Thursday, April 16, 2026
Home Blog Page 13269

जु.स.रुंगटा मध्ये भरणार ‘दप्तरविना शाळा’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : जु. स.रुंगटा हायस्कूल मध्ये दर शनिवारी दफ्तरविना शाळा भरणार आहे. या उपक्रमाची सुरवात शनिवारपासून (दि. ७) करण्यात आली.

उपक्रमाची सुरवात कवी प्रशांत केंदळे यांच्या काव्य कार्यशाळेपासून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष मिलिंद कचोळे, संस्थेचे माजी सचिव अरुण पैठणकर, शाळेचे मुख्याध्यापक डी. डी. अहिरे तथा कवी दयाराम गिलाणकर मंचावर उपस्थित होते.

कवी प्रशांत केंदळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काव्य रचना कशी करावी याबद्दल सांगितले. आपल्या रचलेल्या कविता त्यांनी विद्यार्थ्यांनकडून गाऊन घेतल्या. मुलांनी अतिशय आनंदाने व उत्साहाने कृतीसह कविता गायल्या.

या दप्तरविना उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, कथाकथन, वक्तृत्व, वजन मापे, भाषा कौशल्य कार्यशाळा, बँक भेट व व्यवहार परिचय, पोस्ट कार्यप्रणाली परिचय, परिसर भेट, करियर गाईडन्स, इलेक्ट्रॉनिक मीडिया अनुभूती इत्यादी उपक्रम राबविले जाणार आहे.

उपक्रमाबद्दल माहिती देतांना मुख्याध्यापक डी.डी आहिरे यांनी असे सांगितले कि रोज साचेबद्ध शिक्षण घेतांना मुलांच्या मनावरील ताण तणाव वाढत आहे त्याचबरोबर यांची शाळेबद्दल ची गोडी कमी होत चालली आहे. मुलांमध्ये कृतियुक्त व आनंददायी शिक्षण दिल्यास मुलांची शिक्षणाबद्दलची गोडी वाढीस लागून त्यांच्यातील अध्ययन कौशल्य वाढीस लागेल.

त्याच बरोबर त्यांना दैनंदिन जीवनात वावरतांना ज्या कौशल्यांची गरज लागते त्याही त्यांना अवगत होतील. पदव्यत्तर शिक्षणानंतरही विद्यार्थ्यांना बँक, पोस्ट खाते, व्यवहार याबद्दलची माहिती नसते. ही माहिती त्यांना याच वयात विविध उपक्रमातून व प्रत्यक्ष भेटीतून दिल्यास त्यांचे व्यवहार ज्ञान वाढेल. भाषा विषयक कौशल्य कार्यशाळेतून त्यांची भाषा विकास होईल असे सांगितले.

नाशिक रनर्स तर्फे ‘रन ऑफ द मंथ’

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : नाशिक रनर्स तर्फे आज कृषी नगर जॉगिंग ट्रॅक येथून रन ऑफ द मंथ आयोजीत करण्यात आला.

सकाळी साडेसहा वाजता कृषीनगर जॉगिंग ट्रॅक येथून ५ व १० किलोमीटर अंतराचे रनिंग हे गुलाबी थंडी मध्ये सर्वानी पूर्ण केले. दर महिन्याला नाशिक रनर्स तर्फे हा इव्हेंट सरावासाठी घेतला जातो. धावणे प्रकारासंबंधी मार्गदर्शन हाच ‘रन ऑफ द मंथ’चा दृष्टीकोन आहे. यावेळी वार्मअप व स्ट्रेचिंग सेशन अतुल जंत्रे यांनी घेतले.

आयर्नमॅन किताब पटकवणारे प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया व डॉ.अरुण गचाले यांचा नाशिक रनर्स तर्फे सन्मानचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन गौरव करण्यात आला. तसेच कोल्हापूर येथील ट्रायथलाॅन यशस्वी पूर्ण केलेले मिलिंद कुलकर्णी, संजय पवार, दिपक भोसले, मोनिष भावसार, डॉ. मनीषा रौंदळ यांना देखील सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच पुणे येथे झालेली अल्ट्रा मॅरेथॉन १०० किलोमीटर अंतर हेमंत पोखरकर यांनाही गौरविण्यात आले.

राहुरीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

एक आरोपी जेरबंद; अन्य पसार

राहुरी (तालुका प्रतिनिधी) – राहुरी शहरातील बसस्थानकासमोरील भरपेठेत असलेले एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. दरम्यान, पोलिसांची चाहूल लागताच अज्ञात पाच चोरट्यांनी तेथून अंधाराचा फायदा घेत पलायन केले. मात्र, पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून एकाजणाच्या मल्हारवाडी शिवारात मुसक्या आवळल्या तर उर्वरित पसार झाले.

ही घटना रविवारी (दि.08) पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. हे एटीएम अगदी भरपेठेत आहे. रविवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमजवळ अंधारात काहीतरी वाजत असल्याची चाहूल गस्तीवर असलेल्या पोलिसांना लागली. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांना पाहताच चोरटे पळून गेले. तर पोलिसांनी त्यांचा मल्हारवाडी शिवारात एक किमी पाठलाग करून त्यातील एकाजणाच्या मुसक्या आवळल्या. पकडण्यात आलेला आरोपी राहुरी तालुक्यातील कोंढवड येथील असून दत्तात्रय बोर्‍हाडे असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

दरम्यान, एटीएमजवळ पोलिसांना लोखंडी कटावणी, लोखंडी टामी, दोन मोठे स्क्रू, आढळून आले. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केले. घटनास्थळी विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शिरसाठ, यांनी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागुल करीत आहेत. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोनि. देशमुख यांनी दिली.

इगतपुरी : बोरटेंभे शिवारात मालट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

इगतपुरी । मुंबई-आग्रा महामार्गावरील बोरटेंभे शिवारातील गुरुद्वारासमोर मुंबईहून येणाऱ्या भरधाव मालट्रकने एका पादचारीस पाठीमागुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यु झाला आहे.

शनिवारी ( दि.७ रोजी ) रात्री ९.३० वाजेच्या सुमारास इगतपुरी शहराच्या बायपास जवळील बोरटेंभे शिवार येथील गुरूद्वारासमोर मुंबईहून नाशिककडे जाणारा मालट्रक ( क्रमांक- एम.पी.०९ एच.एच.८८०५ ) चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत असतांना रस्त्याने पायी चालणारा अनोळखी पादचारी इसम ( वय- ५० ते ५५ वर्ष ) नाव पत्ता माहीत नाही यास पाठीमागून धडक दिली.

या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. इगतपुरी पोलीसांनी भादवि २७९, ३०४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन ट्रकचालक सचिनकांत शर्मा ( वय-३० ) राहणार ता. जि. भेंड, मध्यप्रदेश यास अटक केली आहे. अधिक तपास एएसआय एस. बी. घाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी लोहरे, पो. ना .संतोष गांगुर्डे आदी करीत आहे.

Cantonment board undertakes plastic-free campaign

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

NASHIK:

All cantonment boards under the defence ministry have been instructed to conduct plastic-free campaign. Accordingly, Deolali cantonment board conducted it and collected 77 sacks of plastic in a single day.
Cantonment board administration is celebrating cleanliness fortnight. The campaign was inaugurated on Saturday by MP Hemant Godse at Zenda Chowk, Deolali Camp. Vice president Bhagwan Katariya, corporator Sachin Thakre, Kaveri Kasar, Prabhavati Dhivre, Asha Godse, chief executive officer Ajay Kumar, Bhausaheb Dhivre, assistant engineer Vilas Patil, officials, employees, teachers and students were present on the occasion.

Students from Nutan Vidya Mandir took part in the campaign which was conducted on Rest Camp Road, while students from Barnes high school took part in the campaign which was conducted on Barnes high school road. Students from SVKT college participated in the campaign which was conducted on Lam Road, whereas students from St. Patrick school took part in the campaign which was conducted on Dhondi Road and students from Darshan Academy participated in the campaign conducted on Anand Road.

Students from cantonment board school participated in the campaign conducted in Stationwadi area, while students from Dr Gujar Subhash high school took part in the campaign conducted in Sadar Bazaar and students from Darshan Academy participated in the campaign conducted at cantonment board office and students from Nutan Vidya Mandir took part in the campaign which was conducted in Vijaynagar area.

The students on the occasion focussed on adverse effects of plastic through a street drama. The students of Barnes school who collected 11 sacks of plastic were given first prize, while students of St. Patrick school were given second prize for collecting 10 sacks of plastic and third prize was given jointly to Nutan Vidyamandir and cantonment high school for collecting 9 sacks of plastic. Atul Mude, Shivraj Chavan, Dhiraj Dulgaj and health department employees took sincere efforts for success of the campaign.

