Sunday, February 9, 2025
Homeजळगावपारोळा हायवे बायपास टँकर पलटी झाल्याने गॅस गळती ; नागरिकांचे स्थलांतर

पारोळा हायवे बायपास टँकर पलटी झाल्याने गॅस गळती ; नागरिकांचे स्थलांतर

पारोळा parola
पारोळा शहरातील बायपास हायवेवर मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास कॅप्सूल टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली आहे गॅस गळती रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, महसूल व जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.

याबाबत आपत्ती व्यवस्थापनाला देखील कळवण्यात आलेली असून यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार, शहर तलाठी निशिकांत माने यांच्यासह पोलिस यंत्रणा मोठा फौज फाटा लावण्यात आला आहे, हा ग्रीन लाईन कंपनीचा टँकर होता त्यात लिक्विड नॅचरल गॅस साधारण पंधरा टन आहे चालक सुभाष चंद्र सरोज वय 33 प्रताप गड उत्तर प्रदेश हा होता, परिसरात ॲम्बुलन्स व अग्निशामकाचे वाहने देखील उपलब्ध ठेवण्यात आले आहे

- Advertisement -

सदर वसाहतीतील नागरिक महिला बालक वृद्ध यांना घरं सोडण्याचे आदेश दिल्यानंतर वसाहत रहिवास यांनी मिळेल तेथे बस स्टॅन्ड बालाजी मंदिर नवनाथ मंदिर धरणगाव चौपाटी आधी ठिकाणी रात्रभर जागून काढली असून अद्याप पर्यंत सदर टँकरची विल्हेवाट लावण्यात आलेली नसून वसाहतील रहिवासी अजून वन वन भटकताना दिसत आहेत

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या