Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनमाडमध्ये ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर सुरु

मनमाडमध्ये ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर सुरु

मनमाड । Manmad

हुश्श …अखेर मनमाड शहरात ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर आणि दुसरे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी पूर्ण झाली असून पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने रेल्वेचे हॉस्पिटल आणि कम्युनिटी हॉल ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

रेल्वे हॉस्पिटल मध्ये 25 बेडचे ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर तर तर गर्डर शॉप मध्ये असलेले कम्युनिटी हॉल मध्ये 100 बेडचे दुसरे कोविड सेंटर सुरु करण्याची तयारी युद्ध पातळीवर केली जात असून लवकर दोन्ही सेंटर रुग्णासाठी उपलब्ध होणार माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.जी.एस.नरवणे,पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.विजयकुमार मुंढे यांनी दिली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहर परिसरात अक्षरशः थैमान घातले असून शहरातील अनेक भागाला कोरोनाने विळखा घातला आहे.आता पर्यंत 1 हजार 687 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1 हजार 432 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

53 नागरिकांचा कोरोनाने बळी घेतला तर 202 पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार केले जात आहे हे सर्व आकडे शासकीय असून खरी परिस्थिती याच्या पेक्षा वेगळी असून अनेक नागरिक बाधीत आहे मात्र ते सांगत नाही.खाजगी लैब मध्ये रोज मोठ्या प्रमाणत नागरिक स्वैब देत आहे मात्र त्यात किती जण पॉझिटिव्ह आहे याची माहिती दिली जात नाही.शहरातील जवळपास सर्वच खाजगी हॉस्पिटल दवाखाने हाउस फुल झाले आहे.

शहरातील मुख्य श्मशान भूमींत एक महिन्यात सुमारे 40 अंत्यविधी झाल्याची नोंद आहे या व्यतिरिक्त शहरा लगत असलेल्या इतर श्मशान भूमीत देखील मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार झाले आहे आज मंगळवारी एका दिवसात दुपार पर्यंत 7 जणांवर अंत्यविधी करण्यात आला त्यामुळे शहरातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे समोर येत आहे.

शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सेंट झेवियर हायस्कूलच्या वसती गृहात करण्यात आलेले कोविड सेंटर फुल झाले असून अनेक रुग्णांना आता ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे मात्र शहरात ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर नसल्याने अनेकांच्या जीवावर बेतत आहे. डिसीएचसी सेंटर सुरु करण्याच्या मागणी साठी राजकीय पक्षांनी आंदोलने देखील केली.

आमदार सुहास कांदे,उपनगराध्यक्ष राजेंद्र आहिरे,गट नेते गणेश धात्रक यांनी देखील सतत पाठपुरवा केला याची दखल घेत जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी मनमाडला आढावा बैठक घेवून रेल्वे हॉस्पिटल मिळावे यासाठी डीआरएम शी संपर्क साधला होता.अखेर रेल्वे प्रशासनाने त्यांचे हॉस्पिटल देण्यास संमती दिल्यानंतर आज ते हॉस्पिटल ताब्यात घेवून तेथे 25 बेडची व्यवस्था करण्यात आली.

आता ऑक्सिजनसाठी पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण होताच रुग्णांना बाहेर गावी जाण्याची गरज भासणार नाही शिवाय गर्डरशॉप मध्ये असलेले कम्युनिटी सेंटर देखील ताब्यात घेण्यात आले असून तेथे 100 बेड लावण्यात आले असल्याची माहिती डॉ.नरवणे,मुख्याधिकारी डॉ.मुंढे यांनी दिली.शहरात 25 बेडचे ऑक्सिजनयुक्त डिसीएचसी कोविड सेंटर आणि 100 बेडचे दुसरे कोविड सेंटर सुरु होणार असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या