Meanwhile, MP Hemant Godse said that a movement is being raised across the country to make country plastic-free. Citizens should take an active part in this movement and take efforts to prevent pollution.

गीता महोत्सवानिमित्त संगमनेरात दिमाखदार शोभायात्रा

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

संगमनेर (प्रतिनिधी)- दिमाखदार, शिस्तबद्ध व उत्साही शोभायात्रेने संगमनेरमध्ये गीता महोत्सवास काल प्रारंभ झाला. या शोभायात्रेवर संगमनेरकरांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्तपणे स्वागत केले. सकाळी 9 वाजता अकोले नाका येथील मालपाणी विद्यालयातून शोभायात्रेस प्रारंभ झाला. समारोप दुपारी 12 वाजता जाणता राजा मैदानावर झाला.

शोभायात्रेच्या मार्गावर काढण्यात आलेल्या सुंदर रांगोळ्या, महाभारतातील पौराणिक देखावे असलेले चित्ररथ, सजविलेले घोडे, उंट, ढोल ताशा पथक, ध्वज नृत्य पथक, भजनी मंडळ, गीता ग्रंथ पालखी, देशाच्या अनेक भागातून मोठ्या संख्येने आलेले गीता परिवाराचे कार्यकर्ते आणि विशेष सजविलेल्या रथातून सहभागी झालेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज यामुळे संपूर्ण शहराला उत्सवाचे स्वरूप आले होते. संपूर्ण गीता कंठस्थ करणार्‍या सुवर्णपदक विजेत्या सन्मानार्थी विद्यार्थ्यांना सजविलेल्या तीन वाहनांतून मानाची पगडी व सुवर्णपदक गळ्यात घालून सहभागी करून घेण्यात आले होते.

राजस्थान युवक मंडळ, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर, इनरव्हील क्लब, माहेश्वरी पंच ट्रस्ट, ब्राह्मण प्रतिष्ठान, पद्मशाली समाज मंडळ, राउळ समाज मंडळ, श्रीकृष्ण मंदीर मेनरोड व्यापारी मंडळ, तीळवण तेली समाज मंडळ, बाजारपेठ मित्र मंडळ, संगमनेर मर्चंट्स बँक, मालपाणी उद्योग समूह, सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज मंडळ, नवघर गल्ली मित्र मंडळ, साईनाथ चौक युवक मंडळ, व्यापारी प्रतिष्ठान तसेच संस्थांनी स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना माल्यार्पण करून अभीष्टचिंतन केले.

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू व त्यांच्या पत्नी प्रतिभा, सुपुत्र संदेश, मंडळाचे प्रमुख राजेश चौधरी यांनी शोभायात्रेचे स्वागत करून स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना माल्यार्पण करून त्यांचे अभीष्टचिंतन केले. गीता परिवाराचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांच्यासह मालपाणी परिवारातील सर्व सदस्य तसेच संगमनेर मधील अनेक नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते. महिला आणि युवतींचा सहभागही लक्षणीय होता. शोभायात्रेच्या मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्थांनी जलपान आणि चहापान व सरबताची व्यवस्था केली होती.

नांदगाव : तीन दिवसापासून बंद पडलेला वीज पुरवठा अखेर सुरु

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नांदगाव : गेल्या तीन दिवसापासून बंद पडलेला वीज पुरवठा आज अखेर सुरु करण्यात यश आल्याने वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. तर गेल्या तीन दिवसांपासून रात्रंदिवस धावपळ करीत असलेल्या वीज कर्मचारी, अधिकारी यांनीही सूटकेचा निःश्वास सोडला.

जिल्हा परिषदेच्या सदस्या आर्की.अश्विनी अनिल आहेर,व मनमाड येथील कार्यकारी अभियंता डोंगरे यांनी , नांदगावचे सहाय्यक अभीयंता वाटपाडे यांनी विशेष प्रयत्न करून पिपरखेड येथून वीज पुरवठा सुरु करून दिला. यापूर्वी न्यायडोंगरी वीज उपकेंद्रास चाळीसगाव (जि. जळगाव) येथून वीज पुरवठा केला जात असे. त्यामुळे वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार घडतं परंतु जळगाव जिल्हा विभाग येत असल्यामुळे नाशिक विभागाचे अधिकारी व कर्मचारी तिकडे जाऊन काम करू शकत नव्हते.

