Monday, May 5, 2025
Home Blog Page 28

श्रीरामपूर तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

0

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील 52 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत काल काढण्यात आली. यामध्ये बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द हे सर्वसाधारण झाले असून पढेगाव, निपाणी वडगाव व वडाळा महादेव यांना अनुसूचित जातीचे आरक्षण मिळाले आहे. भोकर, माळवडगाव, नाऊर, भोकर, भेर्डापूर यांना सर्वसाधारणमध्ये संधी मिळाली आहे. 52 गावातील सरपंचपदाच्या आरक्षणात अनुसूचित जाती 13, अनुसूचित जमाती 8, इतर मागास प्रवर्ग 14 तर सर्वसाधारणला 17 जागा मिळाल्या आहेत.

येथील प्रशासकीय सभागृहात तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सरपंच पदाचे आरक्षण सर्व नियमांच्या आधारे करून ही सोडत काढली. यात अनुसूचीत जातीमध्ये गोवर्धनपूर, मातुलठाण, मांडवे, कुरणपूर, दत्तनगर, पढेगाव, निपाणीवडगाव, वडाळामहादेव, खानापूर, उंबरगाव, निमगावखैरी, मालुंजा बुद्रुक, लाडगाव तर अनुसुचीत जमाती – खोकर, ब्राम्हणगाव वेताळ, टाकळीभान, रामपूर, भैरवनाथनगर, माळेवाडी, वळदगांव, महांकाळवडगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – भामाठाण (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), एकलहरे, गुजरवाडी, हरेगाव (निवडणूक न झाल्याने कायम ठेवले), जाफ्राबाद, खंडाळा, खिर्डी, शिरसगाव, उक्कलगाव, उंदिरगाव, वांगी बुद्रुक, वांगी खुर्द., कान्हेगाव, कारेगाव तर
सर्वसाधारमध्ये बेलापूर खुर्द, भेर्डापूर, भोकर, दिघी, फत्याबाद, गळनिंब, घुमनदेव, गोंडेगाव, कडीत बुद्रुक, कमालपूर, माळवडगाव, मातापूर, मुठेवाडगाव, नाऊर, नायगाव, सराला, बेलापूर बुद्रुक तसेच टाकळीभान ग्रामपंचायत सरपंच अनुसूचित जाती महिला होते ते आता अनुसूचित जमाती झाले आहे.

याठिकाणी लोकसंख्येचा निकष लावण्यात आला. भोकर या अगोदर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला होते. आता सर्वसाधारण सरपंचपद लाभले आहे. खोकर सरपंचपद अनुसूचित जाती महिला होते. आता अनुसूचित जाती सरपंच राहणार आहे. बेलापूर सरपंचपद अगोदर अनुसूचित जाती होते.आता ते सर्वसाधारण झाले आहे. तर बेलापूर खुर्द इतर मागास प्रवर्ग होते तेही आता सर्वसाधारण झाले आहे. उक्कलगाव ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जाती महिला होते.आता ती संधी इतर मागास प्रवर्गाला मिळाली आहे.

धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

0

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. याशिवाय महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये.

धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण तसेच समन्वयासाठी प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या. धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

रूग्णालयात डॅशबोर्ड आणि फलक
राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रूग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आदी उपस्थित होते.

 

 

 

 

Pahalgam Terroist Attack- : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारची पाकिस्तानवर मोठी कायदेशीर कारवाई

0

दिल्ली | वृत्तसंस्था

पहलगाम हल्ल्यानंतर कॅबिनेट सुरक्षा समिती कडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पहलगाम हल्ल्या बाबत  सर्व माहीत देण्यात आली. कॅबिनेट सुरक्षा समिती कडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.दरम्यान भारत सरकारने  पाकिस्तान विरोधात कठोर पाउले उचलली आहेत.

कारवाई पुढील प्रमाणे

१) पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला

2) अटारी-वाघा बॉर्डर बंद करणार

३) पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद करणार; पुढील ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश

४)पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी

५)आठ दिवसात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा

६) जे भारतीय नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी 1 मे पर्यंत भारतात परत यावे

Pahalgam Terror Attack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला रवाना

0

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू आणि काश्मीरला जाण्यासाठी रवाना झाले आहेत.

पहलगाम येथे दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यानंतर तिथे अडकून पडलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणण्यासाठी आता स्वतः उपमुख्यमंत्री शिंदे जम्मू आणि काश्मीरला गेल्यामुळे सरकारच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या मदत कार्याला अधिक वेग येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे. तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही संपर्क साधून अजित पवार यांनी विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद आणि सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन
काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra News : धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी विशेष तपासणी पथक – मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

0

मुंबई | प्रतिनिधी | Mumbai

पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू ओढावल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज (बुधवारी) राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. याशिवाय महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या तसेच महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी, अशा सूचना फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय (Hospital) मदत कक्षाचा आढावा घेण्यात आला. यावेळी फडणवीस म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार आणि वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये.

धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण तसेच समन्वयासाठी प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

दरम्यान, या बैठकीला (Meeting) उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी आणि न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती आदी उपस्थित होते.

रूग्णालयात डॅशबोर्ड आणि फलक

राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतच्या माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रुग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रूग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी बैठकीत दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

IPL 2025 : आज MI vs SRH लढत; बाद फेरीचे आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य

0

मुंबई | Mumbai

आयपीएल २०२५ (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (बुधवारी) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) संघाचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना हैदराबाद येथील राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजता खेळविण्यात येणार आहे. बाद फेरीच्या शर्यतीत आपले आव्हान कायम राखण्यासाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य असणार आहे. तर पराभूत संघाला स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे अव्वल ४ संघांमध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी सर्व १० संघांमध्ये प्रचंड रस्सीखेच पहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद पॅट कमिन्सकडे (Pat Cummins vs Hardik Pandya) तर मुंबई इंडियन्स संघाची धुरा हार्दिक पांड्याकडे असणार आहे.

आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या टप्प्यात ५ सामन्यात १ विजय आणि ४ पराभव स्वीकारुन २ गुणांची कमाई केली होती. मात्र, दुसऱ्या टप्यात चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरूध्द विजय संपादन करून जबरदस्त कमबॅक केले आहे. त्यानंतर आता सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध सलग दुसरा विजय संपादन करून बाद फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित करण्यासाठी मुंबई इंडियन्स संघ सज्ज असणार आहे.

दरम्यान, आयपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये दोन्ही संघांमध्ये २४ सामने खेळविण्यात आले असून, हेड टू हेड आकडेवारी पाहिल्यास मुंबई इंडियन्सने १४ तसेच सनरायझर्स हैदराबादने १० सामन्यात विजय संपादन केला आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ९ सामने खेळविण्यात आले असून, सनरायझर्स हैदराबादने ५ तसेच मुंबई इंडियन्सने ४ सामन्यात विजय (Won) संपादन केला आहे.

Pahalgam Terror Attack: श्रीनगर ते मुंबई विमान प्रवासाची तिप्पट भाडेवाढ; नेटीझन्सने संताप व्यक्त करताच सरकारने उचलले महत्वाचे पाऊल

0
श्रीनगर

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून आप आपल्या राज्यात परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत.

यासंदर्भात सोशल मीडियावर काही युजर्संकडून सध्याच्या विमान तिकीटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विमान कंपन्यांनी तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

डीजीसीएने आज सकाळी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटक आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आलेत. शेकडो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरला आलेत. पण दहशतवादी हल्ला झाल्याने ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएकडून विमान कंपन्यांना दिलेत.

श्रीनगर ते मुंबई तिकीट दर ५६ हजार रुपयांपर्यंत
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱ्या तिकीटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्संने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानुसार, तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट ५६ हजार रुपयांपर्यत वाढवल्याचे एका युजर्संने स्क्रीन शॉट शेअर करुन म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने विमानकंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून संकटात संधी शोधण्याचे काम दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचेही नेटीझन्सने म्हटले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack : “तर पडद्यामागे असणाऱ्यांनाही सोडणार नाही”; पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला इशारा

0

 

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था 

जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम (Pahalgam) या पर्यटनस्थळी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेनंतर केंद्र सरकारकडून कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात झाली असून, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘जशास तसं उत्तर’ दिले जाईल, असे म्हणत दहशतवाद्यांना इशारा दिला आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, “पहलगाममध्ये केलेल्या भ्याड हल्ल्यात (Attack) आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानुष कृत्याने आम्हा सर्वांना दुःख आणि वेदना झाल्या आहेत. सर्वप्रथम ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्व कुटुंबांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या प्रसंगी, दिवंगत आत्म्याच्या शांतीसाठी, मी ईश्वराकडे प्रार्थना करतो”, असे त्यांनी म्हटले.

