Monday, May 5, 2025
Home Blog Page 25

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान

0
शासकीय

नाशिक | प्रतिनिधी
नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असून त्याची वसुली कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सामान्य नाशिककरांना वेगळे न्याय व शासकीय कार्यालयांना वेगळे न्याय कसे. कारण नाशिक मनपाचे प्रॉपर्टी टॅक्स अर्थात घरपट्टी थकबाकीचा डोंगर झाला आहे. सुमारे ५६४ कोटी रुपये मनपाचे अडकले असून मनपाकडून टॉप थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र विभागीय महसूल आयुक्तालयासह बीएसएनएल, विविध मोबाईल टॉवर कंपन्या व विशेष करुन करंसी नोट प्रेसवर कोटींची घरपट्टी थकीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसुलीसाठी वारंवार नोटिसा बजावूनही या कार्यालयांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

एकीकडे थकबाकी वसुलीसाठी शासकीय कार्यालयांना विनंतीपत्र रवाना केले जात आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्यांच्या मिळकतींवर जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्यामुळे हा दुजाभाव असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या काही काळापासून महापालिकेकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी विशेष पथक तयार करुन पाठविण्यात आले आहे. तरीही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने, प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

महापालिकेवर थकबाकीचा ५६४ कोटींचा डोंगर आहे. महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात एतिहासिक अडीचशे कोटीची रेकॉर्डब्रेक मालमत्ता कराची वसुली केली. एकीकडे कर विभागाने ही कामगिरी केली असताना दुसरीकडे मात्र थकबाकीचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नसून आतापर्यतची थकबाकी ५६४ कोटीच्या घरात गेली. थकबाकी भरावी याकरिता महापालिका प्रशासनाने एप्रिलमध्ये ते जून या तीन महिन्यात करसवलत या हजार ५४९ रुपयांचा भरणा नागरिकांनी केला आहे. थकबाकीचा महाकाय डोंगर पार करण्याचे आव्हान मनपासमोर आहे.

प्रेसवर ३५ कोटी 
नाशिकरोड येथील नोट प्रेसवर मनपाची सुमारे ३५ कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्याच प्रमाणे विविध मोबाईल टॉवर कंपन्यांवर सुमारे ५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. विभागीय महसूल आयुक्त कार्यालयावर देखील सुमारे साडेचार लाख रुपये थकबाकी आहे.

ज्या शासकीय कार्यालयांवर मनपाचे कर थकीत आहे, त्यांना पत्र देण्यात येत असून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे.
अजित निकत, उपायुक्त कर, मनपा

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Rahul Gandhi: “जर भविष्यात पुन्हा असे वक्तव्य केले तर, कोर्ट स्वत:हून…”; स्वा. सावरकरांबाबत वक्तव्यावरुन सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना इशारा

0
राहुल

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून आज सुप्रीम कोर्टाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा देताना कान टोचले. लखनऊ कोर्टाने राहुल गांधी यांच्याविरोधात जारी केलेल्या समन्सवर स्थगिती दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि तुम्ही त्यांच्याबाबत असे वागत आहात! भविष्यात कधीही अशा प्रकारच्या टिप्पण्या करू नका, अन्यथा न्यायालय स्वतःहून त्याची दखल घेऊ शकते, असा इशाराही न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना दिला आहे.

विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी १७ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे भारत जोडो यात्रा दरम्यान वीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांनी सावरकरांना ‘ब्रिटिशांचा नोकर’ असे संबोधले होते. त्याशिवाय, सावरकरांना ब्रिटिश सरकारकडून पेन्शन मिळत असल्याचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी ‘माफी वीर’ अशी टिप्पणी केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे.

वास्तविक, मॅजिस्ट्रेट कोर्टाने या प्रकरणात राहुल गांधींविरुद्ध समन्स जारी केले होते. या समन्सच्या विरोधात राहुल गांधींनी अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तथापि, अलाहाबाद उच्च न्यायालयाने समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.

कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता
राहुल गांधींच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, त्यांच्या अशिलाचा कोणालाही चिथावणी देण्याचा हेतू नव्हता. यावर न्यायालयाने म्हटले की, जर त्यांना कोणालाही चिथावणी द्यायची नव्हती तर त्यांनी अशी विधाने का केली. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल खोटी विधाने करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असा सक्त सल्ला कोर्टाने राहुल गांधींना दिला आहे. त्यांनी राहुल गांधींना सांगितले की ते राजकारणी आहेत, मग ते अशी विधाने का करतात, असे करू नका.

महाराष्ट्रात असे विधान केले, तिथे लोक त्यांची पूजा करतात
जर भविष्यात त्यांनी पुन्हा असे विधान केले तर कोर्ट त्या विधानाची दखल घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने म्हटले की, ‘तुम्ही महाराष्ट्रात असे विधान केले. तिथे लोक त्यांची पूजा करतात. तुमच्या आजीनेही सावरकरांचे कौतुक करणारे पत्र लिहिले होते. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटीश अधिकाऱ्यांना पत्रे पाठवत असत तेव्हा ते लिहित असत, तुमचा विश्वासू सेवक. त्यामुळे तुम्ही महात्मा गांधींना इंग्रजांचे सेवक म्हणणार का? असा खडा सवाल विचारत करत स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणे चुकीचे आहे असे म्हंटले आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने लखनऊ कोर्टाच्या समन्सवर तात्पुरती स्थगिती दिली, पण याच वेळी कठोर इशारा दिला. ‘कोणालाही स्वातंत्र्यसैनिकांविषयी चुकीची वक्तव्ये करण्याचा अधिकार नाही, असेही सुप्रीम कोर्टाने बजावले. “जर भविष्यात पुन्हा असे वक्तव्य केले गेले, तर कोर्ट स्वत:हून याची दखल घेईल असा इशारा देताना राहुल गांधी यांना स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान न करण्याचा सल्ला दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला हायकोर्टाकडून मोठा दिलासा; अटकेची कारवाई करण्यास पोलिसांना मज्जाव, पण…

0
कुणाल

मुंबई | Mumbai
स्टँडअप कॉमेडियन असलेल्या कुणाल कामरा यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका शोमध्ये गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ असे संबोधून त्यांची बदनामी केली , या आरोपाखाली अनेक एफआयआर दाखल झाल्याने अटकेची भीती असलेला कलाकार कुणाल कामरा याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरा याने केलेली याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना कामराविरोधातील तपास सुरू ठेवावा, परंतु, याचिका प्रलंबित असेपर्यंत कामरा याच्यावर अटकेची कारवाई केली जाऊ नये. तसेच, चेन्नई येथे जाऊन त्याचा जबाब नोंदवण्यात यावा, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले. तर पोलिस कनिष्ठ कोर्टात आरोपपत्रही दाखल करू शकतील. मात्र, त्या कोर्टाने उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत त्या आरोपपत्राची दखल घेऊ नये, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे.

कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती. तसेच, आमदार मुरजी पटेल यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे खार पोलिसांनी कामराविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कामरा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, आपल्या जीवाला धोका असल्याने आपला जबाब व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नोंदवण्याची मागणी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने १६ एप्रिल रोजी कामराला निकाल येईपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले होते. यापूर्वी मद्रास उच्च न्यायालयाने कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण १७ एप्रिलपर्यंत वाढवले होते. कामराने त्याच्या याचिकेत म्हटले होते की तो तमिळनाडूचा रहिवासी आहे आणि शोनंतर त्याला सतत जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने तो महाराष्ट्रात येण्यास घाबरत आहे. त्यावरून न्यायालयाने मुंबई पोलिसांना चेन्नईला जाऊन त्याची चौकशी करण्याची परवानगी दिली आहे.

मुंबईतील एका शोदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार’ म्हटल्याने कामराविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले. ज्या ठिकाणी हा शो झाला होता, तिथे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोडही केली होती. या शोदरम्यान कामराने ‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील एका गाण्याची नक्कल करून त्यात शिंदेंना ‘गद्दार’ म्हटले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा केला खात्मा

0
लष्कर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाच्या रेजिस्टेंस फोर्सनं घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली असून दोन जवान जखमी झाले आहे. तर या चकमकीत एलईटी चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाला आहे.

