सटाणा । प्रतिनिधी Satana
पहलगाम (जम्मू काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शहरासह तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव व सर्व राजकीय पक्षांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शिस्तबद्ध व शांततेने काढण्यात आलेल्या या मोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सटाणा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या सटाणा बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते.
सकाळी दहा वाजेपासून शहरातील शिवतीर्थावर शहरासह तालुक्यातील सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने जमा झाले. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हातात भगवे ध्वज व तिरंगा घेऊन अकरा वाजता या जन आक्रोश मोर्चास सुरुवात झाली. भारत माता की जय, अतिरेक्यांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यास छुपा पाठिंबा देणार्या पाकिस्तानचा निषेध असो, हमसे जो टकरायेगा मिट्टी मे मिल जायेगा अशा घोषणा देत शहरातील टिळक रोड, शहर पोलीस चौकी, मल्हार रोड, सटाणा बस स्थानक, ताहाराबाद रोड या मार्गाने मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी मंगेश खैरनार, गुना राजपूत, मंगेश भामरे, गजेंद्र सोनवणे, आबा बच्छाव यांची समयोचित भाषणे झाली. मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक गणापुरे यांनी मोर्चाला सामोरे जात निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर मोर्चाची सांगता झाली.
या मोर्चात माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, माजी नगरसेवक दीपक पाकळे, किशोर कदम, रामूतात्या सोनवणे, महेश देवरे, अनिल सोनवणे, सटाणा कृउबा संचालक, दीपक सोनवणे, योगेश रौंदळ, पप्पू शेवाळे, शिवसेनेचे रवींद्र सोनवणे, शरद शेवाळे, सौरभ सोनवणे, बंटी सोनवणे, विजय पाटील, श्रीकांत पाटील, विलास दंडगव्हाळ, सागर सोनवणे, दीपक अहिरे, राजनसिंह चौधरी, जयवंत पवार, प्रसाद अहिरे, प्रदीप बच्छाव, हेमंत शिंदे, समको बँक संचालक महेश देवरे, जगदीश मुंडावरे, पंकज ततार, किशोर भांगडिया, मयूर सोनवणे यांचेसह सकल हिंदू समाज बांधव व सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व वैशाली पवार, ज्योती ठाकरे, अॅड. मनीषा ठाकूर, मीनाक्षी सोनवणे, पौर्णिमा शिवदे, छाया सोनवणे, सोनाली ठाकरे, नीलम सोनवणे, रूपाली सोनवणे यांचेसह महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक गणापुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोवार, दंगल नियंत्रण फोर्सचे जवान यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
मुस्लीम समाजाचा मूकमोर्चा
दरम्यान, पहलगाम घटनेच्या निषेधार्थ येथील मुस्लीम समाजाच्या वतीने कॅण्डल मार्च काढण्यात येवून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानविरोधी घोषणा दिल्या. जामा मशिदपासून काढण्यात आलेला हा मोर्चा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शिवतीर्थ येथे नेण्यात आला. यावेळी जामा मशिदीचे मौलाना नुरी फईम शेख यांनी घटनेचा तीव्र निषेध करीत दहशतवाद्यांचा खातमा करावा, अशी मागणी केली. या कॅण्डल मार्चमध्ये माजी नगरसेवक मुन्ना शेख, मुन्ना रब्बानी, अल्ताफ मुल्ला, आरीफ मन्सुरी, यासीर शेख, मोसवी शेख, सलीम मन्सुरी, शब्बीर तांबोळी, बबलू शेख, शकील मन्सुरी, रिजवान सैय्यद, वसीम मन्सुरी, शरीफ तांबोळी, एजाज शेख आदींसह शहरातील बहुसंख्य मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.