Tuesday, June 16, 2026
Home Blog Page 13460

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : देश-विदेशातील पर्यटकांना मुंबईकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉक येथील सिॲम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. ॲक्वेरिअमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. या शहराकडे देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्याला नवनवीन पर्यटनस्थळे विकसित करावी लागतील. मुंबईतील क्रुझ टर्मिनलवर देश-विदेशातील क्रुझ मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यातील पर्यटकांसाठी आता वेगळा पर्यटन कार्यक्रम आपल्याला द्यावा लागेल. यादृष्टीने पहिल्या टप्प्यात शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्टीलेव्हल ॲक्वेरिअम (मत्स्यालय) विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

शहरातील पर्यटनाला व्यापक चालना देण्यासाठी शहरात सी वर्ल्ड, टुरिझम स्ट्रीट, फ्लेमिंगो टुरिझम, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नाईट सफारी आदी सुरु करता येईल का याबाबतही यावेळी चर्चा झाली. शहराला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. त्याचा पर्यटनवृद्धीसाठी कसा वापर करता येईल यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. शहरातील कान्हेरी गुंफा, जोगेश्वरी गुंफा, एलिफंटा लेणी आदींच्या क्षेत्राचा विकास करण्यात यावा. तसेच राज्यात एखादे योग्य ठिकाण शोधून तिथे आताच्या युगातील लेणी विकसित करता येतील यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मादाम तुसाद संग्रहालयाच्या धर्तीवर शहरात एखादे संग्रहालय सुरु करण्यात यावे. पण त्यात वेगवेगळे पुतळे ठेवण्यापेक्षा एखादी संकल्पना निश्चित करुन ‘थीम बेस्ड’ संग्रहालय उभारण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सिंधुदुर्गमधील सबमरिन पर्यटन प्रकल्पाचाही त्यांनी आढावा घेतला. सिंधुदुर्ग विमानतळ आणि या प्रकल्पाला दर्जेदार रस्त्यांची जोड देण्यात यावी. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा राखून या प्रकल्पाचा विकास करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील नाल्याचे पाणी बंद करुन त्याची स्वच्छता राखण्यात यावी. या सरोवराच्या विकासासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तातील पाणी शुद्धीकरणासाठीही उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय महेता, प्रधान सचिव भूषण गगराणी, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता सिंगल, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, पर्यटन संचालक दिलीप गावडे, राज्य पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची आज जयंती

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

देशदूत डिजिटल विशेष

आज देशाचे पहिले राष्ट्रापती डॉ. राजेंद्रप्रसाद यांची जयंती. डॉ राजेंद्रप्रसाद यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद यांचा जन्म ३ डिसेंबर १८८४ साली झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान काँग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले.

महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्यांना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. या पदावर ते १२ वर्षे राहिले होते.

प्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले.

दरम्यान, जून १९६९ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.

डॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले.

या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला.

१९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.राजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले.

अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला.

१९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.

१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट अँड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिध्द असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला.

१९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले.

प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील काँग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.

गांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्यापीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.

१९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले.

दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वत: मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वत:च्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.

ऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी काँग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.

२ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

#HappyBirthdayMitaliRaj : व्हायचं होत डान्सर झाली भारतीय महिला संघाची कर्णधार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : भारताची स्टार क्रिकेटपटू मिताली राजने आज ३७ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जसे पुरुष क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरला महान म्हटले जाते. तसे महिला क्रिकेटमध्ये मिताली राजने ते स्थान पटकावले आहे. भारतीय महिला टीमला उत्तुंग शिखरावर नेण्यामध्ये मिताली राजचे विशेष योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेटलासर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या या खेळाडूचं नाव-मिताली राज. मिताली आज तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करीत आहे.

मिताली राज चा जन्म ३ डिसेंबर १९८२ रोजी राजस्थानच्या जोधपूर येथे झाला असून तिला नृत्यात करिअर करायचे होते. परंतु तिने क्रिकेटची बॅट उचलली आणि जगभरातील गोलंदाजांना बॅटने खेळण्यास सुरवात केली.

१९९९ साली १७ वर्षाची असतांना आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला आणि क्रिकेटविश्वात पदार्पण केले. लष्करी कुटुंबातून आलेली, मिताली आठ वर्षांची असताना शास्त्रीय नृत्य शिकत होती. पण त्यानंतर वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्याने हातात बॅट घेतली आणि हैद्राबादच्या सेंट जॉन स्कूलमध्ये आपल्या मोठ्या भावासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण सुरू केले. त्यानंतर मितालीला क्रिकेटमध्ये आवड निर्माण झाल्याने पुरुष क्रिकेटमध्येही सहभाग घेऊ लागली.