ही चकमक सकाळपासून सुरू होती. लपून बसलेले दहशतवादी जवानांवर गोळीबार करत होते. या दहशतवाद्यांनात जवान देखील चोख प्रत्युत्तर देत होते. या चकमकीमध्ये लष्कर-ए-तोएबाचा कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. जवानांकडून चोख पद्धतीने सर्च ऑपरेन सुरू आहे.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांना बांदीपोरा येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनची माहिती देण्यात आली. ते येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहेत.

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तान देशादरम्यान तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त शोध मोहीम राबवली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Medha Patkar: सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांकडून अटक; काय आहे प्रकरण?

0
सामाजिक

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. निजामुद्दीन भागातून पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट निघाले होते. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतील साकेत कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

काय आहे प्रकरण?
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी २००१ मध्ये मेधा पाटकर यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. साकेत कोर्टाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांना कोर्टात हजर न राहणे आणि जाणुनबुजून शिक्षेशी निगडीत आदेशाचे पालन न करणे असा ठपका ठेवला. कोर्टाचा अवमान करून सुनावणीपासून पळ काढण्याचा हा त्यांचा हेतू होता. त्यामुळे पाटकरांना कोर्टासमोर हजर करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले होते. पाटकरांना २३ वर्षे जुन्या प्रकरणात शिक्ष सुनावण्याती आली. पण त्यांच वय आणि आरोग्य लक्षात घेता त्यांना तुरुंगवासाच्या शिक्षेतून सूट देण्यात आली. पण नुकसानभरपाई आणि बॉन्ड भरण्याचे आदेश दिले गेले होते.

मेधा पाटकर यांना २००० साली दाखल केलेल्या खटल्याची शिक्षा २०२४ मध्ये सुनावण्यात आली आहे. सक्सेना यांना मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवले गेले होते. न्यायालयाने त्यांना २३ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना व्हीके सक्सेनाला १० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही दिले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

मेधा पाटकर यांना २००० साली दाखल केलेल्या खटल्याची शिक्षा २०२४ मध्ये सुनावण्यात आली आहे. सक्सेना यांना मानहानीच्या खटल्यामध्ये त्यांना दोषी ठरवले गेले होते. न्यायालयाने त्यांना २३ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले होते. यापूर्वी जुलै २०२४ मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने त्यांना दोषी ठरवत तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. न्यायालयाने त्यांना व्हीके सक्सेनाला १० लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही दिले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश (एएसजे) विशाल सिंह यांनी मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ-आदिलच्या घर उध्दवस्थ

0
दहशतवादी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने आणि तपास यंत्रणेने दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम तीव्र केली आहे. एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने हल्ल्याचा तपास सुरू केला आहे. पहलगाम हल्ल्यात दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल गुरी यांची नावेही समोर आली. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेख आणि आदिल ठोकर या दोघांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. पहलगाम हल्ल्यात आसिफ शेखचा सहभाग असल्याचा संशय होता. मोठी कारवाई म्हणून याकडे पाहिले जात आहे.

लष्कराने जम्मू काश्मीरमधील दक्षिण काश्मीर भागात असलेल्या अनंतनाग आणि पुलवामा भागात ही कारवाई केली आहे. या कारवाईत आसिफ शेख आणि आदिल यांची घरे उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. येथील गुरी परिसरात लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आदिल ठोकर याचे घर होते, ते स्फोट घडवून उडवण्यात आले आहे. तर आसिफ शेख याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आले.

जम्मू-काश्मीर पोलिस या तपासात सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह आदिल आणि आसिफ शेख यांच्या घरी शोध मोहिमेसाठी गेले होते. यावेळी संशयास्पद वस्तू पाहिल्यानंतर धोक्याची भावना जाणवली. हे पाहून सुरक्षा दलाचे जवान ताबडतोब मागे हटले आणि त्यानंतर एक मोठा स्फोट झाला. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले. घरात स्फोटक पदार्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले. याच स्फोटक पदार्थांमुळे स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

२२ एप्रिल रोजी बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित व्हिडिओमध्ये आसिफ आणि आदिल हे दोघेही दिसत होते. या भ्याड हल्ल्यानंतर दोघेही फरार आहेत. हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर दहशतवाद्यांना ठार मारण्यासाठी सुरक्षा दलांचे ऑपरेशन सुरू आहे. ज्यात आसिफ आणि आदिल यांचा समावेश आहे.

