Friday, July 3, 2026
Homeनाशिकपंचवटी मार्केटमधील लिलाव शरदचंद्र पवार मार्केट मध्ये होणार

पंचवटी मार्केटमधील लिलाव शरदचंद्र पवार मार्केट मध्ये होणार

नाशिक | प्रतिनिधी 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पंचवटी मार्केटमधील लिलाव शरदचंद्र पवार मार्केट मध्ये होतील अशी माहिती जिल्हा सहकार उपनिबंधक गौतम बलसाने यांनी दिली आहे.

- Advertisement -

मार्केट यार्डमधील होणारी गर्दी रोख़ण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सह. संस्था गौतम बलसाने यांच्या आदेशानुसार बाजार समितीचे पंचवटी मार्केट यार्डमधील सकाळ सत्रातील किरकोळ विक्रेते/चवली दलाल व कोबी फ्लावर लिलाव शरदचंद्रजी पवार मार्केटमध्ये 25 मार्च 2019 पासून स्थलांतरित करण्यात येत आहे.

हापसन व पालेभाज्यांचे लिलाव पंचवटी मार्केट मध्येच होतील याची सर्व शेतकरी, दलाल, विक्रेते, व्यापारी यांनी नोंद घ्यावी तसेच जास्त गर्दी करू नये असेही यावेळी सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

चेन्नई येथील भक्ताकडून 13 लाख किमतीचा सोन्याचा मुलामा असलेला शंख साई...

0
शिर्डी । प्रतिनिधी शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात भक्तांच्या श्रद्धेचे आणखी एक प्रेरणादायी उदाहरण पाहायला मिळाले. देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत माथा टेकवण्यासाठी येतात. बाबांच्या अढळ...