मितालीने पदार्पण केलेल्या पहिल्या वनडेमध्ये ११४ धावांची नाबाद खेळी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याच सामन्यात पहिल्या विकेटसाठी रेशमा गाँधी बरोबर २५८ धावांची भागीदारी केली होती. आतापर्यंत २०० सामन्यात ६ हजार धावा करणारी एकमेव खेळाडू ठरली आहे. सध्या भारतीय संघाची कर्णधार म्ह्णून मिताली क्रिकेट गाजवत आहे.

व्होडाफोन, एअरटेलचे रिचार्ज ५० टक्क्यांनी महागणार; मोबाईल कंपन्यांचा तोटा भरून काढण्यासाठी ग्राहकांना भुर्दंड

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक । प्रतिनिधी

तोट्यात असणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांनी देशातील प्रीपेड ग्राहकांना दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. आघाडीच्या एअरटेल, जिओ, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी त्यांच्या प्रीपेड टेरिफ प्लॅन मध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला असून व्होडाफोन,  एअरटेल च्या रिचार्जच्या किमती उद्या (दि.३) तर जिओचे सुधारित दर दि.६ डिसेंबर पासून अमलात येणार आहेत.

तीन वर्षांपूर्वी रिलायन्सने जिओच्या माध्यमातून दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यावर मोबाईल सेवा पुरवण्याचे पूर्वीचे असणारे व्हाईस मार्केट हे डाटा मार्केट मध्ये रूपांतरित झालं होते. कारण रिलायन्सचे डाटा दर सर्वाधिक कमी असल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी इतर कंपन्यांना देखील डाटा चे कमी करावे लागले होते.

परिणामी या कंपन्याचा नफा घसरत जाऊन त्या तोट्यात गेल्या. देशात व्यवसाय करणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्याकडे जमा होणाऱ्या महसुलातून काही भाग ऍडजस्ट ग्रास रेव्हेन्यू (एजीआर )सरकारला द्यावा लागतो. मात्र, एजीआर च्या व्याख्येवरून सन २००५ पासून मोबाईल कंपन्या आणि सरकारमध्ये वाद सुरु होते.

यासंदर्भात सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना दणका दिला आहे. या कंपन्यांनी त्यांच्या व्यवसायातून मिळालेल्या महसुलातून सरकारला तब्बल ९०० अब्ज रुपये देण्यास सांगितले आहे. यात एकट्या व्होडाफोनला ३९० अब्ज रुपये चुकते करावे लागणार असून इतर कंपन्यांना देखील जवळपास एवढयाच रकमांचा भरणा सरकारकडे करावा लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर धाबे दणाणलेल्या दूरसंचार कंपन्यांनी महसुली तूट दाखवत गेल्या तिमाहीत हजारो कोटी रुपये तोटा झाल्याचे सांगत एजीआर परताव्यासाठी  सध्याच्या दरात वाढ करून थेट ग्राहकांकडून ही रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच उद्या दि. ३ पासून दरवाढीचे नवे पत्रक लागू करण्यात येणार आहे.

जवळपास पाच वर्षांतील हि पहिलीच दरवाढ असून ग्राहकांना त्यांचे सध्याचे टेरिफ प्लँन सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करताना वाढीव ५० टक्के पर्यंत भुर्दंड सोसावा लागणार आहे.  एकमेकांशी स्पर्धा करतांना चाललेल्या दरयुद्धामुळे दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यानी स्वतःहून  आर्थिक संकट ओढवून घेतले आहे.

यामुळे सध्या व्हॉईस कॉल जवळपास मोफत झाला असून  डाटा दरात ९५ टक्क्यांनी कपात होऊन  २०१४ मध्ये प्रति जीबी २६९ रुपये असणारा दर ११ रुपये ७८ पैसे इतका खाली आला आहे. मोबाईल डाटा स्वस्त झाल्याने व स्मार्टफोनचे युग अवतरल्याने जवळपास सर्वांचा अधिक वेळ मोबाईलमध्ये डोके घालण्यातच जात होता. त्यामुळे मोबाईल वापराच्या चांगल्या-वाईट परिणामांवर देखील चर्चा व्हायच्या. आता मोबाईल वापरायचा म्हटले तर रिचार्ज करताना अधिकच भुर्दड बसणार असल्याने ग्राहकांमध्ये देखील दूरसंचार कंपन्यांबद्दल नाराजीचा सूर आहे.

