Saturday, January 24, 2026
Homeदेश विदेशAmit Shah: 'ऑपरेशन महादेव'ची सुरवात कशी झाली?; दहशतवाद्यांना मारायला दोन महिने का...

Amit Shah: ‘ऑपरेशन महादेव’ची सुरवात कशी झाली?; दहशतवाद्यांना मारायला दोन महिने का लागले?अमित शाहांनी सांगितली Inside Story

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तिन्ही दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबाबत आज (29 जुलै) लोकसभेत माहिती दिली. सुरक्षा दलाच्या जवानांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांना चकमकीत ठार केले. त्याबाबत शाह यांनी महत्त्वाची माहिती दिली. या चकमकीपासून ते आज पहाटेपर्यंतचा आजचा घटनाक्रम अमित शाह यांनी सभागृहाला सांगितला.

ऑपरेशन सिंदूरवर आज संसदेत सलग दुसऱ्यादिवशी चर्चा सुरु आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज ऑपरेशन महादेवबद्दल संसदेत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामच्या दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव कधी सुरु झाले?. दहशतवाद्यांची ओळख कशी पटवली? याची सगळी इनसाइड स्टोरी अमित शाह यांनी संसदेत सांगितली.

- Advertisement -

अमित शाह यांनी सांगितला सगळा घटनाक्रम
अमित शाह म्हणाले की, ‘ऑपरेशन महादेव’मध्ये, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत सुलेमान उर्फ फैजल, अफगाण आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले. सुलेमान हा लष्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. आपल्या गुप्तचर यंत्रणेकडे पहलगाम हल्ला आणि गगनगीर दहशतवादी हल्ल्यात सुलेमानचा सहभाग असल्याचे अनेक पुरावे आहेत. यासोबतच, अफगाण हा लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी होता आणि जिब्रान देखील एक दहशतवादी होता.

YouTube video player

ऑपरेशन महादेवची सुरवात २२ मे रोजीच
अमित शाह पुढे म्हणाले, “ऑपरेशन महादेवची सुरुवात २२ मे २०२५ रोजी झाली. ज्या दिवशी हल्ला झाला, त्या दिवशी रात्री एक सुरक्षा बैठक झाली” असे अमित शाह यांनी सांगितले. “हे म्हणतात जम्मू-काश्मीरला राहुल गांधींशिवाय कोणी गेले नाही. हे कुठल्या चष्म्यातून पाहतात ते माहित नाही. १ वाजता हल्ला झाला. मी ५.३० वाजता श्रीनगरमध्ये उतरलो” असे अमित शाह म्हणाले.

“२३ एप्रिलला सुरक्षेसंदर्भात एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी उपस्थित होते. हे नृशंस हत्याकांड करणारे दहशतवादी देशाबाहेर पळू शकणार नाहीत अशी व्यवस्था आम्ही केली” असे अमित शाह म्हणाले. “२२ मे रोजी IB ला एक ह्यूमन इंटेलिजन्स प्राप्त झाला. राची गाव क्षेत्रात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली. आयबी आणि सैन्याने राची क्षेत्रात अलटास सिग्नल कॅप्चर करण्यासाठी जी उपकरणे आपल्या एजन्सीने बनवली आहेत, त्या द्वारे पुष्टी केली” असे अमित शाह म्हणाले.

उंचावर सैन्याचे अधिकारी असायचे
दाचिगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची ठोस माहिती मिळविण्यासाठी २२ मे ते २२ जुलै २०२५ पर्यंत आयबी आणि लष्कराकडून सतत प्रयत्न केले गेले. थंड उंचावर सैन्याचे अधिकारी असायचे. सिग्नल इंटरसेप्ट करण्यासाठी कधी पायी चालत फिरायचे. त्यानंतर २२ जुलै रोजी लष्कराला यश मिळाले आणि सेन्सर्सच्या मदतीने दहशतवादी त्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. सेन्सरच्या माध्यमातून दहशतवादी असल्याची पुष्टी झाली. देशातील लष्कर आणि जम्मू-काश्मीरच्या पोलिसांनी दहशतवाद्यांना घेरण्यासाठी एकत्र काम केले आणि ऑपरेशन महादेवमध्ये तिन्ही दहशतवादी मारले गेले.

एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांना आधीच ताब्यात घेतले होते. दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर त्यांना ओळख पटवण्यासाठी आणण्यात आले. त्यांनीच या दहशतवाद्यांना ओळखले. मात्र, पहलगामच्या मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी आम्ही इतरही मदत घेतली. आम्ही अनेक तांत्रिक मदत घेतली आणि या दहशतवाद्यांना ओळखले असल्याचे शाह यांनी म्हटले.

अमित शाह यांनी म्हटले की, हे पहलगामचे गुन्हेगार आहेत का, याची खात्री करण्यासाठी या दहशतवाद्यांच्या रायफल्स विशेष विमानाने चंदिगडमध्ये पाठवण्यात आले. त्या ठिकाणी रायफलमधून फायरिंग करून बुलेट्ची फॉरेंसिक चाचणी केली. पहलगामध्ये झाडल्या गेलेल्या गोळ्यांची फॉरेन्सिक चाचणी आधीच केली होती. त्यानंतर दोन्ही अहवाल जुळून पाहिले. त्यानंतर सहा तज्ज्ञांनी त्यावर शिक्कामोर्तब केले. या ६ तज्ज्ञांसोबत मी पहाटे 4.46 वाजता व्हिडीओ कॉलवर चर्चा केली असल्याचे अमित शाह यांनी सांगितले.

1055 लोकांची ३००० तासांहून अधिक चौकशी
पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही तातडीने एनआयएकडे तपास सोपवला. तपासाला बराच वेळ लागला. तपासादरम्यान, मृतांच्या नातेवाईकांशी बोलण्यात आले. पर्यटक, छायाचित्रकार, कर्मचारी, विविध दुकानांमधील कामगार अशा १०५५ लोकांची ३००० तासांहून अधिक चौकशी आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. नंतर, या आधारे एक स्केच तयार करण्यात आला. बरीच शोधाशोध केल्यानंतर, २२ जून २०२५ रोजी बशीर आणि परवेझ यांची ओळख पटली, ज्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bihar Bhavan : “राज ठाकरे महाराष्ट्राचे राजे आहेत का? आम्ही मुंबईत…”;...

0
मुंबई | Mumbai येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एलफिंस्टन एस्टेटच्या जागेवर ३० मजली बिहार भवन (Bihar Bhavan) उभारण्याची योजना आहे. यासाठी सुमारे ३१४.२० कोटी रुपयांचा...