Monday, May 5, 2025
Home Blog Page 29

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील मृतांना ५ लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची माहिती

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तपणे येथील जंगलात एक मोठी शोध मोहीम राबवत आहेत.

पहलगाम हल्ल्यातील ३ गुन्हेगारांचे रेखाचित्र तपास यंत्रणांनी जारी केले आहेत. दरम्यान, दहशतवाद्यांचा एक फोटोही समोर आला आहे ज्यामध्ये ते शस्त्रांसह दिसत आहेत. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

याचबरोबर मंत्री गिरीष महाजन पहलगामला जात आहेत. तीथ जे लोक आहेत त्यांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळही संपर्कात आहेत. त्यांना विषेश विमानांची व्यवस्था करण्याची विनंती केली आहे. त्याचबरोबर ज्या लोकांनी आम्हाला कळवलं आहे की आम्हाला मदत हवी आहे त्या सर्वांना मदत देण्याचं काम आम्ही करत आहोत असंही फडणवीस म्हणाले आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे दुपारी २.३० आणि सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ वर उपस्थित राहतील. योगेश कदम हे मृतांच्या पार्थिवांना त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी पाठवण्याची व्यवस्था करतील. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः सर्व यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर आणि त्यांची टीम काल रात्रीच श्रीनगरला पोहोचली आहे. जेणेकरून तेथील पार्थिव आणि नातेवाईकांना विमानात बसवण्याची व्यवस्था करतील.

मंत्री गुलाबराव पाटील आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम हे समन्वयासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण हे देखील मुंबई विमानतळावर दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये डोंबिवलीतील तीन जणांचा समावेश आहे. रविंद्र चव्हाण कालपासून त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात आहेत. ते डोंबिवलीतील तिन्ही पर्यटकांचे पार्थिव घेऊन डोंबिवलीला रवाना होणार असून संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करत आहेत.

CM Devendra Fadnavis : पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री

0

मुंबई | Mumbai 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam) काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ जणांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्या. यामध्ये महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून, काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक जारी केला असल्याची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

यावेळी ते म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terror Attack) महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यातील पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना तत्काळ महाराष्ट्रात आणण्याकरता सरकारकडून सर्वतोपरी मदत सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. तसेच डोंबिवलीतील तीन मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ समन्वय साधत आहेत”, अशी महिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, “पर्यटकांशी (Tourist) समन्वय साधून ज्यांनी संपर्क साधलाय त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगो विमानातून आणत आहोत. तसेच, उर्वरित पर्यटकांना आणण्याकरता इंडिगोला अतिरिक्त विमान पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे. त्याकरता आवश्यक तिकिटांची व्यवस्था मंत्री मुरलीधर मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात (Maharashtra) आणण्यात येणार आहे”, असेही त्यांनी म्हटले.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. तसेच हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जम्मू-काश्मीरमध्ये उपचार सुरु असून, त्यांना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर महाराष्ट्रात आणले जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

मंत्री गिरीश महाजन श्रीनगरसाठी रवाना

राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. ते त्याठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.

 

 

 

 

Pahalgam Terror Attack : काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’चा हेल्पलाइन क्रमांक जारी

0

मुंबई | Mumbai 

पहलगाम (Pahalgam) येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे (Terror Attack) काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे.

या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई येथे आज आणण्यात येणार आहेत. आज दुपारी श्रीनगर येथून महाराष्ट्रातील आणि गुजरातमधील मृतदेह विमानाने मुंबई विमानतळावर येणार आहेत. तेथून हे मृतदेह ॲम्बुलन्सद्वारे त्यांच्या गावी पाठविण्यात येणार आहेत. यासाठीची सर्व प्रकारची मदत राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे.

दरम्यान, काश्मीरमध्ये (Kashmir) अडकलेले पर्यटक (Tourist) आणि राज्यातील त्यांचे नातेवाईक यांनी मदतीसाठी 022-22027990 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत करण्यात आले आहे.

काश्मीरमधील संपर्क क्रमांक

श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालिन परिस्थिती संपर्क साधता यावा यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात २४x७ मदत कक्ष / आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.

