Wednesday, September 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ - मुख्यमंत्री...

राज्यातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई / प्रतिनिधी Mumbai


राज्यातील अमराठी ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी उत्तर भारतीयांचा रोष टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याशिवाय या निर्णयाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी केल्याचे मानले जाते.

- Advertisement -

महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालविणाऱ्या अमराठी चालकांना प्रवाशांशी मराठीतून संवाद साधता यावा, यासाठी परिवहन विभागाने कायद्यात सुधारणा केली. याशिवाय १०५ दिवसांचा विशेष मराठी भाषा प्रशिक्षण उपक्रम राबवला. जुजबी मराठी न बोलणाऱ्या अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कायद्यात कारवाईची तरतूद आहे. परिवहन विभागाकडून तशी कारवाई सुरु झाल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमराठी चालकांची मागणी लक्षात घेऊन त्यांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली होती.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते हाजी अराफत शेख यांच्या नेतृत्वाखालील ऑटोरिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर फडणवीस यांनी अमराठी ऑटो रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकण्यासाठीच्या निर्णयाला एक वर्षाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले.

महाराष्ट्रात सर्व चालकांना जुजबी मराठी बोलता आले पाहिजे याबाबत त्यांचे समर्थनच आहे. ते शिकण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण चालक विविध वयोगटातील असल्याने त्यांना इतक्या कमी वेळात मराठी शिकणे शक्य नसल्याची अडचण सांगत त्यांनी मुदतवाढ मागितली. ही मागणी मान्य करत त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली असून या वर्षभरात ते क्लासेस तसेच इतर माध्यमातून मराठी शिकतील. या दरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

Nashik Simhastha News : सिंहस्थासाठी १३६ ठिकाणी आरोग्य सुविधा; पर्वणीला १९०...

0
नाशिक | Nashik सिंहस्थ महाकुंभमेळ्यात (Simhastha Kumbhmela) नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन उपचाराची सुविधा केवळ रुग्णालयांपुरती मर्यादित न ठेवता भाविकांच्या गर्दीच्या ठिकाणीच...