Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशलम्पी व्हायरस पाकिस्तानमधून आला; बाबा रामदेव यांचा दावा

लम्पी व्हायरस पाकिस्तानमधून आला; बाबा रामदेव यांचा दावा

दिल्ली | Delhi

भारतातील अनेक राज्यांमध्ये लम्पी या आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. लम्पीमुळे पशुपालक हवालदिल झालेत. माणसांमध्ये ज्या प्रमाणे करोना हा संपर्कात आल्यानं पसरत होता त्याचप्रमाणं प्राण्यामध्ये हा रोग पसरतोय.

- Advertisement -

याचदरम्यान लम्पी बाबत योगगुरु बाबा रामदेव यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आला असून तो मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे, त्यामुळं व्हायरसची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय गिलॉयपासून आजारी प्राणी बरे करण्याचा दावा बाबांनी केला आहे.

हरिद्वारमध्ये पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, सनातनच्या मूल्यांना सर्वात मोठी इजा पोहोचवण्यासाठी आणि गायीला आजारी पाडण्यासाठी आणि मारण्यासाठी लम्पी विषाणूचा प्रसार करण्यात आला आहे. ते म्हणाले की, ज्या गायींची प्रतिकारशक्ती योग्य आहे, त्यांना कोणताही त्रास झालेला नाही, असे ते म्हणाले. शिवाय गायी निरोगी राहण्यासाठी त्यांनी आपल्या गायींना गिलॉय द्यायला लावले. या आजाराची योग्य तपासणी करण्यासाठी ते सरकारशी बोलत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या