Friday, September 20, 2024
Homeदेश विदेशकांदा होणार 30 रुपये किलो!

कांदा होणार 30 रुपये किलो!

नवी दिल्ली –

- Advertisement -

देशभरात वाढत असलेल्या कांद्याच्या किमती कमी करण्यासाठी नाफेडने खास योजना तयार केली आहे. दिवाळीच्या हंगामात कांदा स्वस्त दरात

उपलब्ध करण्यासाठी नाफेडने राजस्थानातून कांदा मागविला आहे. यामुळे पुढील आठवड्यातच कांदा 30 रुपये किलोवर येईल अशी माहिती नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिली आहे. याबाबतचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे.

राजस्थानात यावर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणात पीक झाले आहे. महाराष्ट्रात कांद्याची आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ असली, तरी परतीच्या पावसाने प्रचंड थैमान घातल्याने, कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिकच्या लासलगाव येथे कांदा महाग झाल्याने त्याचा परिणाम देशाच्या अन्य भागांमध्येही दिसून आला.

आता राजस्थानातून कांदा येणार असल्याने, कांद्याचा भाव उतरणार आणि लवकरच 30 रुपये प्रती किलो या दराने त्याची विक्री होणार असल्याची माहिती अशोक ठाकूर यांनी दिली.

नाफेडने आपल्या गोदामातूनही राज्यांना कांदा पाठविला आहे. हा कांदा आम्ही राज्यांना 21 रुपये प्रती किलो या दराने उपलब्ध केला आहे. वाहतूक आणि इतर खर्च जोडून राज्य सरकार तो कांदा बाजारात विक्रीसाठी ठेवेल. हा सर्व खर्च जोडून बाजारात 30 रुपये किलो दराने कांदा विकला जाण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या