Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात बुधवारी दिवसभरात 29 बाधित रूग्ण

पारनेर तालुक्यात बुधवारी दिवसभरात 29 बाधित रूग्ण

सुपा |वार्ताहार| Supa

पारनेर तालुक्यात करोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज प्राप्त झालेल्या करोना चाचणीच्या अहवालानुसार

- Advertisement -

29 व्यक्तींना करोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

तालुक्यातील करोना बाधित गावांमध्ये आळकुटी 3, जवळा 2, वडगाव गुंड 2, टाकळी ढोकेश्वर 2, पारनेर शहर 9, सिद्धेश्वर वाडी 1, गुणोरे 1, सुपा 2, कान्हूर पठार 1, वाळवणे 1, पळवे खुर्द 1, भाळवणी 2, हंगे 1, कर्जुले हर्या 1 या गावातील व्यक्तींचा समावेश आहे.

तर तालुक्यातील 13 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये टाकळी ढोकेश्वर 3, कुरुंद 2, म्हसणे 2, निघोज 1, जवळा 1, पारनेर शहर 1, आळकुटी 1, जामगाव 1, वडनेर 1 या गावांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे.

तसेच पारनेर शहरामध्ये एकाच कुटुंबातील आज पुन्हा पाच जणांना करोनाची लागण झाली आहे. तसेच पारनेर शहरातील तहसिल कार्यालयातील व स्टेट बँक कार्यालयातील प्रत्येकी एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे.

या दोन्ही ठिकाणी सॅनिटायझर करण्यात आले असून सेवा सुरळीत करण्यात आली आहे. येथील कर्मचार्‍यांचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली आहे.

आज पारनेर तालुक्यातील ज्या गावांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडले आहेत. ते रुग्ण राहत असलेला 100 मीटरचा परिसर 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या