तसेच “देशवासियांना मी आश्वासन देतो की, पहलगाम घटनेवर भारत सरकार (India Government) आवश्यक ते सर्व पाऊले उचलेल. आम्ही फक्त हे कृत्य करणाऱ्यांवरच कारवाई करू असे नाही तर, ज्यांनी पडद्यामागे बसून भारतीय भूमीवर असे नापाक कृत्य करण्याचा कट रचला आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जाईल. भारताला अशा दहशतवादी कृत्यांनी घाबरवता येणार नाही. दहशतवाद्यांना ‘जशास तसं उत्तर’ दिले जाईल”, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संध्याकाळी बैठक

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बुधवारी (२३ एप्रिल २०२५) जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही दलांचे प्रमुख, संरक्षण सचिव आणि लष्कराचे लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक उपस्थित होते. यानंतर पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आज (दि.23) सायंकाळी ६ वाजता सीसीएसची बैठक होणार आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. संरक्षणमंत्र्यांनी सशस्त्र दलांना दहशतवादविरोधी कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुरक्षा व्यवस्थेमध्ये वाढ

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. देशभरातील प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. मुंबई, दिल्ली, पुण्यासह कोकण किनारपट्टीवर विशेष सतर्कता जारी करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये या घटनेचा निषेध करत बंदची हाक देण्यात आली, जम्मू काश्मीरच्या अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला असून, अनंतनागमध्ये संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

Pahalgam Terror Attack: साता जन्माची गाठ सात दिवसात तुटली; शहीद झालेल्या पतीच्या शवपेटीला मिठी मारताच हंबरडा फोडला, सॅल्युट मारत म्हणाली…

0
शहीद

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहीद झालेल्या भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी नवविवाहित पत्नी हिमानीने दिल्ली एअरपोर्टवर पतीचे पार्थिव पाहून हंबरडा फोडला. यावेळी ती एकच प्रश्न विचारत होती की,’मी आता कशी जगू?’

पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. हा हल्ला हा २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा सर्वांत मोठा हल्ला आहे. साधारणपणे चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी धर्म विचारत पर्यटकांच्या दिशेने चार ते पाच मिनिटे गोळीबार केला.

या हल्ल्यात नौदलाचे अधिकारी असलेल्या विनय नरवाल याचाही मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनयचा ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी हिमांशीशी विवाह झाले होते. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांनी हिमाशींसमोर विनयवर गोळ्या झाडल्या. यानंतर पत्नीने आता विनयला अखेरचा निरोप दिला आहे.

विनय नरवालच्या पत्नीने शवपेटीला मिठी मारली. यावेळी तिला रडू आवरले नाही, तिने हंबरडा फोडला. शेवटी सॅल्यूट करून तिने जयहिंद असे म्हटले. लेफ्टनंट नरवाल यांचे पार्थिव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच कुटुंबातील सदस्य, लष्करी अधिकारी आणि तेथे उपस्थित असलेले सामान्य लोक दुःखी झाले. नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि अभिवादन केले. त्यांच्यासोबत हवाई दल प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी व्हिडीओ कॉलवर विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विनयच्या आजोबांनी पत्रकारांना सांगितले की, “लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचे होते पण त्याला व्हिसा मिळाला नाही आणि म्हणूनच तो काश्मीरला गेला.”

आजोबांनी पंतप्रधान मोदींना दहशतवाद संपवण्याचे आवाहन केले. मूळचा हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नेव्हीमध्ये रुजू झाला होता. विनयला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. विनयची पत्नी सुरक्षित आहे. या घटनेनंतर विनयच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी काल डोळ्यादेखत सुख ओरबाडलं; आज मृतदेहसमोर येताच म्हणाली जय हिंद…

0

नवी दिल्ली | New Delhi | वृत्तसंस्था 

जम्मू काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल (दि. २२ एप्रिल) रोजी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १३ जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या वेशात आलेल्या काही दहशतवाद्यांनी काश्मीर फिरायला आलेल्या पर्यटकांना (Tourist) त्यांचे नाव आणि धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला.

पहलगाममधील (Pahalgam) या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात एक फोटो देशभर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये नौदल अधिकारी असणारे लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) मृतावस्थेत पडलेले आणि त्यांची नवविवाहित पत्नी हिमांशी नरवाल त्यांच्या शेजारी अस्वस्थअवस्थेत बसलेली दिसत आहे.

हरियाणातील (Haryana) कर्नाल येथील लेफ्टनंट विनय नरवाल (२६) हे काल (दि.२२) रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. अवघ्या सात दिवसांपूर्वीच हिमांशी नरवालशी त्यांचे लग्न झाले होते. दोन दिवसांपूर्वी विनय आणि हिमांशी हनिमूनसाठी जम्मू-काश्मीरला पोहोचले होते. मंगळवारी ते बैसरन व्हॅलीमध्ये फिरत असताना दहशतवाद्यांनी विनयवर गोळीबार केला. ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, त्यानंतर आज विनय नरवाल यांचे पार्थिव दिल्लीत (Delhi) आणण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नीसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. आपल्या पतीचा मृतदेह समोर येताच पत्नी हिमांशीने एकच टाहो फोडला होता. यावेळी तिने लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन ‘जय हिंद’ विनय असे म्हणत साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.