Saturday, November 14, 2026
HomeनाशिकNashik Crime News : देवळा तालुक्यात वादातून एकाची हत्या

Nashik Crime News : देवळा तालुक्यात वादातून एकाची हत्या

संशयित आरोपी ताब्यात

- Advertisement -

देवळा | Deola

तालुक्यातील मटाणे येथे वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली असून पोलीसांनी संशयित आरोपीस ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, मटाणे येथील कांदा व्यवसाय करणारे दिपक निंबा साबळे (वय ४५) व रंगकाम करणारा संतोष पवार उर्फ ज्वाल्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास दोघांमध्ये काही कारणावरून झालेल्या वादातून संतोष पवार याने धारदार शस्त्र दिपक साबळे याच्या छातीत खूपसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी संतोष पवार यास अटक केली असून याबाबत मयताची बहीण अजनाबाई निक्षे यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, उपनिरीक्षक दामोदर काळे, दिपक पाटील व सहकारी पुढील तपास करीत आहे.

घटनेनंतर मयताचे नातेवाईकांनी आक्रोश करत देवळा पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी करत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी काही काळ रस्त्यावर ठाण मांडले होते.

ताज्या बातम्या

आदिवासी तरुणांच्या कला, क्रीडा व कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा...

0
नाशिक 14 (जिमाका वृत्तसेवा): आदिवासी समाजातील तरुण-तरुणींच्या कला, क्रीडा आणि विविध क्षेत्रांतील सुप्त गुणांना योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या...