मात्र, मोबाईलची सवय अंगवळणी पडल्याने नवीन दरवाढीला सामोरे जाण्याशिवाय ग्राहकांकडे अन्य पर्याय नसणार आहे. वोडाफोन आयडियाने सर्वात पहिल्यांदा प्री-पेड प्लॅन आणि सेवेसाठी नवीन दर घोषित केले. त्यानंतर भारती एअरटेलनेही आपल्या सर्व मोबाईल प्री-पेड प्लॅनचे दर वाढविण्याची घोषणा केली आहे. वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाऱ्या कॉलसाठी ठराविक मर्यादेनंतर प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

एअरटेलने  वार्षिक प्लॅनमध्ये ४१.१४ टक्के वाढ केली असून  यासाठी २,३९८ रुपये मोजावे लागतील. मर्यादित डाटा प्लॅनसाठी आता ९८८ रुपयांऐवजी  १,४९८ रुपये द्यावे  लागतील. या प्लॅनमधील ही दरवाढ ५० टक्के आहे. तसेच ८४ दिवसांचा सध्याचा  अमर्यादित डाटा प्लॅन आता ६९८ रुपये करुन  तो मर्यादित डाटा प्लॅन मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. यात दररोज २ जीबी डाटा व अमर्यादित कॉलिंग असणार आहे.  २८ दिवसांच्या रोज दीड जीबी  डाटा प्लॅनसाठी आता १९९ ऐवजी २४८ रुपये मोजावे लागणार आहेत.

वोडाफोन आयडियाच्या निवदेनानुसार वार्षिक प्लॅनमध्ये ४१.२ टक्के वाढ केली आहे. कंपनीच्या या प्लॅनचा दर १,६९९ रुपयांवरुन २,३९९ रुपये असेल. तसेच रोज दीड जीबी डाटासह ८४ दिवसांच्या प्लॅनचा दर ३१ टक्क्यांनी वाढवून ४५८ रुपयांवरुन ५९९ रुपये केला आहे. १९९ रुपयांचा प्लॅनसाठी आता २४९ आकारले जातील. याशिवाय वोडाफोन आयडियाने दूसऱ्या नेटवर्क केल्या जाणाऱ्या कॉलसाठी प्रति मिनिट ६ पैसे शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

जिओनेदखील आपल्या दरात ४० टक्क्यांपर्यँत वाढ केली आहे. रेट्स ऑल इन वन प्लान्स मध्ये ही वाढ होणार असल्याचे जीओकडून सांगण्यात येते. मात्र या दरवाढीनंतर ग्राहकांना ३०० टक्क्यांपर्यंत फायदा मिळणार आहे. जिओ यूजर्सने केलेला रिचार्ज प्लॅन संपल्यावर त्यांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉल करण्यासाठी चार्जेस द्यावे लागणार असून त्यासाठी १० ते १०० रुपयांदरम्यानचे टॉप अप व्हाउचर जीओकडून सादर कऱण्यात येणार आहेत. फ्री कॉलिंग सुविधा असणाऱ्या ग्राहकांना त्यांचा सध्याचा प्लॅन संपेपर्यंत इतर नेटवर्कवर बोलण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यासाठी या ग्राहकांना त्यांची व्हॅलिडिटी तपासून घ्यावी लागणार आहे.

‘चांद्रयान-२’ च्या विक्रम लँडरला शोधण्यात यश

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

मुंबई : भारताने केलेल्या दुसऱ्या चांद्रयान मोहिमेतील दुर्घटनाग्रस्त विक्रम लॅंडर अंतराळ संस्था नासाने शोधले आहे. यामध्ये लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरकडून काढण्यात आलेले एक छायाचित्र जारी केले आहे. छायाचित्रात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या ठिपक्यांच्या दिसत आहेत. या ठिपक्यांना माध्यमातून विक्रम लॅंडरचे अवशेष दाखवण्यात आले आहे.

भारताने दुसरी चंद्रमोहीम चांद्रयान-२ मोहीम अंतर्गत विक्रम लॅंडर चंद्रावर पोहचवून विक्रम रचला होता. परंतु, चंद्राच्या पृष्ठभागावर लॅंडींग होण्याआधी वैज्ञानिकांचा लॅंडरशी असलेला संपर्क तुटला. त्यानंतर इसरॉने शोधमोहीम चालू ठेवली होती. तसेच अमेरिकन अंतराळ संस्था नासा देखील याकामी मदत करीत होती.