हिच खरी तांत्रिक अडचण हेरून आर्की.अश्विनी आहेर यांनी हा प्रश्न जि.प सर्वसाधारण सभेत उपस्थित करून अध्यक्षा शितल सांगळे यांच्या लक्षात आणून देत हा सीमावाद कायम स्वरुपी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यास कार्यकारी अभियंता डोंगरे व सहायक अभियंता वाटपाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक बाबींची पूर्तता लागलीच करून दिल्याने अश्विनी आहेर यांच्या प्रयत्नांना यश मिळाले.

नाशिक विभागातील पिपरखेड(ता. नांदगाव) येथून न्यायडोंगरी उप केंद्रासाठी वीज पुरवठा सुरु झाल्याने कायमचा प्रश्न निकाली निघाला. त्यामुळे न्यायडोंगरी, बिरोळा, हिंगणेदेहरे, पिंप्रीहवेली, परधाडी, पिंपरखेड, चिंचविहिर, चांदोरा, जळगाव खु, या गावांना याचा फायदा होणार आहे. या कामाचे सर्वांनीच समाधान व्यक्त करीत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचे आभार केले.

महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकांची क्रीडा संकुलातील इमारतीवर कारवाई

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून वादग्रस्त असलेल्या व जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या क्रीडा संंकुल समितीचे कवच कुंडल वापरून उभारण्यात आलेल्या वाडिया पार्क येथील क्रीडा संकुुलातील ए आणि बी या इमारतीवर महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे.

जिल्हाधिकारी ताठ मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल व्दिवेदी यांच्या आदेशानुसार ही इमारत जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान कारवाई टाळण्यासाठी काहींनी जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्याकडे धाव घेतली आहे. न्यायालयानेही या इमारती बेकायदेशीर ठरविलेेली आहेत.

संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त मंत्रालयात आदरांजली

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई:

संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव अंशु सिन्हा यांनी आज येथे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

मंत्रालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपसचिव ज. जी. वळवी तसेच मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यावेळी संत जगनाडे महाराज यांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार निषेध दिवस : गेल्या एक वर्षात राज्यातील ५५ टक्के लोकांनी दिली लाच

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक : इंडिया भ्रष्टाचार सर्वेक्षण (इंडिया करप्शन सर्वे -२०१९)) ने देशातील भ्रष्टाचाराचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये राज्यातील ५५टक्केपेक्षा अधिक लोकांनी मागील एका वर्षात लाच दिल्याचे आढळून आले आहे.

भारतीय भ्रष्टाचार सर्वेक्षण २०१९ च्या या अहवालात देशभरातून ८० हजारापेक्षा अधिक लोकांवर हा सर्व्हे करण्यात आला. यामध्ये १ लाख ९० हजारहून अधिक प्रतिसाद मिळाले आहेत. त्यापैकी राज्यतील ५ टक्के लोकांनी सांगितले कि, गेल्या १२ महिन्यांत त्यांना एकदाच लाच द्यावी लागली. यामध्ये जास्तीत जास्त पोलिस आणि महानगरपालिका विभागांचा समावेश आहे. या सर्वेक्षणात भ्रष्टाचाराच्या पहिल्या आठ राज्यांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान सर्वेक्षणाचे हे तिसरे वर्ष असून ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’ या सर्वसमावेशक अहवालात ही संकलित करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण राज्य स्तरावरही करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून ६ हजार ७०० हून अधिक मते मिळाली. सर्वेक्षणात भाग घेतलेल्या महाराष्ट्रातील ५५ टक्के नागरिकांनी आपले काम पूर्ण करण्यासाठी लाच दिल्याचे सांगितले तर त्यापैकी २९ टक्के लोकांनी अनेकदा लाच दिली (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) तर २६ टक्के लोकांनी एकदा किंवा दोनदा (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या) लाच दिली. १८ टक्के लोक म्हणाले की त्यांनी लाच न देता काम केले. गेल्या वर्षभरात ही भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये वाढ असल्याचे दिसून आले आहे.

यामध्ये २८ टक्के लोकांनी मनपा विभागात लाच दिली आहे. तसेच २३ टक्के लोकांनी पोलिसांना लाच दिली तर २२ टक्के लोकांनी इतरांना लाच दिली. यामध्ये विद्युत मंडळ, परिवहन कार्यालय, कर कार्यालय इत्यादी विभाग येतात. गेल्या वर्षाच्या तुलनेत पोलिस भ्रष्टाचाराच्या घटनांमध्ये किंचित वाढ झाली आहे, तर महानगरपालिका व मालमत्ता भ्रष्टाचारात वाढ झाली आहे.