Sunday, May 19, 2024
Homeदेश विदेश...तर पाकिस्तान करणार 'INDIA' नावावर दावा? काय आहे प्रकरण?

…तर पाकिस्तान करणार ‘INDIA’ नावावर दावा? काय आहे प्रकरण?

दिल्ली | Delhi

संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मात्र या अधिवेशनात इंडियाचे नाव भारत करण्यात येईल अशा चर्चा सुरू झाल्याने वेगळ्याच राजकीय वाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. जी 20 शिखर परिषदेच्या संमेलनावेळी होणाऱ्या विविध देशातील प्रमुखांना डिनरसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोलावले आहे.

- Advertisement -

मुर्मू यांनी भारतातर्फे जी 20 तील देशांना निमंत्रण पत्र पाठवले आहे. यात त्यांच्या कार्यालयाने प्रेसिडेंट ऑफ इंडिया असं न लिहिता प्रेसिडेंट ऑफ भारत अस लिहिलं आहे. याचबरोबर एका सरकारी बुकलेटमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव भारत के प्रधानमंत्री असं लिहिण्यात आला आहे. यामुळे इंडिया हे नाव हटवण्यात येणार का? त्या जागी भारत हाच शब्दप्रयोग करण्यात येणार का? असा प्रश्न कित्येक नागरिकांना पडला आहे.

अशातच आता पाकिस्तानमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भारताने आपले INDIA हे नाव सोडल्यास पाकिस्तान ते घेऊ शकतो असे म्हटले जात आहे. पाकिस्तानी माध्यमांत याबाबत चर्चा सुरू आहे. पाकिस्तानकडून अद्याप अधिकृतपणे असे काहीही बोलले गेले नसले तरी देशांच्या नावांसंदर्भातील वादविवाद आणि चर्चा भारतीय माध्यमांप्रमाणेच पाकिस्तानच्या माध्यमांमध्येही रंगल्या आहेत.

पाकिस्तानच्या स्थानिक मीडियाचा हवाला देत म्हटले जात आहे की, भारताने INDIA हे नाव सोडले तर पाकिस्तान त्यावर आपला हक्क सांगू शकतो. परंतु हे देखील लक्षात घ्यायला हवं की पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या फाळणीच्या वेळी INDIA नावावर आक्षेप घेतला होता. दुसरीकडे, पाकिस्तानमधील राष्ट्रवादी गट बऱ्याच काळापासून INDIA नावावर दावा करत आहेत. कारण INDIA हे नाव सिंधू नदीच्या INDUS या इंग्रजी नावावरून आले आहे आणि सध्या ही नदी पाकिस्तानमध्ये वाहते.

- Advertisment -

ताज्या बातम्या