नासाने आज मंगळवारी सकाळी चांद्रयान-२ च्या विक्रम लॅंडरचे अवशेष शोधून काढले आहे. लूनर रेकॉन्सेन्स ऑर्बिटरकडून छायाचित्र जरी करण्यात आले आहे. या छायाचित्रात निळ्या आणि हिरव्या रंगाच्या ठिपके दिसत आहेत. या ठिपक्यांच्या माध्यमातून विक्रम लॅंडरचे अवशेष दाखवण्यात आले आहे.

जागतिक दिव्यांग दिवस : ७३७ दिव्यांग कुटुंबांना मिळाले हक्काचे घर

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात आलेल्या योजनेमधून जिल्ह्यातील ७३७ दिव्यांग कुटुंबांना हक्काचे घर मिळाले आहे. दिव्यांगांसाठी निधी खर्च करण्यात समाजकल्याण विभागाने आघाडी घेतली असून पुणे, रायगड या जिल्ह्यांनंतर नाशिकने तिसरा क्रमांक पटकावला आहे.

समाजकल्याण विभागातर्फे चार वर्षांत जिल्ह्यातील ७३७ कुटुंबीयांनी याचा लाभ घेतला. प्रत्येक लाभार्थ्यास घरकुल बांधण्यासाठी १ लाख ३२ हजार रुपये देण्यात येतात. या योजनेतून ९ कोटी ७२ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुमारे २५ हजार दिव्यांग व्यक्ती असून यामध्ये १२ हजार ६०० मतदारांचा समावेश आहे. तसेच बाराशे विद्यार्थी विविध शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.

घरकुल लाभार्थ्यांची माहिती पूर्ण करण्यात आली असून ती पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यात आली आहे. मात्र, राज्यात सत्तांतर होत असल्यामुळे या दिव्यांग व्यक्तींची योजना रखडली आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा परिषदेत ५ टक्के निधी राखीव ठेवला जातो.

चालू आर्थिक वर्षात (२०१९-२०) ३ कोटी ८४ लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी दोन दिव्यांग व्यक्तींनी विवाह केला म्हणून त्यांच्या संसारासाठी प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील. त्यांची निवड देखील झाली आहे. तसेच पीठ गिरणी खरेदीसाठी प्रत्येकी १४ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. या योजनेसाठी १५ लाभार्थ्यांची निवड झाली असून या योजनेवर एकूण २ लाख १० हजार रुपये खर्च केले जातील.

कृत्रिम अवयव खरेदीसाठी दिव्यांग व्यक्तींकडे पुरेसे पैसे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तींना महागडे अवयव खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. जिल्ह्यातील दोन व्यक्तींना प्रत्येकी १ लाख रुपयांचा जर्मन-जयपूर येथील कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहे.

२८६ लाभार्थ्यांची निवड
जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत या व्यक्तींसाठी विविध योजना राबवण्यात येतात. यामध्ये सर्वाधिक मागणी घरकुलांना आहे. यासाठी प्रत्येक वर्षी हजारो प्रस्ताव दाखल होतात. चालू आर्थिक वर्षात ९६८ प्रस्ताव दाखल झाले होते. त्यापैकी २८६ लाभार्थ्यांची निवड समाजकल्याण समितीने केली आहे. यातील प्रत्येक लाभार्थ्यास घरकुल बांधण्यासाठी १ लाख ३२ हजार रुपयांप्रमाणे ३ कोटी ७८ लाख रुपये वितरीत केले जाणार आहेत.

वाटप झालेली घरकुले वर्ष           लाभार्थी                 खर्च
२०१६-१७                                 ०३०                ३९ लाख ६० हजार
२०१७-१८                                 १५६                  २ कोटी ६ लाख
२०१८-१९                                 २६५                  ३ कोटी ५० लाख
२०१९-२०                                 २८६                  ३ कोटी ७८ लाख

टॅक्सीचालकाचा मुलगा अंडर- १९ टीमचा कर्णधार

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

दक्षिण आफ्रिकेत पुढच्या वर्षी होणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची सोमवारी घोषणा झाली. या संघाचे नेतृत्व उत्तर प्रदेशचे दोन खेळाडू करणार आहेत.

मेरठचा प्रियम गर्ग या संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आला आहे. राज्यातल्या खेळाडूला थेट राष्ट्रीय टीमचा कर्णधार करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

प्रियमची घरची परिस्थितीही बेताची आहे. वडील नरेश गर्ग टॅक्सी चालवायचे. पण त्यांनी मुलाला स्वप्न पाहण्यापासून आणि ते सत्यात उतरण्यापासून रोखले नाही.

