Tuesday, May 7, 2024
HomeUncategorizedअरेरे... दोन हजारापैकी ५० अर्जच वैध!

अरेरे… दोन हजारापैकी ५० अर्जच वैध!

औरंगाबाद – aurangabad

गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबाद शहर व परिसरात (corona) कोरोनाने अनेकांचा बळी घेतला असला तरी त्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनाने अर्ज मागवले आहेत खरे परंतु, दोन हजाराहून अधिक अर्ज धारकांपैकी केवळ ५० अर्जच वैध ठरले आहेत. कोरोना झाला पण अन्य देखील आजार जडल्याने (Death) मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचेही यातून समोर येत आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, लोकांकडून कमी प्रमाणात अर्ज दाखल होत आहेत. तसेच जे अर्ज येत आहेत, ते देखील अपूर्ण आहेत. आतापर्यंत २१२१ अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी केवळ ५० अर्जच पात्र ठरवण्यात आले असून मनपाच्या समितीने त्यांना मंजुरी दिली आहे. इतर अर्जांची छाननी सुरु आहे.

मनपास्तरीय समितीने वॉर रूममधून नागरिकांना फोन करून अर्ज कसे भरायचे यांसदर्भात माहिती देत आहेत. (Online) ऑनलाईन आलेल्या अर्जांची चार स्तरावर पडताळणी केली जात आहे. जिल्हास्तर आणि महापालिका स्तरावरील पडताळणी होऊन मंजूर झालेली प्रकरणे आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पाठवली जात आहेत. त्यानंतर ती (Collector) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आणि तेथून पुणे येथील राज्यस्तरीय समितीकडे ती वर्ग करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे चार पातळ्यांवर मंजुरी मिळाल्यानंतर थेट कुटुंबियांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा होणार आहे.

अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे- या अर्जासोबत कोरोना रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्र, आरटीपीसीआर किंवा अँटीजन चाचणीचा अहवाल, कँसल चेक आणि स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या