Friday, May 3, 2024
Homeनाशिकआयटीआयसाठी एक लाख अर्ज

आयटीआयसाठी एक लाख अर्ज

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

खासगी आणि शासकीय ‘आयटीआय’ प्रवेशासाठी 1 ऑगस्टपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही सर्व प्रवेशप्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईनद्वारे होत असून प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत 1 लाख 30 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 1 लाख 7 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहे. त्यातील 93 हजार 520 विद्यार्थ्यांनी अर्जाचे शुल्क भरून अर्जनिश्चितीही केली आहे.

अर्ज करण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने अर्जाची संख्या आणखी वाढणार आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयकडून देण्यात आली. राज्यात शासकीय ‘आयटीआय’ची संख्या 417 तर खासगी संस्थांची संख्या 569 आहे.

या दोन्ही प्रकारच्या संस्थांमध्ये मिळून 1 लाख 45 हजार 632 प्रवेश क्षमता आहे. आतापर्यंत 1 लाख 29 हजार 742 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 लाख 7 हजार 23 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत.

तसेच 75 हजार 81 विद्यार्थ्यांनी पसंतीक्रमही भरला आहे. गतवर्षी आयटीआय प्रवेशासाठी सव्वा तीन लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 लाख 17 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची मुदत : 1 ते 14 ऑगस्ट

प्राथमिक गुणवत्ता यादी : 16 ऑगस्ट

यादीवरील हरकती नोंदवणे : 16 ते 17 ऑगस्ट

अंतिम गुणवत्ता यादी : 18 ऑगस्ट

पहिली प्रवेश फेरी : 20 ऑगस्ट

- Advertisment -

ताज्या बातम्या