Wednesday, October 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPankaja Munde : "मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, आता आपला डाव खेळणार";...

Pankaja Munde : “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी, आता आपला डाव खेळणार”; दसरा मेळाव्यातून पंकजा मुंडेंचा निर्धार

मुंबई | Mumbai

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील चार ठिकाणी दसरा मेळावा (Dussehra Melava) पार पडत आहे. यातील दोन मेळावे बीडमध्ये होत असून या दोन्ही मेळाव्यांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. यातील पहिला मेळावा हा बीडमधील नारायणगड येथे मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलतांना जरांगे यांनी “आपल्याला यावेळी उलथापालथ करावीच लागणार” असे म्हणत सरकारला इशारा दिला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Manoj Jarange Patil : “मला चारही बाजूने घेरलं, माझ्या समाजाला…”; जरांगेंचा नारायण गडावरून सरकारवर निशाणा

त्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दरवर्षीप्रमाणे भगवान गड याठिकाणी दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यास तब्बल १२ वर्षांनतर आवर्जून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी देखील हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना आपल्या कणखर भाषणातून संबोधित केले. यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी “मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हू” अशी हिंदीतून कविता म्हणत भाषणाला सुरुवात केली. यानंतर उपस्थित जनसमुदायाला त्यांनीही संबोधित केले.

हे देखील वाचा : Raj Thackeray : “बेसावध राहू नका, हीच क्रांतीची वेळ”; राज ठाकरेंचे पॉडकास्टच्या माध्यमातून मतदारांना आवाहन

यावेळी बोलतांना पंकजा मुंडे म्हणाल्या की,”माझ्या दसरा मेळाव्याला मी कुणालाही निमंत्रण देत नाही. माझा सन्मान ठेवून सर्वजण येतात. माझ्या लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिला. त्यामुळे इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जास्त जीव लावते आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता. या मेळाव्याला माझे बंधू महादेव जानकर, गोंडस लेकरू लक्ष्मण हाके यांनी काल मला व्हिडिओ पाठवला आणि म्हणाले दसरा मेळाव्याला मी येतो,ते माझा सन्मान ठेवून आले त्याबद्दल त्यांचे आभार मानते”, असे त्यांनी म्हटले.

हे देखील वाचा : राज्यातील होमगार्ड्ससाठी आनंदवार्ता! मानधनात होणार दुप्पट वाढ

पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की,”या मेळाव्याला १८ पगड जातीचे लोक आले आहेत. नाशिक आहिल्यानगर, बुलढाणा, गंगाखेड, जिंतूर परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, पुणे, पिंपरी चिंचवड याठिकाणाहून लोक आले आहेत. मी दरवर्षी तुम्हाला साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे. तुम्ही मला जिंकवलं, मला इज्जत दिली. माझा पराभव झाल्यावर सर्वात अधिक इज्जत दिली. आता मी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा आहे.परळीतून आम्ही धनु भाऊला तर निवडून देणारच आहोत. पण आता सगळीकडे मी येणार आहे. आमच्या लोकांना त्रास दिल्यास त्याचा हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही” असा इशाराही यावेळी पंकजा मुंडे यांनी दिला.

हे देखील वाचा : टेकऑफनंतर विमानात तांत्रिक बिघाड, १४० प्रवाशांसह विमानाच्या हवेतच चकरा, अखेर…; त्रिची विमानतळावर घडलं थरार नाट्य

तसेच “कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी श्वास घेणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होते. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाही. पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते. या मैदानात माझं भाषण ऐकायला लोकं येणार नाही त्या दिवसाला घाबरते. भगवान बाबांना प्रार्थना करते असा दिवस कधीच येऊ देऊ नको. मी मंत्री असताना विकास केला. रस्ते दिले. या बीड जिल्ह्याला ऐतिहासिक विमा दिला. एकही गाव सोडलं नाही.यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे. छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. मी उदयनराजेंच्या प्रचाराला गेले, त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेलं. माझ्या हाताने आरती केली. त्यानंतर एका घरात नेलं तिथल्या खांबावर त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आम्ही काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं आहे”, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

हे देखील वाचा : RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “दुर्बलता…”

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

आपला मेळावा विचाराचा मेळावा आहे. भगवान गडाच्या भूमिपूजनाला त्यावेळी १९६० ला तात्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आले होते. त्यावेळी संत भगवान बाबाच्या मनात प्रश्न आला. गडाला नाव काय देऊ. तेव्हा चव्हाण म्हणाले, तुमच्या नावातच भगवान आहे. त्यामुळे गडाला भगवान नाव द्या. आमच्या नशिबात संघर्ष आहे. तुमच्या सर्वांच्या नशिबातही संघर्ष आहे. अशा संघर्षाच्या काळात आपण एकत्र आहोत ही अभूतपूर्व गर्दी सांगत आहे. दसरा मेळाव्याची परंपरा फक्त बीड जिल्ह्यात नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा जगात प्रसिद्ध आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेला मुंबईतील दसरा आहे. एकनाथ शिंदे साहेबांचाही मेळावा आहे. भगवानगडावरचाही एक दसरा मेळावा आहे. लोकशाही आहे. मी म्हणालो आनंद आहे. दसरा ज्याला माहिती आहे, त्याला प्रभू रामचंद्रही माहिती असायला हवेत. त्यामुळे पुढचं मी काही बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या,असे नाव न घेता धनंजय मुंडे यांनी जरांगेंना टोला लगावला.

हे देखील वाचा : Ajay Jadeja : जामनगर राजघराण्याचा उत्तराधिकारी बनला ‘अजय जडेजा’; वारशात ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

तसेच आपलं भलेही १२ वर्षे जमलं नसेल. पण मी वेगळा दसरा घेण्याचा कधीही विचार केला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा. आज दसरा मेळाव्याला आलेला समुदाय एकसंघ झाला तर मी आपल्याला सांगतो की कोणीही नवा दसरा मेळावा चालू करून या मेळाव्याची पवित्रता घालवू शकत नाही. संघर्ष आपल्या पाचवीला पुजलेला आहे. संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत,असे म्हणत धनंजय मुंडे यांनी ‘तुम लाख कोशिस करो हमे हरानेकी हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे’ या शेरोशायरीने आपल्या भाषणाला पूर्णविराम दिला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या