१) दूरध्वनी : 0194-2483651, 0194-2463651, 0194-2457543

२) व्हाट्सॲप : 7006058623, 7780805144, 7780938397

Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचे फोटो समोर; ओळखही पटली

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचं नाव आणि धर्म विचारत गोळ्या घातल्या. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आला असून, त्यातील दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे समोर आले  आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील महिनाभरापासून हे सर्व दहशतवादी (Terrorist Attack) पहलगाम परिसरात सक्रीय होते. त्यांनीच महिनाभर सर्व भागाची रेकी केल्यानंतर हा हल्ला घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, यांनीच हा हल्ला केला का? याबाबतची पुष्टी अद्याप करण्यात आलेली नाही. पंरतु, दहशतवादी हल्ला करण्यासाठी आवश्यक असणारी तयारी याच दहशतवाद्यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार (Firing) करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचेही समोर आले आहे. तर सदर घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, काश्मिरातील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघा स्थानिक दहशतवाद्यांची नावं आदिल गुरी आणि आसिफ शेख असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांसोबत आणखी दोन पाकिस्तानी दहशतवादी होते. पहलगाममध्ये काल झालेल्या या तर या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचे स्केच काही वेळापूर्वी जारी करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांचा फोटो समोर आला आहे. हा भ्याड हल्ला करण्यापूर्वीचा हा दहशतवाद्यांचा फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

Pahalgam Terror Attack : दिल्लीत मोठ्या घडामोडी; भारतीय सैन्याच्या तिन्ही दलांना अलर्ट राहण्याचे आदेश

0

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये काल (दि.२२) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Terrorist Attack) २६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. तसेच या हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून (Central Government) कठोर पावले उचलण्याचे संकेत देण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे पहलगाम दहशतवादी हल्ल्याची (Pahalgam Terror Attack) बातमी समजल्यानंतर सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून आज (बुधवारी) सकाळी दिल्लीत (Delhi) परतले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी विमानतळावरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांच्याशी चर्चा केली. यानंतर दिल्लीच्या साऊथ ब्लॉकमधील केंद्रीय संरक्षण मंत्रालयात तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, अजित डोवाल आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.

या बैठकीला तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीअंती तिन्ही दलाच्या प्रमुखांना आपापले सैन्य तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषत: भारतीय वायूदल आणि नौदलाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा, असे सैन्यदलाला सांगण्यात आले आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये अथवा दिवसांमध्ये काहीतरी मोठी घटना घडू शकते का, याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत.

दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे पहलगाम येथे ज्याठिकाणी हल्ला झाला त्या बैसरन व्हॅलीत हेलिकॉप्टरने दाखल झाले. त्यानंतर अमित शाह यांनी हल्ला झालेल्या ठिकाणाची फिरुन पाहणी केली. यावेळी शाह याठिकाणी हल्ला कसा झाला, याची सगळी माहिती घेऊन त्याचा अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत गेल्या काही तासांपासून महत्त्वाच्या बैठका सुरु आहेत. संरक्षण मंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौधरी यांची एक उच्चस्तरीय बैठक संरक्षण मंत्रालयात (Ministry of Defense) सुरु आहे. पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या सगळ्या बैठकांमध्ये सहभागी होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये दिल्लीत महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा पहिला फोटो समोर, तीन संशयितांचे स्केच जारी

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.

पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या संशियत दहशतवाद्यांचे स्केच समोर आले आहे. तपास यंत्रणांनी हे स्केच जारी केले आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचे नेतृत्व स्वतः पाकिस्तानी दहशतवाद्याने केले होते. या हल्ल्यात जवळपास 6 दहशतवादी सहभागी होते. या दहशतवाद्यांकडे AK-47 सारख्या रायफल होत्या. या घटनेनंतर पहलगाममध्ये भारतीय सैन्याकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी पहलगामच्या जंगलात आणि परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आली असून ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. मंगळवारी दहशतवाद्याने २6 पर्यटकांचा जीव घेतला. नाव विचारले, आयडी पाहिले अन् धडाधड गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या वेशात आलेल्या या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. मित्रांसोबत ते फिरण्यासाठी काश्मीरला गेले होते, पण त्यांची ती ट्रीप अखेरची ठरली.

 

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भिती! रात्रीपासून हवाई दल POKसह अन्य भागात अलर्ट मोडवर

0
अलर्ट

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहे. या हल्ल्यामुळे भारतात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असतानाच संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारत सरकार अॅक्शन मोडवर आले असून काश्मीर खोऱ्यात या दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने सर्जिकल स्ट्राईकची भिती व्यक्त केली असून या घटनेत आपला हात असल्याचा इन्कार करत, स्थानिक बंडखोर संघटनेचे हे कृत्य असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मंगळवारपासून पाकिस्तानने हवाई दलाला अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले असून हवाई गस्त वाढवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य दल अलर्ट मोर्डवर गेले असून पाकिस्तानी वायू दलाला सावध आणि अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे पाकिस्तानी वायूदलाची लढाऊ विमाने सध्या भारताच्या सीमेलगत सातत्याने टेहळणी करतना दिसत आहे. भारताकडून बालाकोटप्रमाणे पुन्हा एकदा एअरस्ट्राईक होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानी सैन्यात सध्या चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून सावध हालचाली सुरु आहेत.

फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाइट फ्लाइट रडार २४ चे स्क्रीनशॉट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर समोर आले आहेत. स्क्रीनशॉटमध्ये कराची येथील सदर्न एअर कमांडमधून लाहोर आणि रावळपिंडीजवळील उत्तरेकडील तळांवर उड्डाण करणारे पाकिस्तान हवाई दलाचे प्रमुख विमान दाखवण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या लाहोर, कराची, पेशावर, रावळपिंडी आणि इस्लामाबाद यासारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, पाकव्याप्त काश्मीर (POK) मध्ये सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पाकिस्तानच्या उलट्या बोंबा
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्ही चॅनेलशी दूरध्वनीवरून बोलताना म्हटले की, पाकिस्तानचा या हल्ल्याशी काहीही संबंध नाही. पण भारतात असलेल्या अस्वस्थ बंडखोर संघटनांचा हात असल्याचा दावा त्यांनी केला. भारतात बंडखोरांच्या अशा अनेक संघटना आहेत, एक-दोन नव्हे तर डझनभर आहेत. अगदी नागालँडपासून काश्मिरपर्यंत आहेत. दक्षिणेत आहेत, छत्तीसगड, मणिपूरमध्ये आहेत, असे ते म्हणाले.

पाकिस्तानची बाजू मांडताना ख्वाजा आसिफ यांनी अल्पसंख्याकांचा राग आळवला आहे. केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध स्थानिकांचे बंड असून ही लोक आपला हक्क मागत आहेत. मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध या अल्पसंख्याकांचे शोषण करणाऱ्या हिंदुत्ववादी सरकारविरुद्ध बंडखोरी करण्यात आली आहे. भारतात जे काही घडत आहे, त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. त्याचबरोबर आम्ही कोणत्याही परिस्थितीत कुठेही दहशतवादाचे समर्थन करत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

भारताची कसुन शोधमोहीम
तर दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी भारतीय सैन्याने सर्वत्र शोधमोहीम हाती घेतली आहे. पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय सैन्याकडून कसून शोध घेतला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या श्रीनगरमध्ये असून ते पहलगामला हल्ला झालेल्या ठिकाणाला भेट देण्यासाठी जाऊ शकतात. तसेच काश्मीर परिसरात कडेकोट लष्करी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये प्रत्येक चौकात लष्कराचे जवान दिसत आहेत. राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएचे पथक पहलगामला जाणार आहे.

उरी आणि पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताने सर्जिकल स्ट्राइक तसेच एअरस्ट्राइक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते. आता पहलगाममध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या मागे जे कोणी असतील त्यांना कठोर शिक्षा दिली जाईल, असे भाराताने म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी हीच भूमिका मांडली असल्याने पाकिस्तानला भीतीने घेरले आहे.

त्यातच, भारतीय लष्कर आणि हवाई दलाने जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था आधीच कडक केली आहे. तर, नियंत्रण रेषेवर ड्रोन आणि हवाई देखरेख टेहळणी वाढवण्यात आली असून सर्व दलांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack : कोण आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद?

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचे थैमान पाहायला मिळाले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला. हा हल्ला २०१९ मधील पुलवामा घटनेनंतरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

या अमानुष हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. या संघटनेने यापूर्वीही अनेक वेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये घातपात घडवले आहेत. TRF ही लष्करचीच एक आघाडी संघटना असून, ती विशेषतः स्थानिक युवकांना भरती करून कट रचते. या हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्ला खालिद असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो सैफुल्ला कसुरी या नावानेही ओळखला जातो आणि लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख आहे. सैफुल्ला हा जम्मू आणि काश्मीरमधील TRF आणि लष्करच्या कारवायांचा मुख्य चालक मानला जातो.

सैफुल्ला हा दहशतवादी हाफिज सईदचा अतिशय जवळचा सहकारी आहे. दोघांमध्ये घनिष्ठ संबंध असून, अनेक महत्त्वाच्या दहशतवादी कारवायांचे नियोजन त्यांनी एकत्रितपणे केले आहे. सैफुल्ल्याला आधुनिक गाड्यांचा छंद असून, तो नेहमी बुलेटप्रूफ आणि महागड्या वाहनांमध्येच प्रवास करतो. त्याची सुरक्षा इतकी कडेकोट आहे की भारतीय पंतप्रधानांच्या सुरक्षेपेक्षाही ती जास्त मानली जाते. त्याच्या आजूबाजूला सतत अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या अनेक दहशतवाद्यांचे संरक्षण असते. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणे फार अवघड मानले जाते.

सैफुल्लाला पाकिस्तानात व्हीव्हीआयपी वागणूक मिळते. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी त्याच्यावर फुले उधळतात, स्वागत करतात. दोन महिन्यांपूर्वी तो पाकव्याप्त पंजाबमधील कंगनपूर येथे एका कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानी लष्कराचे कर्नल जाहिद जरीन खट्टक हेही उपस्थित होते आणि त्यांनी सैफुल्लाच्या भाषणाचे आयोजन केले होते.

