Friday, May 3, 2024
Homeनगरपाचेगावात आकडे टाकून वीज चोरणार्‍यांविरुद्ध मोहीम

पाचेगावात आकडे टाकून वीज चोरणार्‍यांविरुद्ध मोहीम

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगावमध्ये (Pachegav) महावितरण (MSEDCL) वीजचोरांविरुद्ध (Power Thief) आक्रमक (Aggressive) होऊन पंधरा ते वीस अनधिकृत वीज जोडणीधारक पकडून विजेची उपकरणे जप्त (Electrical Equipment Seized0 करण्यात आली.

- Advertisement -

उन्हाची तीव्रता व करोना काळानंतर वीजमागणी वाढली आहे. परिणामी भारनियमन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आकडे टाकून वीज चोरी (Power Thief) करणार्‍यांविरुद्ध महावितरणच्या कार्यालयाने मोहीम (MSEDCL Office Campaign) सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात 2 हजार 405 आकडे काढून त्यांच्या केबल जप्त केल्या आहेत. तसेच 239 वीज चोराविरुद्ध कारवाई केली आहे.

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव (Pachegav) येथे महावितरणने (MSEDCL) अनधिकृत वीज चोरी (Unauthorized Power Theft0 करणार्‍यावर वीज कर्मचार्‍यांनी धाड टाकून वीज चोरी करणार्‍यांची वीज उपकरणे ताब्यात घेतली. सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. त्यात शेतीतील पिकांची पाण्याची भूक वाढली आहे. त्यामुळे शेतकरी (Farmer) शेतातील पिकांना पाणी (Crops Water) देऊन वाचविण्यासाठी पराकाष्ठा करीत आहे. पण या भागात वीज कमी दाबाने मिळते अशी शेतकर्‍यांचा कायमच महावितरणबद्दल आरोप होता व आहे. त्यामुळे कमी दाबाने मिळणारी वीजेच्या समस्या शेतकर्‍यांना भेडसावत आहे. पण काही अधिकृत वीज कनेक्शन एक व त्यावर तीन चार विद्युतपंप अनधिकृतपणे चालवीत असणार्‍या शेतकर्‍यांना महावितरण (MSEDCL) कर्मचार्‍यांनी चांगलाच दणका दिला आहे.

महावितरणच्या माध्यमातून वीजपुरवठा जास्त दाबाने दिला जातो, पण अनधिकृतपणे विद्युतपंप चालून महावितरण विभागाची वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत होती.त्यामुळे अधिकृत धारकांना वीज पुरवठा कमी दाबाने मिळत आहे.पण आता वीज चोरी करणार्‍या शेतकर्‍यांची वीज उपकरणे तर जप्त करणार पण त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसुद्धा करण्यात येणार असल्याचे कळल्यावर मात्र चोरी करणार्‍या शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अनधिकृत वीज धारकांनी वीज सुरळीत चालण्यासाठी महावितरण विभागाला सहकार्य करावे व वीज चोरी थांबवावी. जेणेकरून आपल्याच शेतकर्‍यांना वीज चांगल्या दाबाने सुरू राहीन. अधिकृत वीज जोडणी करून महावितरण विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन कर्मचार्‍यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या