दरम्यान, आदिल शेख या दहशतवाद्याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार तो २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये गेला होता. तिथे त्याने दहशतवादाचं प्रशिक्षण घेतलं होतं. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला होता. पहलगामध्ये हल्ला घडवून आणण्यासाठी त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. त्यानेच दहशतवाद्यांना बेसरन खोऱ्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तरुण भावनांचा आवाज : अरिजित सिंग

0

 

भारतातील सर्वात लोकप्रिय आणि भावपूर्ण गायकीने आपलेसे करणारा अरिजित सिंगचा 25 एप्रिल रोजी 37 वा वाढदिवस आहे. त्यांच्या आवाजाने गेल्या दशकात भारतीय संगीताच्या भावविश्वात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आज प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी क्षण असा असेल जो मनातल्या भावना शब्दांपेक्षा अरिजितच्या गाण्यांशी जास्त जुळलेल्या वाटतात. एका छोट्या गावातून आलेल्या या युवकाने देशभरात आणि बाहेरही आपल्या आवाजाने एवढा प्रभाव कसा निर्माण केला हे एक आश्चर्यच आहे.

अरिजितचा जन्म 1987 मध्ये पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे झाला. राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण त्याच्या घरीच दिसते.. वडील शीख पंजाबी कक्कर-सिंह तर आई बंगाली हिंदू. या दोन्ही संस्कृतींची सांगड त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि आवाजातही झळकते. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुर्शिदाबाद येथेच झाले.

अरिजितला गाण्याचा वारसा त्याच्या आजोळकडून मिळाला. त्याची आजी चांगले गायची.. मावशीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आई तबला वाजवायची आणि गायची. अरिजितला शिक्षणापेक्षा संगीतात रस जास्त होता, हे ओळखून त्याच्या आई-वडिलांनी त्याला शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण देण्याचे ठरवले. वयाच्या तिसर्‍या वर्षापासून त्याचे संगीताचे प्रशिक्षण हजारी बंधूंकडे सुरू झाले. शास्त्रीय संगीताचे गुरू होते राजेंद्र हजारी, तबला त्याने धीरेंद्र हजारी यांच्याकडून तर पॉप म्युझिकचे प्रशिक्षण वीरेंद्र हजारी यांच्याकडून घेतले. वयाच्या नवव्या वर्षी अरिजितला भारत सरकारची शास्त्रीय संगीताची शिष्यवृत्ती मिळाली.

राजेंद्र हजारींच्या सांगण्यावरून अरिजितने 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या संगीत रियालिटी शोमध्ये भाग घेतला आणि तो त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तो या स्पर्धेत सहावा आला, पण त्याच्या आवाजाने संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष वेधले. शंकर महादेवनसारख्या संगीतकारांनी त्याच्या आवाजाची आणि अभिव्यक्तीची प्रशंसा केली.

स्पर्धेनंतर प्रसिद्धीच्या मागे न धावता अरिजितने काही वर्षे संगीत संयोजक आणि सहाय्यक म्हणून प्रीतम, शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर यांसारख्या संगीत दिग्दर्शकांकडे काम केले. त्याकाळात त्याने त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार केला आणि ध्वनी संयोजन, आधुनिक संगीताचे पैलू शिकून घेतले.

लोकप्रियतेची सुरुवात : 2012 ते 2014
2013 साली ‘आशिकी-2’ मधील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे अरिजितची ओळख निर्माण झाली . त्याआधीही ‘फिर ले आया दिल’ आणि ‘राब्ता’ यांसारखी काही गाणी त्याने गायली होती, पण ‘तुम ही हो’ने त्याला घराघरांत पोहोचवले. त्या क्षणापासून तो भारतातील तरुणवर्गाचा चाहता झाला. प्रेम, विरह, दु:ख, आनंद प्रत्येक भावना त्यांनी आपल्या गाण्यांतून अचूक उलगडली.


