Monday, May 20, 2024
Homeदेश विदेशKuno Sanctuary : कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत ७ चित्त्यांनी...

Kuno Sanctuary : कुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; आतापर्यंत ७ चित्त्यांनी गमावला जीव

दिल्ली | Delhi

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात या वनक्षेत्रात मृत्यू झालेला हा सातवा चित्ता आहे. ‘तेजस’ (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अभयारण्यातील पथकाला मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ‘तेजस’ या नर चित्ताच्या मानेवर जखम दिसली होती. त्यानंतर पालपूर येथून पशू वैद्यकीय प्राण्यांच्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता तेजसची जखम गंभीर असल्याचे आढळले. यानंतर तेजसला बेशुद्ध करून उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र त्यानंतर तेजस शुद्धीवर आलाच नाही. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळून आला. सध्या तेजसला झालेल्या दुखापतींबाबत तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, आपापसात झालेल्या संघर्षातून तेजसचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. आतापर्यंत कुनो अभयारण्यात २० चित्ते आणण्यात आले होते. यातील चार चित्त्यासह तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे. सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता २३ एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा ९ मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता तेजस नावाच्या चित्त्याचाही मृत्यू झाला आहे.

“आपल्या देशातील नेते अशिक्षित, ज्यांच्याकडे…”; अभिनेत्री काजोलचं विधान चर्चेत

- Advertisment -

ताज्या बातम्या