Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाP.V.Sindhu Marriage: भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधू अडकली विवाहबंधनात; लग्नसोहळ्यातील पहिला फोटो...

P.V.Sindhu Marriage: भारताची फुलराणी पी. व्ही. सिंधू अडकली विवाहबंधनात; लग्नसोहळ्यातील पहिला फोटो आला समोर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू लग्नबंधनात अडकली आहे. राजस्थानमधील उदयपूर याठिकाणी डेस्टिनेशन विवाहसोहळा पार पडला. भारताची फुलराणी म्हणून ओळखली जाणारी पी. व्ही. सिंधूने उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्यासोबत विवाह गाठ बांधली आहे. पीव्ही सिंधू आणि वेंकट दत्त साई यांचा विवाहसोहळा रविवारी ( २२ डिसेंबर) उदरपूरमध्ये पार पडला. सिंधू लग्नबंधनात अडकली असून तिच्या विवाहसोहळ्यातील पहिला फोटो समोर आला आहे.

पीव्ही सिंधूच्या विवाह सोहळ्याला अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती . यासह कुटुंबातील सदस्य आणि मित्र मंडळीही उपस्थित होते. या दोघांच्याही विवाह सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी नव्या जोडप्याबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि त्यांच्या विवाहाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोमध्ये सिंधू आणि व्यंकटदत्ता एकत्र बसलेले दिसत आहेत. त्यांनी कॅप्शन दिले, ‘काल उदयपूरमध्ये वेंकट दत्ता साईसोबत आपली बॅटमिंटन चॅम्पियन, ऑलिम्पियन पी. व्ही. सिंधूच्या विवाहसोहळ्याला उपस्थित राहून मला खूप आनंद झाला. मी या नवविवाहित जोडप्याला त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिला’, असे त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय.

सिंधूला आशीर्वाद देण्यासाठी गजेंद्र सिंह शेखावत यांच्याशिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील पोहोचले होते. सिंधू आणि आयटी व्यावसायिक व्यंकट दत्ता साई यांचा विवाह उदयपूरमधील लेक सिटीच्या मध्यभागी असलेल्या हॉटेल राफेल्समध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. लग्नसोहळ्यात फक्त निवडक आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. आता २४ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये क्रीडा जगताशिवाय, चित्रपट आणि राजकीय जगतातील दिग्गज व्यक्ती देखील उपस्थित राहू शकतात.

कोण आहे वेंकट दत्त साई
पी.व्ही. सिंधूचा पती वेंकट दत्ता यांच्याबद्दल सांगायचे झाले तर तो पोसिडेक्स टेक्नोलॉजी मध्ये एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहे. मात्र ते फक्त टेक्नॉलॉजी कंपनीशी जोडलेले नाही, तर यापूर्वी जगातील सर्वात प्रसिद्ध टी20 लीग, आयपीएलशी देखील त्याचे नाते होते. वेंकटने त्यांच्या लिंक्डइन बायोमध्ये देखील याचा उल्लेख केला आहे, ते आयपीएल फ्रँचायझीचे व्यवस्थापन करत होते, असे त्यांनी नमूद केलेय. मात्र, त्यात त्यांनी त्या फ्रँचायझीच्या नावाचा मात्र उल्लेख केलेला नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...