Thursday, October 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजउद्या लासलगावला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन; आ. रोहित पवार करणार नेतृत्व

उद्या लासलगावला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन; आ. रोहित पवार करणार नेतृत्व

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

राज्यभरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी अंतिम टप्प्यात आली असून बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. मात्र, कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या सोमवारी, दि. १८ मे २०२६ सकाळी ९ वाजता लासलगाव बाजार समिती आवारात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲअ‍ॅड. माणिकराव शिंदे यांनी दिली आहे.

अनेक ठिकाणी कांदा विक्रीनंतर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाही. काही शेतकऱ्यांना तर कांदा विकल्यानंतर हातात एक रुपयाचेदेखील उत्पन्न राहत नसल्याची धक्कादायक आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घाम गाळून पिकवलेल्या मालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सरकारने या विषयात तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य हमीभाव आणि न्याय मिळवून द्यावा, हीच या आंदोलनाची मुख्य मागणी असणार असल्याचे ॲड. शिंदे यांनी यावेळी सांगितले. कांदा उत्पादकांच्या या न्याय्य हक्काच्या लढ्याला बळ देण्यासाठी परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज घेण्यासाठी झुंबड; दाखल करणार्‍यांची मात्र प्रतीक्षा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असताना उमेदवारी अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, अर्जांची विक्री मोठ्या प्रमाणात होत...