Friday, May 3, 2024
Homeधुळेवाकपाडा रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार

वाकपाडा रस्त्यावर दुचाकी अपघातात एक ठार

बोराडी । वार्ताहर Boradi

शिरपूर तालुक्यातील नवागाव वाकपाडा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. राकेश गोविंदा पावरा (वय 22 रा. अंबाडूपाडा) असे मयताचे नाव आहे.

- Advertisement -

नवागाव येथून राकेश गोविंदा पावरा हा वकवाड येथे मोटरसायकलने जात असतांना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलीला जोरदार धडक दिली. या धडकेत राकेश पावरा हा जागीच मयत झाला.

घटनेनंतर मयताचा भाऊ गोपाल गोविंदा पावरा यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून राकेश गोविंदा पावरा याला मृत घोषित केले. याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या