अष्टपैलू गायनशैली
अरिजितच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही शैलीत सहज गाऊ शकतो. घुंगरूसारख्या पार्टी साँगपासून ते ‘अगर तुम साथ हो’सारख्या भावपूर्ण गीतांपर्यंत, ‘देवा देवा’सारख्या भक्तिगीतांपासून ते ‘लेहरा दो’सारख्या देशभक्तिपर गाण्यांपर्यंत प्रत्येक शैली त्याने आपल्या खास अंदाजात सादर केली आहे. त्याने हिंदी, बंगाली, मराठी, तामिळ, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये गायन केले आहे आणि प्रत्येक भाषेतील शब्दोच्चार व शैली समजून घेत गायले आहे. आज डिेींळषू, र्धेीर्ढीलश सारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सवर अरिजित हा सर्वाधिक ऐकला जाणारा भारतीय गायक आहे. त्याच्या गाण्यांना अब्जावधी व्ह्यूज मिळतात. भारताबाहेरही दुबई, लंडन, टोरांटो, ऑस्ट्रेलिया येथे त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सना प्रचंड गर्दी होते.

साधेपणा : यशामागे शांत वृत्ती
इतक्या यशानंतरही अरिजित एक साधं, खासगी आयुष्य जगणारा व्यक्ती आहे. तो फारसा पुरस्कार सोहाळ्यांना जात नाही, ना तो सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे. तो म्हणतो, माझे संगीतच माझ्या वतीने बोलेल आणि खरेच त्याच्या संगीतानेच त्याने सर्वांशी नाते जोडले आहे.
2014 मध्ये त्याने त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉयशी विवाह केला. सध्या तो आपल्या मुलांबरोबर कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. प्रसिद्धीपासून, लोकांच्या नजरेपासून दूर तो आपले खासगी जीवन जगतो आहे.

दानशूर
अरिजित केवळ गायक नाही तर एक संवेदनशील, जागरुक नागरिक, समाजसेवकदेखील आहे. त्यांनी मुर्शिदाबादमध्ये एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे जी शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी काम करणार्‍या संस्थांना मदत करते. करोनाकाळात त्यांनी स्थानिक रुग्णालयांना मदत केली, ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध करून दिले आणि हे सर्व कोणताही गाजावाजा न करता. त्याच्यासाठी दान ही एक खासगी गोष्ट आहे, प्रसिद्धीसाठी नव्हे.

25 एप्रिल हा अरिजित नावाच्या गायकाचा नुसता वाढदिवस नसून त्याच्या आवाजाचा एक उत्सव साजरा करणे आहे. असा आवाज ज्याने एका पिढीच्या भावविश्वाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रेम, विरह, दुःख, आनंद , कुठलीही भावना असो अरिजितच्या आवाजाने ती साकार केली आहे. त्याचा आवाज भावनांचे एक प्रतिबिंब आहे. अरिजितला त्याच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्याचा सांगीतिक प्रवास असाच पुढे पुढे जात राहो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

संपादकीय : २५ एप्रिल २०२५ – निषेधार्हच!

0

काश्मीर पहलगाम आतंकवादी हल्ला प्रकरणात सरकारने राजनैतिक पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेविषयी लोकभावना आत्यंतिक तीव्र आहेत. लोकांच्या भाषेत पाकिस्तानचे दात त्यांच्याच घशात घालावेत, असा वाढता दबाव सरकारवर आहे. सरकारी पातळीवर या परिस्थितीचा साकल्याने विचार सुरू असेलच. यथायोग्य वेळेत तो लोकांच्या अनुभवास येऊ शकेल.

कलम 370 आणि कलम 35 अ रद्द केल्यांनतर काहीकाळाने जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हळूहळू बदलत होती. पर्यटकांची गर्दी दिसू लागली होती. याचाच एक अर्थ असा की, जम्मू-काश्मीरची अस्थिरतेकडून स्थिरतेकडे वाटचाल सुरू होती. अर्थात याच्यातील प्रमुख घटक स्थानिकांचे आर्थिक स्थैर्य होय. काही वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालेले होते. स्थानिकांना शिक्षण, आर्थिक, सामाजिक संधींची उपलब्धता कमी झाली होती. सातत्याने दहशतीत वावरणार्‍या स्थानिकांना आता कुठे स्थैर्याची आशा दिसू लागली होती.