एका कार्यक्रमात सैफुल्लाने भारतीय लष्कर आणि नागरिकांविरुद्ध उघड धमक्या दिल्या. त्यानंतर खैबर पख्तूनख्वा येथे झालेल्या एका बैठकीत तो म्हणाला, “आज २ फेब्रुवारी आहे. मी वचन देतो की २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आपण काश्मीर काबीज करू.” या बैठकीचे आयोजनही पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय यांनी केले होते. येथे मोठ्या संख्येने सशस्त्र दहशतवादी उघडपणे उपस्थित होते. या बैठकीत सैफुल्लाने जाहीर घोषणा केली की, “आमचे मुजाहिदीन येत्या काळात अधिक तीव्रतेने हल्ले करतील. २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत काश्मीर मुक्त होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

Sanjay Raut : “… तर त्यासाठी भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार”; संजय राऊतांचा गंभीर आरोप

0

मुंबई | Mumbai 

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल (Pahalgam Terror Attack) दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार (Firing) केला. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू (Death of Tourists) झाला आहे. लोकांना धर्म विचारुन त्यांना ठार करण्यात आल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर आज माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर गंभीर आऱोप केला आहे.

संजय राऊत (Sanjy Raut) यांना माध्यम प्रतिनिधींनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांची हत्या (Murder) करताना त्यांना धर्म विचारून मग गोळ्या झाडल्या होत्या,असे विचारले असता ते म्हणाले की, “जर पर्यटकांची हत्या करताना त्यांना धर्म विचारला गेला असेल तर त्यासाठीही भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे. ज्या प्रकारे आपल्या देशात द्वेषाचं राजकारण सुरू आहे, ती कधी ना कधी उलटणार आहे. पहलागममध्ये जे काही घडलंय, त्यासाठी भाजपाने निर्माण केलेली घाण, द्वेषाचं राजकारण जबाबदार आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, “अमित शाह (Amit Shah) हे अपयशी गृहमंत्री आहेत. मीच नाही तर संपूर्ण देश त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. अमित शाह हे अपशकुनी आणि अपयशी गृहमंत्री आहेत. त्यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही आहे. ते दिवसभर राजकारण, कटकारस्थान करत असतात. हा पक्ष तोडायचा, तो पक्ष तोडायचा, हे चालत असतान तिकडे संपूर्ण देश तुटत आहे. आमची माणसं मारली जात आहेत आणि हे लोक राजकारणात गुंतलेले आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली.

पुढे ते म्हणाले की,”काल पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आमचे देशभरातील पर्यटक मारले गेले. त्यात महाराष्ट्रामधील सहा जणांचा समावेश आहे. काश्मीरवर केंद्राचं पूर्ण नियंत्रण राहावं यासाठी कलम ३७० हटवलं. जम्मू -काश्मीरला केंद्रशासित बनवलं. त्यामुळे काल पहलगाम येथे जो हल्ला झाला, त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची नाही तर केंद्र सरकारची आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

तसेच “मोदी (Modi) म्हणाले होते की, दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीर बनवू. जम्मू-काश्मीर पर्यटकांसाठी स्वर्ग बनवू, लोक स्वर्गात गेले. तुम्ही त्यांना स्वर्गात पाठवले. उद्या हे लोक २७ जणांच्या घरी जाऊन सांगतील की, नंदनवनात त्यांचा मृत्यू झाला ते स्वर्गात गेले,जसे कुंभमेळ्याच्यावेळी सांगितले की, जे मेले त्यांना मोक्ष मिळाला. मेलेले लोक गोमूत्र पाजून जिवंत होणार नाहीत. फडणवीस म्हणतात करारा जबाब देंगे, गोमूत्र शिंपडून जिवंत करणार का?” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

पहलगामनंतर आता बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा प्रयत्न; दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

0
घुसखोरी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मिरच्या पहलगाममध्ये दहतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी आणि सुरक्षा दलात तुंबळ चकमक उडाली असून या चकमकीत आत्ता पर्यंत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. दरम्यान, ही चकमक अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.

बारामुल्लामध्ये ३ दहशतवाद्यांनी घुसखोरी करणाऱ्या प्रयत्न केला असता यातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांनी या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्रं, दारुगोळा, आणि अन्य सामग्री जप्त केली आहे. चिनार पोलिस-इंडियन आर्मी एक्स हँडलने एका पोस्टमध्ये या कारवाईची माहिती दिली. जवानांनी पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

याबाबत, अधिक माहिती अशी की, ‘२३ एप्रिल रोजी बारामुल्ला येथील ऊरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी, २ ते ३ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून सध्या चकमक सुरु आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा