Thursday, March 13, 2025
Homeदेश विदेशPariksha Pe Charcha: PM मोदी सरांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास! 'परिक्षा पे चर्चा'...

Pariksha Pe Charcha: PM मोदी सरांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास! ‘परिक्षा पे चर्चा’ मधून विद्यार्थ्यांना दिला महत्वाचा कानमंत्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा सुरु आहे. या चर्चेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही महत्त्वचे सल्ले दिले आहे. तसेच त्यांना तिळगूळही दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांना हेदेखील सांगितले की तुम्ही काय खायला पाहिजे आणि काय नाही? तसेच अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तुम्ही परीक्षेचे टेन्शन घेऊ नका. इतर विद्यार्थ्यांना किती मार्क मिळतात त्याकडे पाहू नका. तुम्ही काय करू शकता हे पाहा, असे सांगतानाच ज्या विषयाची भीती वाटते, त्या विषयाची आधी तयारी करा, असा कानमंत्रच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

‘परिक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची सर्व स्वप्ने आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून मदत केली. तसेच विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीनेही मोदींनी त्यांच्याशी भाष्य केले. हा कार्यक्रम दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सहभागी झाले होते. आजच्या कार्यक्रमासाठी ३.३० कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आणि २०.७१ पेक्षा जास्त शिक्षकांनी नोंदणी केली होती. यातील निवडक २५०० जणांनी प्रत्यक्ष या कार्यक्रमात भाग घेतला.

- Advertisement -

परिक्षेत नाही तर जीवनात यशस्वी व्हा
अपयशामुळे आयुष्य थांबत नाही. तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर केवळ परीक्षेत नाही तर जीवनात यशस्वी व्हा. जीवनात यशस्वी होण्याचा एक मार्ग म्हणजे तुमच्या अपयशांना तुमचे शिक्षक बनवणे. जीवन म्हणजे फक्त परीक्षा नाही, तर जीवनाकडे संपूर्णपणे पाहिले पाहिजे. स्वतःला वेगळे करू नका. स्वतःला प्रेरित करण्यासाठी इतरांची मदत घ्या. कुटुंबातील सदस्यांशी किंवा वरिष्ठांशी संपर्क साधा आणि मदत मिळवा. स्वतःला आव्हान द्या आणि ध्येय निश्चित करा. ते ध्येय साध्य केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल.

क्रिकेटचे दिले उदाहरण
“तुम्ही जेव्हा क्रिकेट खेळता तेव्हा सामना सुरु असताना स्टेडियममधून आवाज येत असतात. कुणी सिक्स, कुणी फोर असे ओरडत असते. फलंदाजाला ते ऐकू येत असते का? तो समोरुन येणाऱ्या चेंडूकडे पाहात असतो. तो कसा खेळायचा त्याप्रमाणे तो खेळतो. लोकांचे ऐकून तो चौकार आणि षटकार मारु लागला तर त्याची विकेट पडेल. त्याचे संपूर्ण लक्ष समोरुन येणाऱ्या प्रत्येक चेंडूकडे असते. तुम्हीही जर कोण काय सांगते आहे यापेक्षा मला आज अभ्यास करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे. आज हा विषय, उद्या तो विषय असे केलेत तर तुम्हीही परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता.”

पालकांना दिला कानमंत्र
पालकांनी आपल्या पाल्यावर कोणतीही गोष्ट लादली नाही पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्याला ओळखायला शिकावे. आपल्या पाल्याला कशात आवड आहे?. त्याचे मन कशात रमते, त्याला स्वत:साठी ओळखण्यास कुटुंबाने मदत केली पाहिजे. पालक आणि परिवाराला माझी विनंती आहे की, “मी पालकांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मुलांना समजून घेण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या इच्छा आणि क्षमता समजून घ्या. त्याच्या क्षमतेनुसार त्याचे निरीक्षण करा आणि शक्य असल्यास त्याला मदत करा. याशिवाय शाळेतील शिक्षकांनादेखील पीएम मोदींनी विनंती केली की, “विद्यार्थ्यांमध्ये तुलना करू नका. विद्यार्थ्यांमधील कमतरता त्यांना एकांतात सांगा तसेच त्यांच्या सकारात्मक बाबीदेखील दाखवून द्या”, असेही सांगितले.

नेतृत्वगुण कसे विकसित करावे
पुढे मोदी म्हणाले, “लीडरशीपचा अर्थ हा नाही की तुम्ही कुर्ता पायजमा घातलात आणि लीडर झालात. मोठमोठी भाषणे करुनही नेता होता येत नाही. तुम्हाला जर नेता व्हायचे असेल, नेतृत्व करायचे असेल तर तुमचे उदाहरण इतरांनी दिले पाहिजे अशी व्यक्ती बना. तुमच्या वर्गात मॉनिटर असतो तसाच मी आहे. मॉनिटरने होमवर्क केला तरच तो इतर मुलांना होमवर्क केला का? हे विचारु शकतो.” असे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले.

वेळेचे योग्य नियोजन कसे करावे
यावेळी एका विद्यार्थ्याने परीक्षा जवळ आल्यावर वेळेचे नियोजन आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी? असा प्रश्न विचारला. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सविस्तर उत्तर दिले. “वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे. मिळालेल्या वेळेचा चांगला उपयोग करता आला पाहिजे. दुसऱ्या दिवसाचे नियोजन करावे. विनाकारण वेळ घालवू नका. गप्पांमध्ये किंवा इतर विषयांवर बोलण्यापेक्षा परीक्षेवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. अभ्यासाची तयारी करताना व्यवस्थित जेवण करा. पुरेशी झोप घ्यायला पाहिजे”, असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला.

विद्यार्थ्यांनी सूर्यस्नान करण्याची सवय लावाली
पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्याने सूर्यस्नान करण्याची सवय लावावी. सकाळी लवकर उन्हात जाऊन बसा. एका दाट झाडाखाली उभे राहा आणि एक दीर्घ श्वास घ्या तुमच्या शरीराचा जास्तीत जास्त भाग सूर्यप्रकाशात आणण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, शारीरिक पोषणाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, ‘गहू, बाजरी, तांदूळ, सर्वकाही खा. बाजरी खाण्यावर लक्ष केंद्रित करा.

तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना सामोरे जाण्याचाही कानमंत्र दिला. तुम्हाला तुमच्यातील आव्हानांचा सामना करावा लागेल. मागच्यावेळी तुम्हाला ३० मार्क होते, तर तुम्हाला यावेळी ३५ मार्क मिळवण्याचा प्रयत्ने केला पाहिजे. असे करून तुम्ही तुमचे टार्गेट वाढवले पाहिजे. हे तुमच्यासाठी एक आव्हान आहे आणि तुम्हाला त्याच्याशी लढले पाहिजे, असे मोदी म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...