परिस्थिती बदलल्यानंतर जम्मू-काश्मीरबाबतची ओढ मनात बाळगणार्‍या सर्व पर्यटकांनी या खोर्‍याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या सर्व सोयी-सुविधा वाढल्या. त्यामध्ये छोट्याशा टपरीपासून मोठमोठ्या हॉटेल्सपर्यंत, विमानसेवेपासून टॅक्सी रिक्षापर्यंत, शिकार्‍यापासून बोट राईडपर्यंत, घोडेवाले, फोटोग्राफर, भेळपुरीपासून राज्याच्या खाद्यसंस्कृतीपर्यंत, ट्रॅव्हल एजन्सी, दुभाषी आणि असेच असंख्य छोटे-मोठे स्थानिक रोजगार यातून मोठी उपलब्धी जम्मू-काश्मीरला प्राप्त होत होती. यावर्षी तर याचा उच्चांक झाला.

याचाच अर्थ युवांच्या हाताला काम मिळत होते. राज्यासह हजारो कुटुंबांची आर्थिक घडी बसत होती. त्याचा चांगला परिणाम स्थानिकांच्या सामाजिक-वैयक्तिक-भावनिक-शैक्षणिक बाबींवर पडण्याची पण शक्यता निर्माण झाली होती. बेरोजगार युवकांना रोजगार मिळायला लागला होता. यामुळे आतंकवादाला कुठेतरी चाप बसत होता. अर्थात, ही परिस्थिती आतंकवाद्यांसाठी अनुकूल नव्हती. तेव्हा धार्मिकतेच्या बुरख्याआडून हल्ला करून जम्मू-काश्मीरची घडी विस्कटून टाकण्याचा प्रमुख उद्देश या हल्ल्यामागे दिसतो.

यात पाकिस्तानचा हात असण्याची खात्री सरकारलादेखील वाटत आहे. सरकारने हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ताबडतोब उचललेली पावले ही पाकिस्तानच्या दिशेने असून त्यातून भारत सरकारचा उद्देश स्पष्ट होतो. कुठल्याही प्रकारचा आतंकवाद खपवला जाऊ शकत नाही. अर्थात, यादिशेने खंबीर पावले उचलायची म्हटली तरी त्यासाठी आजूबाबाजूची परिस्थिती सावरावी लागेल. संपूर्ण देशात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे.

स्थानिक लोकांची सुरक्षितता, भावनिक पाठबळ तसेच आर्थिक सक्षमता या गोष्टी बिघडू न देण्याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. हेदेखील मोठे आव्हान असू शकेल. यात स्थानिक युवकांनी संयम बाळगणे व योग्य मार्ग निवडणे गरजेचे राहील. स्थानिक युवकांनी केलेला दहशतवादाचा निषेध व पर्यटकांची घेतलेली काळजी ही सकारात्मक बाब आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी आता सरकार, जम्मू-काश्मीरमधील राजकारणी तसेच तेथील समाजावर आहे.

Ahilyanagar : तीन तालुक्यांत 143 ठिकाणी महिला सरपंचपद जाहीर

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुरूवारी नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, शेवगाव आणि नगर प्रांताधिकारी यांनी या तालुक्यातील महिला सरपंच पदाच्या सोडती जाहीर केल्या. यात श्रीगोंदा तालुक्यात 43 ठिकाणी, नगर तालुक्यात 52 ठिकाणी तर शेवगाव तालुक्यात 48 ठिकाणी महिला सरपंचपद जाहीर झाले आहे. तर जामखेड तालुक्यात तांत्रिक कारणामुळे आरक्षण सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. ही सोड तआज होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात पुढील पाच वर्षासाठीची आरक्षण प्रक्रिया सोडतीचा कार्यक्रम सुरू आहे. बुधवारी जिल्ह्यात तहसीलदार यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण आणि अन्य प्रवर्गातील आरक्षण सोडती पार पडल्या. त्यानंतर गुरूवार (दि.24) रोजी नगर, श्रीगोंदा आणि शेवगाव तालुक्यातील महिला सरपंच पदाच्या आरक्षण सोडती काढण्यात आल्या. जामखेड तालुक्यात हाळगाव, फक्राबाद आणि धनेगाव ग्रामपंचायतीमधील आरक्षणाचा प्रश्न उपस्थित झाला. याठिकाणी वर्षभरापूर्वी आरक्षण काढण्यात आलेले होते. या ग्रामपंचायतींचा समावेश महिला आरक्षणाच्या यादीत घेण्यात आल्याचे गुरूवारी लक्षात आल्यानंतर या सोडती थांबवण्यात आल्या आहेत.