प्रचंड जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर प्रियमने राज्यातील स्पर्धा चांगल्याच गाजवल्या आहेत. प्रियममधील क्रिकेट खेळण्याचा उत्साह, त्याची मेहनत यामुळे प्रियम थेट देशाच्या टी२० संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

जिल्ह्यात पुन्हा एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सततच्या बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षांच्या प्रतवारीवर होणार असल्यामुळे उत्पादकांना आर्थिक फटका बसणार आहे.

यावर्षी जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचा द्राक्षांना मोठ्या प्रमाणात फटका बसला. महिनाभरापूर्वीच अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ५५ हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे नुकसान झाले. या नुकसानीतून द्राक्ष उत्पादक सावरत असताना वाचलेेल्या बागा आता अवकाळीच्या शक्यतेमुळे संकटात सापडतात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात सध्या ढगाळ हवामान असून निफाड व दिंडोरी तालुक्यातील काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. अजूनही एक-दोन दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता आहे. सध्या अनेक द्राक्षबागा फुलोरा व काढणीच्या अवस्थेत आहेत.

बागांमधील द्राक्षांचे मणी तडकू लागले आहेत. तसेच घडांंमध्ये पाणी साचून मणीही खराब होत आहेत. द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. आठवडाभरापूर्वी आलेली थंडी, त्यानंतर ढगाळ हवामान अशा बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसत आहे

दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण होत असून वातावरणात चढ-उतार होत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात असे वातावरण निर्माण झाले आहे. ३ डिसेंबरपर्यंत असेच ढगाळ वातावरण राहील. तसेच हलक्या पावसाची शक्यताही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम द्राक्षबागांवर होत आहे.

बदलत्या वातावरणाचा फटका द्राक्षबागांना बसत असून अनेक बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे द्राक्षांवर औषधे, पावडर फवारणीचा अतिरिक्त बोजा शेतकर्‍यांवर पडत आहे.
– बाळासाहेब क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक

लांबलेला परतीचा पाऊस, त्यानंतर थंडी आणि आता ढगाळ हवामान याचा फटका द्राक्षबागांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. परिणामी निर्यातक्षम द्राक्षांना आता मोठ्या प्रमाणात हानी पोहोचणार आहे.
– सुनील भामरे, द्राक्ष उत्पादक

एलआयसीच्या ‘असिस्टंट’ परीक्षेचा निकाल जाहीर; नाशिक विभागातून ११४८ उमेदवार उत्तीर्ण

0
default-featured-image
Nashik Rain News : त्र्यंबकेश्वरला अवकाळी पावसाची हजेरी; नाशिकमधील काही भागांत हलक्या सरी

नाशिक | प्रतिनिधी

भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे (एलआयसी) ‘असिस्टंट’ पदाच्या भरतीसाठी देशभरात ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये नाशिक विभागातून १ हजार १४८ उमेदवार उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा २२ डिसेंबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

चोवीस वर्षांपासून रखडलेली विमा क्षेत्रातील तृतीयश्रेणी कर्मचार्‍यांची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरातून आठ हजार जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी ऑनलाइन परीक्षा झाली. त्यामध्ये हजारो उमेदवारांनी सहभाग नोंदविला. असिस्टंट क्लार्क पदासाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेनंतर आता मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. कर्मचारी बढती किंवा निवृत्तीमुळे २४ वर्षांमध्ये वर्ग तीनची सुमारे २७ हजार पदे रिक्त आहेत.

सद्यस्थितीत देशभरात विमा कर्मचार्‍यांची संख्या १ लाख १० हजार आहे. यातील वर्ग तीन आणि चारमधील कर्मचार्‍यांची संख्या ५७ हजार, तर वर्ग एकचे कर्मचारी ३१ हजार आणि दोनचे कर्मचारी २२ हजार आहेत. वर्ग तीनमध्ये प्रामुख्याने लिपिकांचा समावेश होतो. विमा क्षेत्राच्या कामकाजाचा विस्तार पाहता लिपिकांची मोठ्या संख्येने गरज आहे. मात्र, रखडलेल्या पदभरतीमुळे कार्यरत कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण वाढला आहे. अखेर दोन दशकानंतर ही भरती सुरू झाल्यामुळे विमा कार्यालयातील मनुष्यबळ वाढणार आहे.