घडला आहे…
या अपघातात १ जण जागीच ठार (Killed) झाला असून १ जण गंभीर जखमी (injured) आहे. या भीषण अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकलेले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यातील चालक जागीच ठार झाला होता तर गंभीर जखमी क्लीनरला पुढील उपचारासाठी टोलनाक्याच्या रुग्णवाहिकेने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) दाखल करण्यात आले.
एम. एच २० ए. एल. ३९७७ या क्रमांकाच्या आयशर वाहनाने एच. आर. ४६, इ. १७१६ या कंटेनरला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात चालक संजीव कुमार (Sanjiv Kumar) (वय २२) रा. फिरोजाबाद, उत्तरप्रदेश हा जागीच ठार झाला आहे. तर क्लीनर गंभीर जखमी असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तसेच महामार्गावरील या परीसरात खड्डयांचे साम्राज्य पसरले असल्यानेच अपघात घडल्याचे बोलले जात असून यावेळी घोटी महामार्ग पोलीस (Ghoti Highway Police) केंद्राचे पोलीस कर्मचारी हरिश्चंद्र गुजरे, जितू पाटोळे, अनिकेत जाधव, सागर कापसे, इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे, पोलीस कर्मचारी विजय रुद्रे, ए. एस. बोराडे, देवा वाघ यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य, रूट पेट्रोलिंग टीम यांनी अपघातस्थळी मदतकार्य केले.
दरम्यान, या अपघातामुळे काही काळासाठी वाहतुक खोळंबली होती. मात्र महामार्ग सुरक्षा पोलीसांनी (Highway Security Police) मदतकार्य करत वाहतुक सुरळीत केली.