Friday, May 3, 2024
Homeनाशिक२४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

२४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

नाशिक । Nashik

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे.

- Advertisement -

या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी सहाय्य होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती मोबाईल दूरध्वनी, व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकमध्ये काही अटी व शर्तीच्या अधिन राहुन कंपन्या, औदयोगीक आस्थापना, व्यवसाय, उद्योग हे सुरु करण्यास मान्यता दिली आहे. दरम्यानच्या कालावधित स्थलांतरामुळे काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे.

यामुळे नियोक्ते आणि नोकरी ईच्छूक उमेदवार यांना एकछत्राखाली सुविधा उपलब्ध होण्याकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा महास्वयंम वेबपोर्टलवरून मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये ॲप्रेंटिसशिप रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम (ईपीपी) अंतर्गत ऑनजॉब प्रशिक्षणाशी आणि नियमित रिक्तपदे यासाठी ऑनलाईन मुलाखती व्दारे भरती प्रक्रीया करण्यात येणार आहे.

या मेळाव्यात रोजगार देणा-या विविध नामांकित कंपन्यांपैकी डाटामॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लिमिटेड नाशिक, कडून ईपीपी, पोस्ट ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट इन मॅनेजमेंट, ग्रॅज्युएट , डिप्लोमा अशी एकूण 250 रिक्तपदांची भरती केली जाणार आहे.

इतर नियोक्त्यांकडून रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणा-या किंवा ऑनलाईन अॅप्लाय केलेल्या सुयोग्य उमेदवारांच्या नियोक्त्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत.

या सुवर्ण संधीचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वरील वेबपोर्टलला लॉग-इन करावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam मोफत अॅप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉगीन करुन शैक्षणिक पात्रते नुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त संपत चाटे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या