Thursday, May 2, 2024
Homeनाशिकविविधा : जुन्या गुन्हेगारांना दिला 'मौका' मात्र नव्या गुन्हेगारांच काय?

विविधा : जुन्या गुन्हेगारांना दिला ‘मौका’ मात्र नव्या गुन्हेगारांच काय?

नाशिक | निशिकांत पाटील

पोलीस आयुक्तांनी (Police Commissioner) गुन्हेगार सुधार मेळावा (Criminal Reform Meeting) घेत जुन्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत “मोक्का” पासून वाचण्यासाठी मौका ( संधी ) दिली…

- Advertisement -

मात्र गेल्या महिनाभरात शहरात (Nashik City) ठीक ठिकाणी घडलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नवोदित गुन्हेगार जन्माला येत असल्याच्या घटना उदयास येत आहेत. यावरही प्रकाश झोत टाकण्याची गरज असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी (Crime) मध्ये सक्रिय नसलेल्या मात्र रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांना सुधारण्याची संधी देत त्यांचेकडून एक वर्षाचा बॉण्ड “गुन्हेगार सुधार मेळाव्यात” लिहून घेतला. असे असताना शहरांमध्ये उदयन्मुख नवीन गुन्हेगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

या गुन्हेगारांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे गेल्या काही दिवसांपूर्वी स्टेट बँक चौक (State Bank Chauk) येथे झालेल्या खून प्रकरणात दिसून आले. मुख्यत्वेकरून व्यसनाधीन झालेले आणि कमी वयात हौस-मौज करण्याकरता छोट्या-मोठ्या गुन्हेगारीकडे अल्पवयीन आकर्षित होत असतानाचे दिसून येत आहे. बऱ्याच गुन्ह्यांमध्ये बालगुन्हेगारांचा (Juvenile delinquents) चंगळपणा देखील कारणीभूत ठरत आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी संघटित गुन्हेगारी (Organized crime) करण्यात नवयुवकांचा सहभाग दिसून येत आहे.

नाशिक शहरालगतच्या सुरू असलेले धाबे व हॉटेल मध्ये अवैध मद्यपान व हुक्का पार्लर (Hukka Parlor) मध्ये सुरू असलेले अवैध व्यवसाय हे नव तरुणांना गुन्हेगारी कडे वळण्यास भाग पाडत असल्याचे जाणकारांनी त्यांच्या निदर्शनास आल्याचे सांगितले आहे.

गुन्हेगारांना राजकारण्यांचा छुपा पाठिंबा

नाशकातील गुन्हेगारीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये असलेले अनेक संशयित आरोपी राजकारण्यांशी जवळीक साधत असल्याचे यापूर्वी उघड झाले होते. पोलिसांच्या तपासातही त्यांनी अनेक वेळा राजकारण्यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर या गुन्हेगारांनी काहीवेळा राजकारण्यांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला होता.

यातून गुन्हेगारी जगतातील आणि राजकारणी यांचे लागेबांधे समोर आले होते. त्यानंतर आता सद्यस्थितीत जे-जे गुन्हे घडत आहेत. त्या गुन्ह्यांमध्ये कळत-नकळत काही राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

मात्र यात नवयुवकांचा बळी जात असल्याचे दुर्दैवी चित्र देखील आहे. ज्या ज्या वेळी असे प्रकार समोर आले त्यावेळी तत्कालीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजकारण्यांची चौकशी करत कारवाई केली होती. मात्र यानंतर आता घडलेल्या घटनांमध्ये राजकीय पाठिंबा असल्याचे सिद्ध झाल्यास पोलीस कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या