बेलापूर, नाऊर, उक्कलगाव, कारेगाव, पढेगाव, वडाळा, मालुंजा बुद्रुकमध्ये महिलाराज येणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण महिला, सात ग्रामपंचायतींवर ना.मा.प्र. महिला, चार ग्रामपंचायतींवर अनुसूचित जमाती महिला तर सात ग्रामपंचायतीवर अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे. येथील प्रशासकीय सभागृहात प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासमोर महिलांसाठीचे आरक्षण जाहीर झाले. त्यांनी सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे करून ही सोडत काढली.

गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सरला, बेलापूर बुद्रुक या नऊ ग्रामपंचायतींवर सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले आहे. तर भामाठाण, एकलहरे, जाफराबाद, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बुद्रुक, कारेगाव या ग्रामपंचायतीवर ना.मा.प्र. महिला वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे.

अनुसूचित जमाती महिलांसाठी ब्राम्हणगाव वेताळ, रामपूर, माळेवाडी, वळदगाव या गावाच्या ग्रामपंचायतींवर आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जाती महिलांसाठी मांडवे, कुरणपूर, पढेगाव, वडाळा महादेव, निमगाव खैरी, मालुंजा बुद्रुक, लाडगाव आदी ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

Political News : दोन्ही पवारांना एकत्र आणण्यासाठी सुप्रियाताई मध्यस्थी करू शकतात!

0

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कुटुंबाने एकत्र राहिले पाहिजे, ही शिकवण आपली भारतीय संस्कृती देत असते. पवार कुटुंब हे एकच आहे. मात्र, काहीसे मतभेद असतील मात्र एकत्र येण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्यासह शरद पवार यांनी एकत्रितपणे घेतला पाहिजे. तसेच या दोघांना एकत्र आणण्यासाठी सुप्रियाताई या मध्यस्थी करू शकतात, असे सूचक विधान कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार यांनी केले आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आ. पवार हे गुरूवारी नगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आले होते. यावेळी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा झाल्यानंतर आ.पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी मतभेद होऊन दुरावलेले ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा राजकारणात रंगत आहे. याचप्रमाणे पवार कुटुंब एकत्र येणार का? असा प्रश्न पवार यांना करण्यात आला. यावर प्रतिक्रया देत आ. पवार यांनी एक सूचक विधान केले.

यावेळी बोलताना आ. पवार म्हणाले की, राजकीय दृष्टिकोनातून मी काही बोलणार नाही. मात्र, परिवाराच्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून विचार केला असता आपली भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र राहण्याचे शिकवते. भारतीय संस्कृती असो किंवा पवार कुटुंबाविषयी बोलायचे झाले, तर पवार कुटुंब एकच आहे. मात्र जो, काही थोडेफार मतभेद असतील तर मिटावे, अशी इच्छा आ. पवार पवार यांनी व्यक्त केली. तसेच पुढे ते म्हणाले, पवार कुटुंबांनी अधिक ताकदीने एकत्र आले पाहिजे, अशी आमची व्यक्तिगत इच्छा आहे. मात्र, राजकीय दृष्टिकोनातून आपण विचार केला तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार आणि आज दुसर्‍या पक्षाचे नेते असलेले अजित पवार यांनी एकत्र येत निर्णय घेण्याची गरज आहे.

जर या गोष्टी कोणी मध्यस्थी करू शकत असेल, तर ते म्हणजे खासदार सुप्रियाताई सुळे या आहेत. म्हणूनच या तिघांमध्ये भविष्यात एकत्र येण्याबाबत काय निर्णय होईल, यावर आज तर भाष्य करता येणार नाही. मात्र येणार्‍या काळात ते तिघेच एकत्र येणाबाबतची भूमिका स्पष्ट करू शकतात, असे यावेळी बोलताना आमदार पवार म्हणाले. आ. पवार यांच्या सुचक वक्तव्यानंतर पुन्हा राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.