Friday, May 3, 2024
Homeनगरपाडळीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

पाडळीत अवैध वाळू वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरवर कारवाई

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

अवैधरित्या शासकिया वाळू चोरी करून वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्टर ट्रॉलीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने कारवाई करत जप्त केले आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

पप्पू उर्फ प्रविण दिलीप दराडे (रा.पागोरी पिपळगांव, ता.पाथर्डी) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावचे शिवारात पाटाजवळ सापळा लावून पकडले. या कारवाईत एक महिंद्रा कंपनीचा विना नंबरचा ट्रॅक्टर, दोन चाकी ट्रॉलीमध्ये एक ब्रास शासकिय वाळू जप्त करण्यात आली. चालक दराडे याला ताब्यात घेऊन दराडे याला वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसलेबाबत सांगितले.

ट्रॅक्टर चालकाने शासनाची कोणतीही परवागी न घेता बेकायदेशीररित्या वाळू चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाट यांच्या फिर्यादीवरून विविध कलमान्वये पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकातील पोलीस नाईक संतोष लोंढे, पो.हे.कॉ.चंद्रकांत कुसळकर, पोलीस कॉन्स्टेबल किशोर शिरसाट यांनी ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या