Friday, September 20, 2024
Homeदेश विदेश...तर 18 कोटी पॅनकार्ड होणार रद्द

…तर 18 कोटी पॅनकार्ड होणार रद्द

नवी दिल्ली | New Delhi – आधार आणि पॅन कार्ड संलग्न करणे बंधनकारक असतानाही, अनेकांनी अजूनही असे केले नाही. पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत आधार-पॅन जोडणी करण्यात आली नाही, तर देशभरातील सुमारे 18 कोटी पॅन कार्ड रद्द होणार असल्याचे अर्थमंत्रालयाच्या एका ताज्या अहवालात म्हटले आहे. Income Tax Department

- Advertisement -

या लोकांचे पॅन कार्ड रद्द झाल्यानंतर त्यांना, अनेक प्रकारच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या अडचणी येणार आहेत. बहुतांश व्यवहार पॅनकार्ड दाखविल्याशिवाय होत नाहीत. असे व्यवहार त्यांना करता येणार नसल्याचे अहवालात नमूद आहे.आतापर्यंत 32.17 कोटी नागरिकांनी आपले पॅन आणि आधार संलग्न केले आहेत, अशी माहिती ‘मायगव्हइंडिया’ने आपल्या ट्विटरवर दिली होती, तर 29 जूनपर्यंत एकूण 50.95 कोटी लोकांना पॅनकार्ड वितरित करण्यात आले आहेत. Permanent Account Number (PAN)

दरम्यान, कर बुडविण्यासाठी एकापेक्षा जास्त पॅन कार्ड हाताळणार्‍या आणि त्या माध्यमातून मोठ्या रकमांचे व्यवहार करणार्‍या लोकांविरुद्ध छापेमारी करण्याची आयकर खात्याची योजना असल्याचे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने इंग्रजी दैनिकाला सांगितले. या अधिकार्‍याच्या मते, 130 कोटी लोकसंख्येच्या या देशात फक्त दीड कोटी लोकच आयकरात आपले योगदान देतात. या पार्श्‍वभूमीवर कराची व्याप्ती वाढविण्याची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या