Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमNashik News : लोकअदालतीत १ हजार प्रकरणे निकाली; ५७ कुटुंबांतील वाद मिटला

Nashik News : लोकअदालतीत १ हजार प्रकरणे निकाली; ५७ कुटुंबांतील वाद मिटला

मृतांच्या वारसांना १५ कोटींची भरपाई

नाशिक | Nashik

राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईच्या (Mumbai) आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नाशिक जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. २८) आयोजित लोकअदालतीत (Lok Adalat) २,०१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) एस. डी. जगमलानी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या लोकअदालतीत मोटार अपघात, कामगार, कौटुंबिक वाद, फौजदारी प्रकरणांमध्ये अनेकांना दिलासा देण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Political Special : ‘शिवस्वराज्य यात्रा’ कोणत्या उमेदवाराला पावणार?

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एम. व्ही. बुराडे यांनी लोकअदालतीबाबत माहिती दिली. लोकअदालतीत सर्वाधिक ८६३ मोटार अपघाताची (Accidents) प्रकरणे ठेवण्यात आली. या प्रकरणांमध्ये २२२ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, अपघातात जखमी तसेच मृतांच्या वारसांना तब्बल १५ कोटी ५२ लाख ९७ हजार ६९५ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली.

हे देखील वाचा : Maharashtra Cabinet Meeting : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा धडाका; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ ३८ महत्वाचे निर्णय

तर नाशिकरोड (Nashik Road) येथील मोटार वाहन न्यायालय येथे २,०१९ प्रकरणांमध्ये १८६ प्रकरणे निकाली काढली आहेत.तसेच ५७ कौटुंबिक वाद प्रकरणांमध्ये तडजोड झाली. तडजोडीमुळे सर्व ११४ प्रकरणांमधील संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. यावेळी जिल्हा व तालुका न्यायालयात (Taluka Court) एकूण ४८ पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. सर्व पॅनलप्रमुख, सदस्य व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी तडजोडीसाठी काम केले.

हे देखील वाचा : Nashik News : ‘लाडकी बहीण’ योजनेचे मनपाकडून ६ हजार अर्ज रद्द

तडजोड रक्कम वसूल

दावा दाखलपूर्व प्रकरणांमध्ये एक लाख ८८ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी सात हजार २२७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, नऊ कोटी २२ लाख ६९ हजार २७१ इतकी वसुली झाली, तर प्रलंबित व दावादाखलपूर्व प्रकरणे मिळून नऊ हजार २४६ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. ही तडजोड झाल्यामुळे सर्व प्रकरणांमध्ये ५८ कोटी ४० लाख ९९ हजार रुपये वसुली झाली.

हे देखील वाचा : Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

निकाली प्रकरणे

धनादेश न वटणे – ४३९
मोटार अपघात – २२२
कामगारविषयक – ७
कौटुंबिक वाद – ५७
फौजदारी तडजोडपात्र – ४०१
इतर -८९३

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या