Monday, May 4, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी २९५ कोटींचा निधी

नवी दिल्ली | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी केंद्र पुरस्कृत योजनांमधून गेल्या साडेतीन वर्षात 295 कोटी 13 लाख 2 हजार 500 रुपयांचा निधी वितरित झाला आहे.

- Advertisement -

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्रालयाच्या वतीने देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षात व चालू आर्थिक वर्षात एकूण 1 हजार 221 कोटी 65 लाख 89 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांना 295 कोटी 13 लाख   

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांसाठी वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात एकूण 258 कोटी 3 लाख 47 हजार 500 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 37 कोटी  9 लाख 55 हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

वर्ष 2016-17 ते 2018-19 या मागील तीन आर्थिक वर्षात देशातील 18 राज्यांमधील व्याघ्र प्रकल्पांसाठी एकूण 1 हजार 10 कोटी 42 लाख  8  हजार 400 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. तर चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत (21 नोव्हेंबर 2019) 211 कोटी 23 लाख 81  हजारांचा  निधी वितरित करण्यात आला आहे.

केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही  माहिती दिली.

ताज्या बातम्या

Kerala Election Results : केरळमध्ये काँग्रेसचा ‘हात’ बळकट! सुरुवातीच्या कलानुसार यूडीएफची...

0
थिरुवनंतपुरम । Thiruananthapuram निसर्गसंपन्न केरळ राज्याच्या राजकीय क्षितिजावर आज परिवर्तनाचे वारे वाहताना दिसत आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील 'एलडीएफ' (LDF) सलग तिसऱ्यांदा सत्तेत येऊन...